Current Affairs | चालू घडामोडी | 21th August

National | राष्ट्रीय

 • राष्ट्रपतींनी कोलकाता येथे ‘माय बंगाल, व्यसनमुक्ती बंगाल’ अभियान सुरू केले.
 • बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन (BRO) ने लडाखच्या डेमचोक सेक्टरमध्ये ‘लिकरू-मिग ला-फुक्चे’ रस्ता बांधण्यासाठी एक महत्त्वपूर्ण प्रकल्प सुरू केला आहे.

Appointments | नियुक्त्या

 • BPCL ने राहुल द्रविडची ब्रँड अम्बॅसडर म्हणून घोषणा केली.
 • नीलकंठ मिश्रा यांची UIDAI चे अर्धवेळ (part time) अध्यक्ष म्हणून नियुक्ती.

Economics Banking | अर्थव्यवस्था

 • मुकेश अंबानी यांच्या नवीन कंपनी (JFSL) जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेस लिमिटेड कंपनी चा शेअर आजपासून शेअर मार्केट मध्ये लॉंच.

Sports | क्रीडा

 • मोहित कुमार पुरुषांच्या 61 किलो फ्रीस्टाइल प्रकारात अंडर-20 वर्ल्ड चॅम्पियन बनला.
 • भारताच्या अनाहत सिंगने आशियाई ज्युनियर स्क्वॅश चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकले.
 • प्रिया मलिकने जॉर्डनमध्ये अंडर 20 वर्ल्ड रेसलिंग चॅम्पियनशिपमध्ये सुवर्ण जिंकले.

Scheme | योजना

 • पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी सोमवारी “बिल लियाओ इनाम पाओ” योजनेअंतर्गत ‘मेरा बिल App’ लॉन्च केले.
  • कर संकलनाला चालना देण्यासाठी ‘बिल लियाओ इनाम पाओ’ योजना सुरू करण्यात आली आहे.
  • या योजनेचा उद्देश लोकांना पावत्याचा आग्रह धरण्यासाठी आणि व्यापारी आणि दुकानदारांद्वारे जीएसटी चुकवण्याला रोखण्यासाठी प्रोत्साहित करणे हा आहे.
 • मध्यप्रदेश मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या हस्ते मुख्यमंत्री सिखो -कमाओ योजनेचे उद्घाटन करण्यात येणार.
  • 18 ते 29 वयोगटातील तरुणांसाठी ‘मुख्यमंत्री सिखो-कमाओ’ योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत निवड झालेल्या तरुणांना उद्योगांच्या आवश्यकतेनुसार प्रशिक्षण दिले जाईल आणि त्यांना 8 ते 10 हजार रुपये मानधनही मिळेल.

Technology | तंत्रज्ञान

 • भारतीय नौदलाची पाणबुडी, INS वगीर, ने एक प्रभावी टप्पा गाठून इतिहास रचला आहे – आता कोणत्याही स्कॉर्पीन-श्रेणीच्या पाणबुडीच्या सर्वात जास्त काळ तैनात करण्याचा विक्रम तिच्याकडे आहे.
 • कन्नियाकुमारी जिल्ह्यातील मट्टी केळीच्या विविधतेला भौगोलिक संकेत (GI) टॅग मिळाला आहे.

Obituary News

 • Adobe सह-संस्थापक डॉ. जॉन वॉर्नॉक यांचे ८२ व्या वर्षी निधन झाले.

दिनविशेष

 • World Senior Citizen’s Day

Important Questions | महत्वाचे प्रश्न

 1. केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातीवर किती टक्के निर्यात शुल्क लागू करण्याचा निर्णय घेतला आहे?
 2. महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यामधील शेतजमिनीचा वाद टाळण्यासाठी सुरु केलेल्या सलोखा योजनेमध्ये आतापर्यंत किती दस्ताची नोंद झाली आहे?
 3. महिला विश्वचसक फूटबॉल स्पर्धेच्या अंतिम सामन्यात स्पेन ने कोणत्या देशाच्या संघाला पराभूत केले?
 4. देशाचे नवे राष्ट्रीय सहकार धोरण ठरविण्यासाठी नेमलेल्या समितीचे अध्यक्ष कोण आहेत?
 5. महाराष्ट्र राज्यातील कोणते बंदर देशातील सर्वाधिक खोलीचे बंदर ठरणार आहे?
 6. जागतिक तिरंदाजी स्पर्धेत भारताच्या पुरुष संघाने कंम्पाउंड प्रकारात अंतिम सामन्यात कोणत्या देशाच्या संघाचा पराभव केला?
 7. पॅरिस येथे सुरु असलेल्या जागतिक तिरंदाजी स्पर्धेत भारताच्या पुरुष आणि महिला संघानी कंम्पाउंड प्रकारात कोणते पदक जिंकले?
 8. RBI च्या आहवालानुसार २०२२-२३ मध्ये देशातील सार्वजनिक बँकाच्या नफ्यात किती टक्के वाढ झाली आहे?
 9. मराठवाडा साहित्य परिषदेचे ४३ वे साहित्य संमेलन कोठे होणार आहे?
 10. भारताच्या अनाहत सिंग ने किती वर्षाखालील अशियाई कनिष्ठ गट स्कॉश स्पर्धेत सुवर्णंपदक जिंकले आहे?
 11. जागतिक बॅडमिंटन स्पर्धा कोठे सुरु होत आहे?
 12. प्रो- कब्बडी च्या धर्तीवर कोणत्या राज्याने प्रो-गोविंदा स्पर्धा आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे?
 13. अपारंपारिक ऊर्जा स्रोतापासून विजनिर्मितीत देशात महाराष्ट्र राज्याचा कितवा क्रमांक आहे?
 14. महिला विश्वचसक फुटबॉल स्पर्धा-२०२३ कोणत्या देशाच्या संघाने जिंकली आहे?
 15. कोणत्या देशाची लुना-२५ ही चांद्रयान मोहीम अयशस्वी ठरली आहे?
 16. महिला विश्वचसक फूटबॉल स्पर्धेचा अंतिम सामना कोठे पार पडला?

उत्तरे:

प्रश्न क्र.उत्तरे प्रश्न क्र.उत्तरे
140%9गंगापूर
22201017
3इंग्लंड11कोपनहेगन
4सुरेश प्रभू12महाराष्ट्र
5वाडवन13पाचवा
6मेक्सीको14स्पेन
7सुवर्णं15रशिया
857%16सिडनी

Leave a Comment