Current Affairs | चालू घडामोडी | 22th August

National | राष्ट्रीय

 • CSIR (Council of Scientific and Industrial Research) ने पंतप्रधान मोदींच्या वारशाचा सन्मान करणारी नवीन कमळाची प्रजाती ‘नमोह 108’ सादर केली आहे.

 • भारताने राष्ट्रीय Green Hydrogen मिशन अंतर्गत ‘ग्रीन’ हायड्रोजन मानक जाहीर केले आहे.
  • Green Hydrogen हा रंगहीन, गंधहीन, चवहीन, बिनविषारी आणि अत्यंत ज्वलनशील वायू पदार्थ आहे. हायड्रोजनचा हा प्रकार कार्बन-न्युट्रल अर्थव्यवस्थेकडे जाण्यासाठी मुख्य घटकाची भूमिका बजावतो आणि हवामान बदल कमी करण्यास मदत करतो.

 • नितीन गडकरी यांनी भारत NCAP (न्यू कार असेसमेंट प्रोग्राम) लाँच केला आहे.
  • भारतातील ३.५ टन वाहनांसाठी वाहन सुरक्षा मानके वाढवून रस्ता सुरक्षा वाढवणे हे या कार्यक्रमाचे उद्दिष्ट आहे.
  • शिवाय भारतातील रस्ते अपघात आणि मृत्यूचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल.

Appointments | नियुक्त्या

 • Viacom18 ने Google चे किरण मणी यांची डिजिटल बिझनेसचे CEO म्हणून नियुक्ती केली आहे
 • SBI ने बोर्डावर नवीन चार संचालकांची नियुक्ती केली आहे.
  • 1. Ketan Shivji Vikamsey, 2. Mrugank Madhukar Paranjape 3. Rajesh Kumar Dubey 4. Dharmendra Singh Shekhawat

Appointments | नियुक्त्या

 • ओम बिर्ला यांनी उदयपूर येथे 9व्या C’wealth संसदीय परिषदेचे उद्घाटन केले.
 • G20 Pandemic Fund ने भारतातील पशु आरोग्य प्रणाली सुधारण्यासाठी $25 दशलक्ष वाटप केले आहे

Economics Banking | अर्थव्यवस्था

 • कॅनरा बँकेने CBDC व्यवहारांसाठी UPI-इंटरऑपरेबल डिजिटल रुपी मोबाइल app लाँच केले आहे.
  • Central Bank Digital Currency (CBDC) हा RBI ने सुरू Blockchain Technology वर सुरू केलेला पायलट प्रोजेक्ट आहे. यालाच Digital Rupee असे संबोधले जाते.

Sports | क्रीडा

 • तिरुपती येथील राजा अनिरुद्ध श्रीराम या चौथी इयत्तेच्या विद्यार्थ्याने प्रतिष्ठित सिंगापूर इंटरनॅशनल मॅथ ऑलिम्पियाड चॅलेंज (SIMOC) मध्ये रौप्य पदक जिंकले आहे.
 • प्रज्ञानंधाने सोमवारी जागतिक क्रमवारीत 3 व्या क्रमांकावर असलेल्या फॅबियानो कारुआनाला उपांत्य फेरीत टायब्रेकद्वारे हरवून FIDE Chess World Cup Final मध्ये प्रवेश केला आहे.
  • आता त्याचा सामना Magnus Carlsen सोबत होणार असून Game 1 हा बरोबरी मध्ये संपला आहे.
  • Game-2, 23 August रोजी होणार आहे.

Technology | तंत्रज्ञान

 • सर्व काही ठीक राहिल्यास, विक्रम लँडरने 23 ऑगस्ट रोजी IST संध्याकाळी 6.04 वाजता सॉफ्ट लूनर लँडिंग करेल
 • Digi Yatra’ सुविधा मिळवणारे गुवाहाटी विमानतळ ईशान्येतील पहिले ठरले आहे.
  • हवाई प्रवासाचे आधुनिकीकरण आणि विमानतळ प्रक्रिया सुव्यवस्थित करण्याच्या उद्देशाने नागरी विमान वाहतूक मंत्रालयाच्या सहकार्याने डिजी यात्रा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.

दिनविशेष

 • International Day for the Remembrance of Slave Trade and Abolition

Important Questions | महत्वाचे प्रश्न

 1. PM-eBus सेवा योजनेचा एकूण अंदाजित खर्च किती आहे?
 2. ‘नमोह 108’ कमळाची विविधता कोठे सापडली?
 3. ओणम, एक महत्त्वाचा सांस्कृतिक उत्सव कोणत्या राज्यात साजरा केला जातो ?
 4. खालील पैकी कोणता देश BRICS आर्थिक आघाडीचा भाग नाही ?
 5. कोणत्या रशियन बंदरात भारताचे कार्गो हाताळणीतील योगदान महत्त्वपूर्ण आहे?
 6. 2024 च्या संसदीय निवडणुकीत युवकांना मतदार म्हणून नावनोंदणी करण्यास आणि मतदान करण्यास प्रोत्साहित करण्यासाठी निवडणूक आयोगाने कोणाला Youth Icon म्हणून निवडले आहे ?
 7. प्रिटोरिया, दक्षिण आफ्रिकेत आयोजित 15 व्या BRICS परिषदेची थीम काय आहे?
 8. FIDE विश्वचषक 2023 बुद्धिबळ स्पर्धेदरम्यान आर प्रज्ञनंधाने कोणता विक्रम केला?
 9. BNCAP म्हणजे काय?
 10. आगामी आशिया कप 2023 मध्ये भारतीय पुरुष क्रिकेट संघाचा कर्णधार कोण असेल?

उत्तरे:

प्रश्न क्र.उत्तरे
1Rs 57,613
2मणिपूर
3केरळ
4japan
5Murmansk 
6सचिन तेंडुलकर
7‘ब्रिक्स आणि आफ्रिका: परस्पर प्रवेगक वाढ, शाश्वत विकास आणि सर्वसमावेशक बहुपक्षीयतेसाठी भागीदारी’
8अंतिम फेरीत पोहोचणारा सर्वात तरुण खेळाडू.
9 Bharat New Car Assessment Programme
10रोहित शर्मा

Leave a Comment