Current Affairs | चालू घडामोडी | 25th August 2023

National | राष्ट्रीय

 • पीएम मोदी 40 वर्षात ग्रीसला भेट देणारे पहिले भारतीय पंतप्रधान ठरले आहेत.

 • पंतप्रधान मोदींनी आपल्या ब्रिक्स दौऱ्यात , ब्रिक्स नेत्यांना बिद्री सुराही, नागालँड शाल आणि गोंड पेंटिंग भेट दिली.
  • पंतप्रधान मोदींनी दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष सिरिल रामाफोसा यांना तेलंगणातील बिद्रीची ‘सुरही’ जोडी भेट दिली.
  • पंतप्रधानांनी दक्षिण आफ्रिकेच्या प्रथम महिला Tshepo Motsepe यांना नागालँडची शालही भेट दिली.

 • “100 मायक्रोसाइट्स” उपक्रमांतर्गत, भारताच्या राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाने (NHA) मिझोरामच्या राजधानीत पहिल्या आयुष्मान भारत डिजिटल मिशन (ABDM) मायक्रोसाइटचे अनावरण केले आहे. (Ayushman Bharat Digital Mission )
  • मिझोरामची राजधानी आयझॉल आता भारतातील पहिली ABDM मायक्रोसाइट म्हणून उभी आहे.
  • 100 Microsite प्रोजेक्ट काय आहे ?
   • आयुष्मान भारत डिजिटल मिशन अंतर्गत येणाऱ्या विविध आव्हानांचा सामना करण्याच्या उद्देशाने मायक्रोसाइट्सची अंमलबजावणी केली जाते, विशेषत: खाजगी क्षेत्रातील सेवा देणाऱ्या कंपनी साठी.
   • या उपक्रमांतर्गत, देशात 100 मायक्रोसाइट्स स्थापन केली जाणर आहेत.
   • आयुष्मान भारत डिजिटल मिशनने ऑक्टोबर 2022 मध्ये मुंबईत महाराष्ट्रात पहिली मायक्रोसाइट कार्यान्वित केली. त्याचप्रमाणे गुजरातमध्ये अहमदाबाद आणि सुरत येथे मार्च 2023 मध्ये आणखी 2 मायक्रोसाइट सुरू करण्यात आल्या.

Appointments | नियुक्त्या

 • इन्फोसिसने (Infosys) या भारतीय आयटी कंपनीने टेनिस दिग्गज राफेल नदालला 3 वर्षांसाठी ब्रॅंड अम्बॅसडर म्हणून नियुक्त केले आहे.

Summits & Conferences | परिषदा

 • B20 (बिझनेस 20) समिट इंडिया 2023 सध्या दिल्लीत होत आहे. या परिषदेची थीम आहे : Responsible, Accelerated, Innovative, Sustainable, Equitable (R.A.I.S.E) Businesses. 

Economics Banking | अर्थव्यवस्था

 • अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी HSBC इंडिया आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, बॉम्बे (IIT Bombay) आणि Shakti Sustainable Energy Foundation (SSEF) या प्रमुख संस्थांमध्ये धोरणात्मक भागीदारी सुरू केली आहे.
  • या भागीदारीचा उद्देश ग्रीन हायड्रोजनला प्राधान्य देणार्‍या प्रकल्पांना प्रगतीपथावर नेणे आणि हरित हायड्रोजन अर्थव्यवस्था निर्माण करणे आहे.

 • ICRA ने 2023 च्या पहिल्या तिमाहीत भारताच्या GDP 8.5% वाढीचा अंदाज वर्तवला आहे.
  • ICRA (Investment Information and Credit Rating Agency) ही एक भारतीय स्वतंत्र आणि व्यावसायिक गुंतवणूक माहिती आणि क्रेडिट रेटिंग एजन्सी आहे.

 • HDFC बँकेने Marriott या प्रसिद्ध हॉटेल सोबत मिळून भारतातील पहिले को-ब्रँडेड हॉटेल क्रेडिट कार्ड लाँच केले आहे.

Sports | क्रीडा

 • भारताच्या प्रज्ञनंधाने FIDE Chess विश्वचषक स्पर्धेत दुसरे स्थान पटकावले.
 • प्रज्ञनंधचे वय 18 असून, Chess World Cup Finals मध्ये प्रवेश करणार सर्वात तरुण खेळाडू म्हणून विक्रम केला आहे.

Technology | तंत्रज्ञान

 • युनायटेड नेशन्स एज्युकेशनल, सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशन (United Nations Educational, Scientific and Cultural Organization – UNESCO) आणि तेलंगणा सरकारच्या माहिती तंत्रज्ञान, इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन्स (ITE&C) विभागाने कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणालीच्या (Artificial intelligence systems ) च्या अभ्यासासाठी भागीदारी केली आहे.
 • भारतातील पहिली AI (Artificial Intelligence) शाळा केरळमध्ये सुरू करण्यात आली आहे.

Books & Authors | पुस्तके & लेखक

 •  गोव्याचे राज्यपाल पीएस श्रीधरन पिल्लई (PS Sreedharan Pillai) यांनी राजभवनात झालेल्या एका कार्यक्रमात तीन पुस्तकांचे प्रकाशन केले.
 • त्यांनी लिहिलेल्या तीन नवीन पुस्तकांची नावे:
  • Heritage Trees of Goa,
  • When Parallel Lines Meet
  • Ente Priya Kavithakal (‘My Dear Poems’ a collection of poems).

Obituary News

 • WWE सुपरस्टार Bray Wyatt यांचे निधन

दिनविशेष

 • Women’s Equality Day
 • International Dog Day

Important Questions | महत्वाचे प्रश्न

६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार : महत्वाचे प्रश्न

 1. ६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारामध्ये कोणत्या चित्रपटाला २०२१ चा सर्वोत्कृष्ट राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला आहे?
 2. निखिल महाजन यांना कोणत्या मराठी चित्रपटाच्या दिग्दर्शकासाठी सर्वोत्कृष्ट राष्ट्रीय चित्रपट जाहीर झाला आहे?
 3. राष्ट्रीय एकात्मतेवरील सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट नर्गिस दत्त पुरस्कार कोणत्या चित्रपटाला मिळाला आहे?
 4. ६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे?
 5. ६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट पुरस्कार कोणत्या चित्रपटास मिळाला आहे?
 6. सर्वोत्कृष्ट बालचित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार कोणत्या चित्रपटाला जाहीर झाला आहे?
 7.  ६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारामध्ये कोणाला सर्वोत्कृष्ट अभिनेताचा पुरस्कार मिळाला आहे?
 8. सर्वोत्कृष्ट राष्ट्रीय चित्रपटाचा पुरस्कार मिळवणारा रॉकेट्री-द नम्बी इफेक्ट हा चित्रपट कोणत्या इस्रो च्या शास्त्रज्ञाच्या जीवनावर आधारित आहे?
 9. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शका चा राष्ट्रीय पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे?
 10. सर्वोत्कृष्ट लोकप्रिय चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार कोणत्या चित्रपटाला जाहीर झाला आहे?
 11. ६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारात सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे?
 12. पंकज त्रिपाठी यांना कोणत्या चित्रपठासाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्त्या साठी राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे?
 13. ६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारा मध्ये सर्वोत्कृष्ट ज्यूरी पुरस्कार कोणत्या चित्रपटास मिळाला आहे?
 14. सर्वोत्कृष्ट राष्ट्रीय अभिनेत्याचा पुरस्कार जिंकणारा अल्लू अर्जुन हा कितवा तेलगू सुपरस्टार ठरला आहे?

इतर महत्वाचे प्रश्न

15. सीमा देव यांचे नुकतेच निधन झाले त्या कोणत्या क्षेत्रात कार्यरत होत्या?

16. देशातील सर्वात मोठे परीक्षा केंद्र कोठे सुरु झाले आहे?

17. महाराष्ट्र राज्याचे मत्सविकास धोरण निश्चित करण्यासाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली आहे?

18. ब्रिक्स संघटनेमध्ये नवीन किती देशाचा समावेश झाला आहे?

19. ब्रिक्स संघटनेमध्ये सामील झालेल्या नवीन ६ देशाची मुदत कधी पासून सुरु होणार आहे?

20. ब्रिक्स या संघटनेच्या सदस्य देशाची एकूण किती संख्या झाली आहे?

उत्तरे:

प्रश्न क्र.उत्तरे
1रॉकेट्री-द नम्बी इफेक्ट
2गोदावरी
3द काश्मीर फाईल
4एकदा काय झालं
5 सरदार उधमसिंग
6 गांधी अँड कंपनी
7अल्लू अर्जुन
8 नंबी नारायणन
9 निखिल महाजन
10 आर आर आर
11 पंकज त्रिपाठी
12मिमी
13 शेरशाह
14 पहिला
15अभिनय
16पाटणा
17राम नाईक
18
19१ जानेवारी २०२४
20११

Leave a Comment