Current Affairs | चालू घडामोडी | 26th August 2023

National | राष्ट्रीय

 • शिक्षण मंत्रालयाने अलीकडेच शालेय शिक्षणासाठी एक नाविन्यपूर्ण राष्ट्रीय अभ्यासक्रम फ्रेमवर्कचे अनावरण केले आहे, ज्याचा उद्देश विद्यार्थ्यांना वाढीव अभ्यासक्रमातील लवचिकता आणि निवडी प्रदान करणे आहे.

 • आसाम पर्यावरण आणि वन विभागाने राज्यात 1000 मिली क्षमतेपेक्षा कमी क्षमतेच्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्यांच्या वापरावर आणि उत्पादनावर बंदी घालण्याची घोषणा करून महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे.

 • उत्तर प्रदेश मंत्रिमंडळाने उत्तर प्रदेशातील सर्व 18 विभागांमध्ये 18 ‘अटल निवासी शाळा’ स्थापन करण्यासाठी 1,250 कोटी रुपयांच्या महत्त्वपूर्ण बजेटची तरतूद केली आहे.

 • इंदौर ला सर्वोत्कृष्ट शहर आणि मध्य प्रदेशला भारतातील सर्वोत्कृष्ट राज्य स्मार्ट सिटीज पुरस्कार 2022 देण्यात आला आहे.
  • शहरी विकासातील उल्लेखनीय प्रयत्नांसाठी स्मार्ट शहरांमध्ये सूरतने दुसरे स्थान मिळवले आणि स्मार्ट सिटी मिशनमध्ये योगदान देणाऱ्या पुढाकारांसाठी आग्राने तिसरे स्थान मिळवले.

Appointments | नियुक्त्या

 • इन्फोसिसने (Infosys) या भारतीय आयटी कंपनीने महिला टेनिस वर्ल्ड नंबर 1, इगा स्विटेक (Iga Swiatek) यांना ब्रॅंड अम्बॅसडर म्हणून नियुक्त केले आहे. तसेच यापूर्वी राफेल नदालला 3 वर्षांसाठी ब्रॅंड अम्बॅसडर म्हणून नियुक्त केले आहे.

Summits & Conferences | परिषदा

 • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अथेन्स येथे ग्रीसच्या राष्ट्रपती कॅटेरिना एन. साकेलारोपौलो यांच्या हस्ते ग्रँड क्रॉस ऑफ द ऑर्डर ऑफ ऑनर प्रदान करण्यात आला.

 • BRICS संघटनेमध्ये आता नव्याने ६ देश सामील होणार असून त्यांची मुदत १ जानेवारी २०२४ पासून सुरु होणार आहे.
  • नव्याने सामील झालेले 6 देश :
   • 1. Argentina
   • 2. Egypt
   • 3. Ethiopia
   • 4. Iran
   • 5. Saudi Arabia
   • 6. UAE
  • ब्रिक्स या संघटनेच्या सदस्य देशाची एकूण संख्या आता 11 झाली आहे. आधीचे सहभागी असलेले देश :
   • 7. Brazil
   • 8. Russia
   • 9. India
   • 10. China
   • 11. South Africa

Economics Banking | अर्थव्यवस्था

 • RBI ने ऑफलाइन पेमेंट व्यवहाराची कमाल मर्यादा ₹200 वरून ₹500 पर्यंत वाढवली आहे.

 • SEBI ही संस्था Research Analyst Administration and Supervisory Body (RAASB) स्थापन करण्याची योजना आखत आहे.
  • याचा उद्देश संशोधन विश्लेषकांचे व्यवस्थापन आणि देखरेख करण्यासाठी होणार आहे.

Sports | क्रीडा

 • दृष्टिहीन भारतीय महिला क्रिकेट संघाने 26 ऑगस्ट रोजी IBSA वर्ल्ड गेम्समध्ये ऑस्ट्रेलियाला नऊ गडी राखून हरवून सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला.
 • भारतीय पुरुषांच्या 4×400 मीटर रिले संघाने आशियाई विक्रम मोडला असून , प्रथमच जागतिक स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी पात्र ठरले आहे.

Technology | तंत्रज्ञान

 • 23 ऑगस्ट हा राष्ट्रीय अवकाश दिवस (National Space Day) म्हणून भारतात साजरा होणार आहे.

 • इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन (ISRO) आणखी एका चंद्र मोहिमेची तयारी करत आहे, ही मोहिम जपानी अंतराळ संस्था, Japan Aerospace Exploration Agency (JAXA) च्या सहकार्याने होणार आहे
  • या मोहिमेचे नाव LUPEX असून हे मिशन 2024-25 साठी अपेक्षित आहे.

 • चंद्रावर ज्या ठिकाणी विक्रम लॅंडर उतरले आहे त्या ठिकाणाला आता ‘शिवशक्ति’ असे नाव देण्यात आले आहे.

Books & Authors | पुस्तके & लेखक  

 • अमृत ​​माथूर यांनी त्यांचे आत्मचरित्र ‘पिचसाइड: माय लाइफ इन इंडियन क्रिकेट’ (Pitchside: My Life in Indian Cricket) प्रकाशित केले.

Obituary News

 • ज्येष्ठ मराठी अभिनेत्री सीमा देव यांचे वयाच्या ८१ व्या वर्षी निधन झाले.

दिनविशेष

 • टाटा स्टीलचा पाया रचणारे दोराबजी टाटा यांचा जन्म.
 • मोल्दोव्हाला (moldova) देशाला स्वातंत्र्य मिळाले

Important Questions | महत्वाचे प्रश्न

 1. केंद्र सरकारच्या राष्ट्रीय स्मार्ट सिटी पुरस्कार २०२२ मध्ये सुरत शहराने कितव्या क्रमांकाचा पुरस्कार मिळवला आहे?
 2. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या राष्ट्रीय स्मार्ट सिटी पुरस्कार २०२२ मध्ये पश्चिम क्षेत्रासाठीचा सर्वोत्कृष्ट पुरस्कार महाराष्ट्र राज्यातील कोणत्या शहराला जाहीर झाला आहे?
 3. राष्ट्रीय स्मार्ट सिटी पुरस्कार २०२२ मध्ये तामिळनाडू राज्याला सर्वोत्कृष्ट राज्यामध्ये कितवा क्रमांक मिळाला आहे?
 4. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कोणत्या देशाच्या सर्वोच्च ग्रॅड क्रॉस ऑफ द ऑर्डर ऑफ ऑनर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे?
 5. भारत आणि ग्रीस ने कोणत्या वर्षापर्यंत दोन्ही देशातील व्यपार दुप्पट करण्याचा निर्णय घेतला आहे?
 6. भारताची सध्या अंतराळ क्षेत्राची उलाढाल किती कोटी आहे?
 7. नॅशनल ग्रीन ट्रीबुनल NGT च्या अध्यक्ष पदी कोणाची नियुक्ती केली आहे?
 8. जागतिक नेमबाजी स्पर्धेत भारत किती पदकासह दुसऱ्या स्थानी आहे?
 9. भारतीय उद्योग महासंघाद्वारे कोठे बी-२० इंडिया शिखर परिषद आयोजित केली होती?
 10. महिला समानता दिन २०२३ ची थीम काय आहे?
 11. राष्ट्रीय स्मार्ट सिटी पुरस्कार २०२२ मध्ये सर्वोत्कृष्ट राज्याचा पुरस्कार कोणत्या राज्याला मिळाला आहे?
 12. केंद्र सरकारच्या राष्ट्रीय स्मार्ट सिटी पुरस्कार २०२२ मध्ये कोणत्या शहराने प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळवला आहे?
 13. नरेंद्र मोदी हे गेल्या ४० वर्षात ग्रीस देशाचा दौरा करणारे भारताचे कितवे पंतप्रधान ठरले आहेत?
 14. नुकत्याच झालेल्या IBSA वर्ल्ड गेम्समध्ये दृष्टिहीन भारतीय महिला क्रिकेट संघाने कोणते पदक मिळवले आहे ?
 15. 23 ऑगस्ट हा दिवस कोणता दिवस म्हणून भारतात साजरा होणार आहे ?
 16. नुकत्याच झालेल्या IBSA वर्ल्ड गेम्समध्ये दृष्टिहीन भारतीय महिला क्रिकेट संघाने कोणत्या देशाला पराभूत करून सुवर्णपदक मिळवले आहे ?

उत्तरे:

प्रश्न क्र.उत्तरे
1द्वितीय
2सोलापूर
3दुसरा
4ग्रीस
5 २०३०
6 ६६,४००
7न्या. प्रकाश श्रीवास्तव
8 १४
9 नवी दिल्ली
10 गुणवत्ता स्वीकारा
11 मध्यप्रदेश
12इंदोर
13 पहिले
14 सुवर्णपदक
15राष्ट्रीय अवकाश दिवस (National Space Day)
16ऑस्ट्रेलिय

आजची Quiz आणि इतर घडामोडी

Leave a Comment

23 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz 22 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz 21 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz 20 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz 19 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz