Current Affairs 27 August 2023 | चालू घडामोडी

National | राष्ट्रीय

 • भारत आणि एशियन डेव्हलपमेंट बँक (ADB) च्या भागीदारीत नवी दिल्ली येथे हवामान बदल आणि आरोग्य केंद्र उघडणार आहे.

 • आसाम सरकारने, आसामच्या सर्वात स्वछ जिल्ह्याचा गौरव करण्यासाठी ‘MODI’ योजनेचे अनावरण केले आहे.
  • MODI : Most Outstanding District Initiative .
  • विजेत्या जिल्ह्याला बक्षीस म्हणून 100 करोंड रुपयांचा निधी दिला जाणर आहे.

 • राजस्थान सरकारने राजस्थानमधील सर्व महिलांसाठी नुकतीच एक योजना जारी केली आहे. इंदिरा गांधी स्मार्टफोन योजना असे या योजनेचे नाव आहे.
  • या योजनेअंतर्गत, सरकार पहिल्या फेरीत राजस्थानमधील महिलांना 40 लाखांहून अधिक स्मार्टफोन उपलब्ध करून देणार आहे.

 • आसामच्या काझीरंगा राष्ट्रीय उद्यानाला पहिली महिला क्षेत्र संचालक मिळणार आहे.

Appointments | नियुक्त्या

 • झिम्बाब्वेचे राष्ट्राध्यक्ष इमर्सन मनंगाग्वा (Emmerson Mnangagwa) दुसऱ्या आणि अंतिम टर्मसाठी पुन्हा निवडून आले.

Summits & Conferences | परिषदा

 • भारत आणि युरोपियन युनियन (EU) यांच्यातील तिसरा उच्चस्तरीय संवाद (HLD) नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आला होता.
  • बैठकीदरम्यान, वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल आणि युरोपियन कमिशनचे कार्यकारी उपाध्यक्ष वाल्डिस डोम्ब्रोव्स्किस यांनी भारत आणि EU दरम्यान सुरू असलेल्या तीन वाटाघाटींचा आढावा घेतला.
  • या वाटाघाटींमध्ये खालील करारांचा समावेश आहे:
   • एक स्वतंत्र गुंतवणूक संरक्षण करार. (A Standalone Investment Protection Agreement)
   • भौगोलिक संकेत करार. (Geographical Indications Agreement)
   • भारत-EU मुक्त व्यापार (India-EU Free Trade Agreement)

Economics Banking | अर्थव्यवस्था

 • L&T, IOCL आणि Renew यांनी ग्रीन हायड्रोजनसाठी संयुक्त उपक्रम तयार केला आहे.
  • संयुक्त उपक्रम कंपनीचे नाव GH4India प्रायव्हेट लिमिटेड आहे जेथे कंपन्यांचा प्रत्येकी 33.33% हिस्सा असेल, असे L&T ने नियामक फाइलिंगमध्ये म्हटले आहे.

 • अकोला मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँकेचे जळगाव पीपल्स को-ऑपरेटिव्ह बँकेत विलीनीकरणाला आरबीआयची मान्यता दिली आहे.

Sports | क्रीडा

 • नीरज चोप्राने जागतिक अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये भारताचे पहिले सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला आहे.

 • पारुल चौधरीने महिलांच्या 3000 मीटर स्टीपलचेस अंतिम फेरीत राष्ट्रीय विक्रम मोडला आहे.

 • पुरुषांच्या 4×400 मीटर रिले अंतिम फेरीत भारत पाचव्या स्थानावर राहिला आहे

Technology | तंत्रज्ञान

 • NASA, SpaceX यांनी मिळून चार देशांतील चार अंतराळवीरांना ISS वर पाठवले आसून या मोहिमेचे नाव क्रू-7 आहे.
  • NASA- ही अमेरिकन अंतराळ संस्था आहे.
  • SpaceX- ही Elon Musk यांची रॉकेट कंपनी आहे.
  • ISS – International Space Station ही अवकाशात तरंगणारी एक प्रयोगशाळा आहे.

 • केंद्रीय मंत्री देवुसिंह चौहान यांनी C-DOT नी तयार केलेली Cyber threat detection, resolution system Trinetra (त्रीनेत्र) लॉंच केली आहे.
  • C-Dot – Centre for Development of Telematics ही भारत सरकारच्या मालकीचे दूरसंचार तंत्रज्ञान विकास केंद्र आहे.

Important Questions | महत्वाचे प्रश्न

 1. 27 ऑगस्ट ते 16 सप्टेंबर 2023 या कालावधीत ब्राइट स्टार-23 या बहुपक्षीय सरावाचे यजमान कोणते राष्ट्र आहे?
 2. अलीकडेच जागतिक ऍथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये भारताचा पहिला सुवर्णपदक विजेता कोण बनला?
 3. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखालील उत्तर प्रदेश मंत्रिमंडळाने राज्याच्या विभागांमध्ये किती ‘अटल निवासी शाळा’ स्थापन करण्यास मान्यता दिली आहे?
 4. Viacom18 च्या डिजिटल व्यवसाय विभागाचे CEO म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
 5. कोणत्या स्पेस एजन्सीने अलीकडेच आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर क्रू-7 मोहीम सुरू केली आहे (ISS)?
 6. G20 कल्चर वर्किंग ग्रुपची बैठक कोठे झाली?
 7. 2023 BWF (बॅडमिंटन) वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये भारतीय खेळाडू HS Prannoy ने कोणत्या स्पर्धेत कांस्यपदक जिंकले?
 8. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ड्रीम प्रोजेक्ट “अमृत भारत स्टेशन योजने” अंतर्गत किती कोटी रुपये खर्चून नवीन फरक्का जंक्शनचा पुनर्विकास केला जाणार आहे?
 9. C-Dot या भारत सरकारच्या दूरसंचार तंत्रज्ञान विकास केंद्राने बनवलेल्या सायबर सुरक्षा शोध प्रणालीचे नाव काय आहे ?
 10. झिम्बाब्वेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष यांचे नाव काय आहे ?

उत्तरे:

प्रश्न क्र.उत्तरे
1Egypt
2नीरज चोप्रा
318
4किरण मणी
5 NASA
6 वाराणसी
7पुरुष एकेरी शटलर
8 31 करोड़ रुपये
9 Trinetra (त्रीनेत्र)
10 इमर्सन मनंगाग्वा

आजची Quiz

Leave a Comment

23 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz 22 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz 21 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz 20 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz 19 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz