Current Affairs 28 August 2023 | चालू घडामोडी

नमस्कार मित्रांनो, आम्ही आपल्या साठी 28 ऑगस्ट च्या काही महत्वपूर्ण घडामोडी दिल्या आहेत. तसेच खाली महत्वाचे प्रश्न आणि Quiz दिली आहे.

National | राष्ट्रीय

 • भारत सरकारने खानन प्रहारी App लॉंच केले आहे जे नागरिकांना त्यांच्या परिसरातील कोळसा खाणीशी संबंधित कोणत्याही संशयास्पद क्रियाकलापांची तक्रार करण्यास अनुमती देते, ज्यामुळे या बेकायदेशीर खाणकामवार आळा बसण्यास मदत होणार आहे.

 • एअर क्वालिटी अर्ली वॉर्निंग सिस्टम (Air Quality Early Warning System) मिळवणारे कोलकाता हे तिसरे भारतीय शहर बनले आहे.
  • Air Quality Early Warning System (AQEWS) हे Indian Institute of Tropical Meteorology (IITM) पुण्यातील संस्थेने विकसित केले आहे.
  • ही प्रणाली रिअल-टाइम वायू प्रदूषण डेटा आणि अंदाज दोन्ही देते.

 • जपानने मून लँडर घेऊन जाणाऱ्या रॉकेटचे प्रक्षेपण वाऱ्यांमुळे स्थगित केले आहे.

 • पंचायती राज मंत्रालयाच्या SVAMITVA योजनेला ई-गव्हर्नन्स 2023 साठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे.

Summits & Conferences | परिषदा

 • इजिप्तमध्ये सुरू झालेल्या ब्राईट स्टार-२३ या सरावात भारतीय वायुसेनेने पहिल्यांदाच सहभाग नोंदवला आहे.
  • हा द्विवार्षिक बहुपक्षीय त्रि-सेवा सराव इजिप्तमधील कैरो (पश्चिम) हवाई तळावर 27 ऑगस्ट ते 16 सप्टेंबर 2023 या कालावधीत होत आहे.
  • या सरावात United States of AmericaSaudi ArabiaGreece, and Qatar या देशांचाही सहभाग आहे.

Economics Banking | अर्थव्यवस्था

 • Zepto ही कंपनी 2023 मधील पहिली भारतीय युनिकॉर्न कंपनी ठरली आहे. Zepto ने $1.4 बिलियन मुल्यांकनाने $200 दशलक्ष गुंतवणूक मिळवली आहे.

 • एअरटेल पेमेंट्स बँकेने, मास्टरकार्ड सेंटर आणि फ्रंटियर मार्केट्स यांनी मिळून,
  • She Leads Bharat: Udyam नावाचा एक परिवर्तनकारी उपक्रम सुरू केला आहे. हा उपक्रम 100,000 महिलांच्या मालकीच्या लहान व्यवसायांना शिकण्याची आणि कमावण्याची संधी देऊन त्यांना उन्नत करण्यासाठी डिझाइन केला आहे.

Sports | क्रीडा

 • मॅक्स वर्स्टॅपेनने (Max Verstappen) सलग तिसऱ्या वर्षी Dutch Grand Prix ही Formula-1 रेसिंग स्पर्धा जिंकली आहे.

 • नीरज चोप्राने जागतिक एथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये सुवर्ण मिळवणारा पहिला भारतीय म्हणून इतिहास रचला आहे.

 • BWF World Badminton Championships 2023 भारतीय बॅडमिंटनपटू HS Prannoy ने पुरुष एकेरी गटात कांस्यपदक मिळवले.
 • खाली पाच भारतीय पुरुष एकेरी खेळाडूंची यादी आहे ज्यांनी आतापर्यंत जागतिक चॅम्पियनशिपमध्ये पदक मिळवले आहे.
खेळाडू पदक
Kidambi SrikanthSilver
HS PrannoyBronze
Lakshya SenBronze
Prakash padukoneBronze
B Sai PraneethBronze

Technology | तंत्रज्ञान

 • ‘चांद्रयान’च्या यशानंतर भारत ‘गगनयान मिशन’ वर काम करत आहे, या माध्यमातून मानवाला अंतराळात पाठवलं जाणार आहे.
  • या मोहिमेअंतर्गत तीन अंतराळवीरांना अवकाशात पाठवण्यात येणार आहे. इस्रो लवकरच गगनयानचं ट्रायल मिशन लाँच करणार आहे, ज्यात मानवाआधी रोबोटला अंतराळात पाठवलं जाईल.
  • अंतराळात पाठविल्या जाणाऱ्या रोबोट चे नाव ‘व्योमित्र’ असणार आहे.

 • Jio कंपनी ने Jio AirFiber हे एक पोर्टेबल वायरलेस डिव्हाइस बाजारात आणले आहे.
  • 19 September दिवशी हे लॉंच होणार असून Jio यामध्ये 5G अँटीना वापरणार आहे.
  • ज्यामुळे युजर्सला 1Gbps पर्यंत जलद कनेक्टिविटी मिळवू शकणार आहे.

दिनविशेष

 • National Sports Day
 • Major Dhyan Chand Birthday.

Important Questions | महत्वाचे प्रश्न

 1. महाराष्ट्र राज्यातील एकमेव शिक्षिका ज्याना यावर्षीचा राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे, त्यांचे नाव काय आहे ?
 2. जागतिक अथॅलेटिक्स स्पर्धेत विश्वविजेता ठरणारा निरज चोप्रा हा कितवा भारतीय अथेलिट आहे?
 3. भारताची सध्या रस्त्याची एकूण लांबी किती किलोमीटर आहे?
 4. इमर्सन मनंगागवा यांची कोणत्या देशाच्या अध्यक्षपदी दुसऱ्यांदा निवड झाली?
 5. झिम्बाबे देशाच्या अध्यक्षपदाच्या निवडणूकीत इमर्सन मनंगागवा यांना किती टक्के मते मिळाली आहेत?
 6. कोणत्या देशात होणाऱ्या ब्राईट स्टार युद्धसरावात भारताचे हवाई दल पहिल्यांदा सहभागी होणार आहे?
 7. चालू आर्थिक वर्षाच्या तिमाहीत देशात महाराष्ट्र राज्यात सर्वाधिक किती अब्ज डॉलर परकीय गुंतवणूक झाली आहे?
 8. गुजरात येथील गांधीनगर येथे कोणाच्या अध्यक्षतेखाली पश्चिम विभागीय अंतररराज्य परिषद होणार आहे?
 9. जगात एकूण रस्त्याच्या लांबीमध्ये कोणता देश प्रथम स्थानावर आहे?
 10. देशातील बांधकाम क्षेत्राचे GDP तील योगदान सध्याच्या ७.३% वरून किती टक्के वाढण्याचा अंदाज आहे?
 11. भारत हा जगातील कितवा क्रमांकाचा पवन ऊर्जा उत्पादक देश आहे?
 12. कोणत्या राज्याने सरकारी नोकऱ्यामध्ये महिलांना ३०% ऐवजी ३५% आरक्षण देण्याचे जाहीर केले आहे?
 13. जगातील रस्त्याच्या एकूण लांबी मध्ये भारताने कितवा क्रमांक पटकावला आहे?
 14. Dutch Grand Prix 2023 ही Formula-1 रेसिंग स्पर्धा कोणी जिंकली ?
 15. गगनयान मिशन’ अंतर्गत अंतराळात पाठविल्या जाणाऱ्या रोबोट चे नाव काय आहे ?
 16. सूर्यमालेचा अभ्यास करण्यासाठी इस्रोने तयार केलेल्या मोहिमेचे नाव काय आहे ?

उत्तरे:

प्रश्न क्र.उत्तरे
1मृणाल गांजाळे
2पहिला
3६३.७२ लाख
4झिम्बाबे
5 ५२.६%
6 इजीप्त
7४.४६
8 अमित शहा
9 अमेरिका
10 १५.५%
11चौथा
12 मध्य प्रदेश
13दुसरा
14Max Verstappen
15 व्योमित्र
16आदित्य L1

आजची Quiz आणि इतर घडामोडी

Leave a Comment

23 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz 22 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz 21 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz 20 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz 19 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz 18 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz 17 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz 15 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz 13 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz 12 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz 11 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz ! 10 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz 8 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz 7 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz 6 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | Quiz 5 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | 60 सेकंदात सोडवा. 4 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | झटपट सोडवा! 2 September महत्वाचे प्रश्न | झटपट सोडवा! 1 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | 60 सेकंदात सोडवा. 30 ऑगस्ट महत्वाचे प्रश्न | झटपट सोडवा !