Current Affairs 30 August 2023 | चालू घडामोडी

नमस्कार मित्रांनो, आम्ही आपल्या साठी 30 ऑगस्ट च्या काही महत्वपूर्ण घडामोडी दिल्या आहेत. तसेच खाली महत्वाचे प्रश्न आणि Quiz दिली आहे. आपणास जर या चालू घडामोडींची PDF हवी असेल तर. खाली त्यासाठी download लिंक खाली दिली आहे.

Current Affairs PDF Download करण्यासाठी => येथे क्लिक करा

National | राष्ट्रीय

 • भारत आणि न्यूझीलंडच्या सरकारने अलीकडेच एक नागरी विमान वाहतूक क्षेत्रात सामंजस्य करार (एमओयू) केला आहे.

 • GSL आणि केनिया शिपयार्ड लिमिटेड यांनी जहाजबांधणीमध्ये सहकार्यासाठी सामंजस्य करार केला.
  • Goa Shipyard Limited (GSL) आणि Kenya Shipyards Limited (KSL) दोन्ही राष्ट्रांमधील सागरी सुरक्षा सहकार्य मजबूत करण्यासाठी हा करार करण्यात आला आहे.

 • Chokuwa Rice– चोकुवा तांदूळ, “जादूचा तांदूळ” म्हणून ओळखला जातो, त्याला अलीकडेच प्रतिष्ठित भौगोलिक संकेत Geographical Indication (GI) टॅग प्रदान करण्यात आला आहे.

 • केंद्रीय मंत्रिमंडळाने घरगुती एलपीजी सिलेंडरची किंमत 200 रुपयांनी कमी करण्यास मान्यता दिली आहे.

 • गुजरात सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये OBC कोटा 27 टक्के केला आहे.

 • गुजरात सरकारने Panchayat Raj Accounting Information System Automation (PRAISA) हे सॉफ्टवेअर लॉंच केले असून त्याचा उपयोग पंचायत राज संस्थेचे पेमेंट ऑनलाइन करण्यासाठी होणार आहे.

Economics Banking | अर्थव्यवस्था

 • टाटाने इलेक्ट्रिक वाहन व्यवसायासाठी आपली नवीन ब्रँड ओळख, TATA.ev सादर करण्याची घोषणा केली आहे.

 • Axis Bank ने Infinity Savings Account हे ऑनलाइन उघडता येणारे नवीन बँक खाते लॉंच केले आहे.

Sports | क्रीडा

 • 1992 नंतर यूएस ओपनमध्ये एकेरी स्पर्धा जिंकणारा स्टँन वॉवरिंका Stan Wawrinka सर्वात वयस्कर खेळाडू ठरला आहे.
  • Stan Wawrinka चे वय 38 वर्ष आहे.

 • Dutch Grand prix जिंकून Max Verstappen ने 2023 मधले 11 वे विजेतेपद जिंकले आहे.

Technology | तंत्रज्ञान

 • इस्रायलने ओरॉन ORON या ‘सर्वात प्रगत’ पाळत ठेवणाऱ्या विमानाच्या (Intelligence gathering aircraft) चाचण्या सुरू केल्या.

 • मच्छिमारांच्या सुरक्षेसाठी इस्रोने विकसित केलेल्या उपकरणाची नींदकारा येथे यशस्वी चाचणी घेण्यात आली.
  • भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) ने ‘नभमित्र’ (Nabhmitra) या नाविन्यपूर्ण उपकरणाची यशस्वी चाचणी करून एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे.

Appointments | नियुक्त्या

 • इंडियन ऑइलने शेफ संजीव कपूरला ब्रँड अम्बेसेडर म्हणून नियुक्त केले आहे.
  • सेलिब्रिटी शेफ संजीव कपूर त्याच्या Indian Oil च्या Indane XTRATEJ LPG ब्रँडचे ब्रँड अम्बेसेडर म्हणून नियुक्त केले आहेत.

 • Finance Industry Development Council (FIDC) ने उमेश रेवणकर यांची अध्यक्षपदी नियुक्ती जाहीर केली आहे.

 • ईशा अंबानी, आकाश अंबानी आणि अनंत अंबानी यांची रिलायन्स इंडस्ट्रीजच्या कंपनीच्या बोर्डावर गैर-कार्यकारी संचालक म्हणून औपचारिकपणे नियुक्ती करण्यात आली आहे.

Books & Authors | पुस्तके & लेखक

 • शिवराज सिंह आणि अनुराग ठाकूर यांनी पंतप्रधान मोदींच्या भाषणांवर आधारित पुस्तकांचे प्रकाशन केले आहे.
  • या पुस्तकाचे नाव सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास (Sabka Sath, Sabka Vikas, Sabka Vishwas) असून या पुस्तकात एका विभागात 86 आणि दुसऱ्या विभागात 80 भाषणे आहेत.

दिनविशेष

 • International Day For People Of African Descent

Important Questions | महत्वाचे प्रश्न

 1. भारतातील कोणत्या कंपनीने जगातील पहिली इथेनॉल वर आधारित मोटार तयार केली आहे?
 2. महाराष्ट्र राज्यात कोणत्या देशाच्या धर्तीवर ऑलीम्पिक भवन उभारण्यात येणार आहे?
 3. चीन ने प्रसिद्ध केलेल्या नकाशामध्ये भारताच्या कोणत्या राज्याचा भाग चीनचा असल्याचे दाखवले आहे?
 4. केंद्र सरकारने बासमती तांदळाचा किमान निर्यात दर किती डॉलर प्रति टन निश्चित केला आहे?
 5. अंतरराष्ट्रीय व्हेल शार्क दिन म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो?
 6. देशाच्या एकूण सकल राज्य उत्पादनात महाराष्ट्र राज्याचा सर्वाधिक किती टक्के वाटा आहे?
 7. चालू आर्थिक वर्षात भारताची आयटी सेवा क्षेत्राची वाढ ९% वरून किती टक्के होण्याचा अंदाज ईक्रा रेटिंग्स ने वर्तविला आहे?
 8. कोणत्या देशाच्या राज्याच्या विधिमंडळात जातीभेदाविरोधी विधेयक मंजूर करण्यात आले आहे?
 9. कोणत्या राज्याने स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये OBC ना २७% आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे?
 10. केंद्र सरकारच्या उज्ज्वला योजनेमध्ये एकूण लाभार्थ्यांची संख्या किती होणार आहे?
 11. ‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास’ हे पुस्तक कोणच्या भाषणांवर आधारित आहे ?
 12. इस्रायलने विकसित केलेल्या पाळत ठेवणाऱ्या विमानाचे नाव काय आहे ?
 13. मच्छिमारांच्या सुरक्षेसाठी इस्रोने विकसित केलेल्या उपकरणाचे नाव काय आहे ?

उत्तरे:

प्रश्न क्र.उत्तरे
1टोयोटा
2जपान
3अरुणाचल प्रदेश
4१२००
5 ३० ऑगस्ट
6 १३%
7 ३%
8 अमेरिका
9 गुजरात
10१० कोटी ३५ लाख
11 नरेंद्र मोदी
12 ORON
13 नभमित्र

Download Current Affairs PDF


आजची Quiz आणि इतर घडामोडी

Leave a Comment

23 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz 22 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz 21 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz 20 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz 19 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz 18 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz 17 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz 15 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz 13 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz 12 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz 11 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz ! 10 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz 8 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz 7 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz 6 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | Quiz 5 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | 60 सेकंदात सोडवा. 4 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | झटपट सोडवा! 2 September महत्वाचे प्रश्न | झटपट सोडवा! 1 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | 60 सेकंदात सोडवा. 30 ऑगस्ट महत्वाचे प्रश्न | झटपट सोडवा !