Current Affairs 31 August 1 September 2023 | चालू घडामोडी

नमस्कार मित्रांनो, आम्ही आपल्या साठी 31 ऑगस्ट आणि 1 सेप्टेंबर च्या काही महत्वपूर्ण घडामोडी दिल्या आहेत. तसेच खाली महत्वाचे प्रश्न आणि Quiz दिली आहे. आपणास जर या चालू घडामोडींची PDF हवी असेल तर. खाली त्यासाठी download लिंक खाली दिली आहे.

Current Affairs PDF Download करण्यासाठी => येथे क्लिक करा

ऑगस्ट महिन्यातील इतर दिवसांच्या चालू घडामोडी वाचण्यासाठी => येथे क्लिक करा

National | राष्ट्रीय

 • FY 2023-24 च्या पहिल्या तिमाहीत FDI आकर्षित करण्यात महाराष्ट्र आघाडीवर आहे.
  • 36,634 कोटी रुपयांची परकीय गुंतवणूक आकर्षित करून राज्याने अव्वल स्थान मिळवले.

 • ओडिशातील भारतातील सर्वात मोठ्या ग्रीन हायड्रोजन प्रकल्पासाठी टाटा स्टील आणि ACME समूह सामील झाले आहेत.

 • महेंद्रगिरी ही भारताची नवीन युद्धनौका 1 सप्टेंबर रोजी मुंबईत दाखल होणार आहे.

 • इनोवेशन ला चालना देण्यासाठी भारत ऑक्टोबरमध्ये पहिल्या जागतिक AI समिटचे आयोजन करणार आहे.

 • काश्मीर डिसेंबरमध्ये मिस वर्ल्ड 2023 चे आयोजन करणार आहे.

 • राजस्थानच्या प्रियन सेनने मिस अर्थ इंडिया 2023 चा ताज जिंकला.

 • Kakrapar Atomic Power Project या भारतातील सर्वात मोठ्या गृहनिर्मित अणुऊर्जा प्रकल्पाचे कार्य सुरू.
  • गुजरातमधील काकरापार येथे असलेल्या 700 मेगावॅटच्या अणुऊर्जा प्रकल्पाने कमाल क्षमतेने आपले कार्य सुरू केले आहे.
  • Kakrapar Atomic Power Project (KAPP) ने 30 जून 2023 रोजी त्याचे व्यावसायिक कार्य सुरू केले होते, परंतु सुरुवातीला त्याच्या क्षमतेच्या केवळ 90 टक्के काम केले. 31 ऑगस्ट 2023 रोजी, प्लांटने त्याची पूर्ण कार्यक्षम क्षमता प्राप्त केली.

 • केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी स्वतंत्र भारताचे पहिले अर्थमंतत्री RK Shanmugam Chetty यांच्या पुतळ्याचे अनावरण केले.

 • ‘एक राष्ट्र, एक निवडणूक’ (One Nation, One Election) ची शक्यता तपासण्यासाठी भारताने माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या नेतृत्वाखालील समितीसमिती स्थापन केली आहे.

Economics Banking | अर्थव्यवस्था

 • बंधन बँकेला भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ने अधिकृत पेन्शन वितरण बँक म्हणून काम करण्यासाठी परवानगी दिली आहे.

 • एप्रिल-जून तिमाहीत भारताच्या GDP वाढीचा वेग 7.8% झाला आहे.

Sports | क्रीडा

 • भारताने फायनलमध्ये थायलंडचा ७-२ असा पराभव करत महिला आशियाई हॉकी 5s विश्वचषक पात्रता फेरीत विजेतेपद पटकावले.

 • Viacom 18 या मीडिया कंपनीला 5 वर्षांकरिता 5,963 कोटी रुपयांमध्ये BCCI टीव्ही आणि डिजिटल मीडिया चे राइट्स मिळाले आहेत.
  • 2023 ते 2028 दरम्यान नियोजित 88 सामन्यांसाठी हे राइट्स मिळाले आहेत.

Technology | तंत्रज्ञान

 • आधार लिंक्ड जन्म नोंदणी सुरू करणारे नागालँड हे ईशान्येकडील पहिले राज्य बनले आहे.
  • 0 ते 5 वर्षे वयोगटातील मुलांसाठी जन्म नोंदणी आणि आधार नोंदणी केली जात आहे.

 • ट्वीटर कंपनी ने ट्वीटर app च्या द्वारे विडियो कॉलिंग फिचर आणले आहे, या द्वारे आता लवकरच विडियो आणि ऑडिओ कॉल करता येणार आहेत.

Appointments | नियुक्त्या

 • सध्या परराष्ट्र मंत्रालयाच्या (MEA) मुख्यालयात संयुक्त सचिव म्हणून कार्यरत असलेल्या गीतिका श्रीवास्तव या इस्लामाबाद, पाकिस्तान येथील उच्चायुक्तालयात भारतीय मिशनचे प्रमुख म्हणून काम पाहणार आहेत.

 • माजी CJI NV रमना यांची आंतरराष्ट्रीय मध्यस्थी समितीचे Singapore International Mediation Centre (SIMC) सदस्य म्हणून नियुक्ती.

 • सरकारने जया वर्मा सिन्हा Jaya Verma Sinha यांची रेल्वे बोर्डाच्या पहिल्या महिला अध्यक्षपदी नियुक्ती केली.

 • भारताचा माझी कर्णधार महिंद्रसिंग धोनीची, स्वराज ट्रॅक्टर्स चा ब्रँड एम्बेसेडर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

Scheme | योजना

 • केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने फार्मास्युटिकल आणि मेडटेक क्षेत्रातील संशोधन आणि नवोपक्रमांना चालना देण्यासाठी Pharma-MedTech sector (PRIP) योजना सुरू केली आहे.
  • फार्मास्युटिकल आणि मेडटेक क्षेत्रातील संशोधन आणि नवोपक्रमांना चालना देण्यासाठी या योजनेची सुरुवात केली आहे.
  • या योजने अंतर्गत, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने विविध नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल, एज्युकेशन अँड रिसर्च (NIPER) येथे उत्कृष्ट सात केंद्रे तयार करण्यासाठी ₹700 कोटींची गुंतवणूक करण्याची योजना जाहीर केली आहे.

दिनविशेष

 • World Sanskrit Day (31 August)

Important Questions | महत्वाचे प्रश्न

 1. कोणत्या राज्याच्या सरकारने महिलांसाठी गृहलक्ष्मी योजनेचा शुभारंभ केला आहे?
 2. कोणत्या राज्यातील भद्रावह राजमा आणि सुलाई मधाला भौगोलिक मनांकन GI दर्जा देण्यात आला आहे?
 3. कोणती टेनिस महिला खेळाडू अमेरिकन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धा २०२३ खेळणारी सर्वात वयस्कर महिला ठरली आहे?
 4. देशातील १३ वर्षाखालील बालकांच्या लसीकरणासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून कोणता प्रकल्प राबविला जाणार आहे?
 5. जागतिक अथेलिटिक्स स्पर्धेत भारत एकूण पदतालीकेत कितव्या क्रमांकावर राहिला?
 6. कर्नाटक सरकारणे सुरु केलेल्या गृहलक्ष्मी योजनेत राज्यातील प्रत्येक घरातील कुटुंबप्रमुख महिलेला प्रतिमहीना किती रुपये मिळणार आहेत?
 7. अंतरराष्ट्रीय एकदिवशीय क्रिकेट मध्ये कोणत्या खेळाडूंने सर्वात कमी डावात १९ शतके करण्याचा विक्रम केला आहे?
 8. अंतरराज्य टी-२० क्रिकेट स्पर्धा कोठे पार पडली?
 9. अंतराज्य टी-२० क्रिकेट स्पर्धा कोणत्या राज्याने जिंकली आहे?
 10. निरक्षरांना साक्षर करण्यासाठी केंद्र शासनातर्फे कोणत्या कार्यक्रमाची अमलबजावणी करण्यास सुरुवात केली आहे?
 11. 65th रॅमन मॅगसेसे पुरस्कार विजेत्यांमध्ये कोणत्या भारतीयाचा समावेश आहे ?
 12. स्वराज ट्रॅक्टर्सचा ब्रँड एम्बेसेडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?
 13. ‘एक राष्ट्र, एक निवडणूक’ One Nation, One Election साठी स्थापन केलेल्या समितीचे अध्यक्ष कोण आहेत ?
 14. पाकिस्तान येथील उच्चायुक्तालयात भारतीय मिशनचे प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?
 15. रेल्वे बोर्डाच्या पहिल्या महिला अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?
 16. भारताच्या नवीन युद्धनौकेचे नाव काय आहे ?
 17. FY 2023-24 च्या पहिल्या तिमाहीत परकीय गुंतवणूक आकर्षित करण्यात कोणते राज्य पहिल्या क्रमांकावर आहे ?
 18. मिस अर्थ इंडिया 2023 चा ताज कोणी जिंकला ?
 19. डिसेंबरमध्ये मिस वर्ल्ड 2023 चे आयोजन कोठे करण्यात येणार आहे ?
 20. आधार लिंक्ड जन्म नोंदणी सुरू करणारे हे ईशान्येकडील पहिले राज्य कोणते ?

उत्तरे:

प्रश्न क्र.उत्तरे
1कर्नाटक
2जम्मू अँड काश्मीर
3सेरेना विल्यम
4यु-विन
5 १८
6 २०००
7बाबर आझम
8 पद्दूचेरी
9 महाराष्ट्र
10नवसाक्षरता
11 Dr Ravi Kannan R
12 महिंद्रसिंग धोनी
13 रामनाथ कोविंद
14 गीतिका श्रीवास्तव
15 जया वर्मा सिन्हा
16 महेंद्रगिरी
17 महाराष्ट्र
18 प्रियन सेनने
19 काश्मीर
20 नागालँड

Download Current Affairs PDF


आजची Quiz आणि इतर घडामोडी

Leave a Comment

23 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz 22 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz 21 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz 20 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz 19 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz 18 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz 17 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz 15 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz 13 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz 12 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz 11 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz ! 10 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz 8 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz 7 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz 6 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | Quiz 5 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | 60 सेकंदात सोडवा. 4 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | झटपट सोडवा! 2 September महत्वाचे प्रश्न | झटपट सोडवा! 1 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | 60 सेकंदात सोडवा. 30 ऑगस्ट महत्वाचे प्रश्न | झटपट सोडवा !