Current Affairs | चालू घडामोडी | 3 November 2023

Current Affairs in Marathi 3 November 2023 : वर्ल्ड फूड इंडिया 2023, इंडिया मॅन्युफॅक्चरिंग शो , मेक इन इंडिया, मेक फॉर द वर्ल्ड, थायलंड कडून भारतीयांसाठी व्हिसा-मुक्त प्रवेश, ENCORE Software आणि World Telecommunication Standardization Assembly च्या काही महत्वपूर्ण घडामोडी दिल्या आहेत. तसेच खाली महत्वाचे प्रश्न आणि Quiz दिली आहे.


Monthly Current Affairs

ऑक्टोबर महिन्यातील महत्वाचे प्रश्न

सप्टेंबर महिन्यातील महत्वाचे प्रश्न


Join Groups for Latest Updates

Join WhatsApp Group

Join Telegram Channel


Current Affairs in Marathi 3 November 2023 – Headlines

Headlines

National

 • पंतप्रधान नरेंद्र मोदी वर्ल्ड फूड इंडिया 2023 च्या दुसऱ्या आवृत्तीचे उद्घाटन करणार आहेत.
  • भारताच्या पाककृती वारसा साजरा करण्यासाठी हा कार्यक्रम तयार केला आहे.
  • हा कार्यक्रम 3 ते 5 नोवेंबर दरम्यान आयोजित केला आहे.
 • राजनाथ सिंह यांनी बेंगळुरू येथे ‘इंडिया मॅन्युफॅक्चरिंग शो’ चे उद्घाटन केले आहे.
  • या कार्यक्रमाची थीम ‘मेक इन इंडिया, मेक फॉर द वर्ल्ड’ अशी आहे.
 • थायलंडने पर्यटनाला चालना देण्यासाठी भारतीयांसाठी व्हिसा-मुक्त प्रवेशाची घोषणा केली आहे.
  • 10 नोव्हेंबर 2023 पासून सुरू होणारे आणि 10 मे 2024 पर्यंत चालू राहून, भारत आणि तैवानमधील पर्यटक व्हिसाशिवाय थायलंडमध्ये प्रवेश करू शकतात.
  • भारत आणि तैवानमधील प्रवासी व्हिसाशिवाय थायलंडमध्ये जास्तीत जास्त 30 दिवसांच्या वास्तव्याचा आनंद घेऊ शकतात.
 • केंद्रीय शिक्षण आणि कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी UAE चे शिक्षण मंत्री डॉ. अहमद अल फलासी यांच्यासोबत दोन्ही देशांमधील शैक्षणिक सहकार्यासाठी सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली आहे.

Economics

 • बँक ऑफ बडोदा ने डिजिटल चॅनेलचे प्रमुख म्हणून ‘कडगतूर शीतल वेंकटेशमुर्त यांची नियुक्ती केली आहे.
 • झुरिच इन्शुरन्स ग्रुप कोटक जनरल इन्शुरन्समध्ये 51% हिस्सा खरेदी करणार आहे.

Technology

 • भारतीय निवडणूक आयोगाने ने ‘ENCORE’ सॉफ्टवेअर डिझाइन केले आहे.
  • या द्वारे संपूर्ण उमेदवार आणि निवडणूक व्यवस्थापन केले जाऊ शकते. तसेच मतांची मोजणी, निकाल संकलन आणि डेटा व्यवस्थापन या सुविधा या सॉफ्टवेअर मध्ये विकसित केल्या आहेत.
 • 5G आणि 6G नेटवर्कच्या प्रगतीच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून भारत 2024 मध्ये प्रतिष्ठित जागतिक दूरसंचार मानकीकरण असेंब्ली World Telecommunication Standardization Assembly (WTSA) चे आयोजन करणार आहे. .

Sports

 • मोहम्मद शमी विश्वचषकाच्या इतिहासात भारताचा आघाडीचा विकेट घेणारा गोलंदाज ठरला आहे.
  • शमीच्या वनडे विश्वचषकातील विकेट्सची संख्या आता 45 वर आहे.

Awards

 • HCL Tech चे संस्थापक शिव नाडर आणि त्यांच्या कुटुंबाने एडेलगिव्ह हुरुन इंडिया फिलान्थ्रॉपी लिस्ट The Hurun India Philanthropy List 2023 मध्ये अव्वल स्थान कायम ठेवले आहे.
  • 2022-23 या आर्थिक वर्षासाठी, त्यांनी 2,042 कोटी रुपयांची देणगी दिली आहे.
 • प्रख्यात लेखक टी. पद्मनाभन यांना प्रतिष्ठित केरळ ज्योती पुरस्कार मिळाला आहे.

Other

 • NCERT शालेय पाठ्यपुस्तकांमध्ये ‘निवडणूक साक्षरता’ या विषय पाठ्यक्रमात समावेश करणार आहे.
 • Employees’ Provident Fund Organization ईपीएफओचा 71 वा स्थापना दिवस नवी दिल्लीत साजरा करण्यात आला.

Current Affairs in Marathi 3 November 2023 – Quiz | महत्वाचे प्रश्न

स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त आजचे महत्वाचे प्रश्न