Current Affairs Quiz In Marathi 29 September 2023 | महत्वाचे प्रश्न | PDF Download

Current Affairs Quiz In Marathi 29 September 2023 : सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी या विषयाला प्रत्येक स्पर्धा परीक्षेत सर्वाधिक महत्त्व आहे. लोकसेवा आयोग आणि इतर परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना दररोज महत्वाचे प्रश्न आणि त्यांचे उत्तरे उपलब्ध करून देत आहोत. त्याचा नियमित सराव आवश्यक आहे. या प्रश्नाची pdf हवी असल्यास ती खालील लिंक वरून डाउनलोड करावी.

MPSC Current Affairs Quiz In Marathi

सप्टेंबरच्या चालू घडामोडी वाचण्यासाठी क्लिक करा
29 September 2023 महत्वाचे प्रश्नांची PDF Downloadक्लिक करा

29 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न आणि उत्तरे


  1. हरित क्रांतीचे जनक कोणाला म्हटले जाते ?

(A) एस सोमनाथ

(B) विनोबा भावे

(C) एम एस स्वामींनाथन

(D) महात्मा फुले

उत्तर: एम एस स्वामींनाथन


2. एम एस स्वामींनाथन यांचे कोणत्या क्षेत्रात मोठे योगदान होते?

(A) साहित्य

(B) कृषी

(C) तंत्रज्ञान

(D) मनोरंजन

उत्तर: कृषी


3. तामिळनाडू व कर्नाटक या राज्यात सध्या कोणत्या नदीच्या पाणी वाटप प्रश्नावरून वाद चालू आहे?

(A) कृष्णा

(B) कावेरी

(C) नर्मदा

(D) गोदावरी

उत्तर: कावेरी


4. भारताच्या रोशीबिनी देवीने आशियाई क्रीडा स्पर्धेत वूशु या खेळात कोणते पदक जिंकले आहे?

(A) सुवर्ण

(B) रौप्य

(C) कास्य

(D) प्लॅटिनम

उत्तर: रौप्य


5. जागतिक हृदय दिन कधी साजरा केला जातो?

(A) २९ सप्टेंबर

(B) २ ऑक्टोबर

(C) ३० सप्टेंबर

(D) १ ऑक्टोबर

उत्तर: २९ सप्टेंबर


6. शिवा नारवालने आशियाई क्रीडा स्पर्धेत १० मी एअर पिस्तूल प्रकारात कोणते पदक जिंकले आहे?

(A) सुवर्ण

(B) रौप्य

(C) कास्य

(D) प्लॅटिनम

उत्तर: सुवर्ण


7. हरितक्रांति हा शब्द कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे ?

(A) आरोग्य

(B) तंत्रज्ञान

(C) कृषी

(D) शिक्षण

उत्तर: कृषी


8. नुकतेच निधन झालेले सर मायकल गॅबोन यांनी कोणत्या प्रसिद्ध चित्रपटात प्रोफेसर डंबलडोरची भूमिका केली होती ?

(A) लॉर्ड ऑफ द रिंगस

(B) मिशन इंपोसीबल

(C) हॅरी पॉटर

(D) सिताडेल

उत्तर: हॅरी पॉटर


9. भारतीय हरीतक्रांतीचे जनक एम एस स्वामींनाथन यांना भारत सरकारने १९८९ मध्ये कोणता पुरस्कार देऊन सन्मानित केले होते?

(A) पद्मभूषण

(B) महाराष्ट्रभूषण

(C) पद्मविभूषण

(D) महाराष्ट्ररत्न

उत्तर: पद्मविभूषण


10. भारताने ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स २०२३ मध्ये कितवा क्रमांक मिळवला आहे?

(A) 30

(B) 35

(C) 40

(D) 45

उत्तर: 40


11. आशियाई क्रीडा प्रकारात भारताच्या रोशीबिनी देवी ने वूशु क्रीडा प्रकारात किती किलो वजनी गटात रौप्य पदक जिंकले?

(A) 55

(B) 60

(C) 65

(D) 70

उत्तर: 60


12. आशियाई क्रीडा स्पर्धेत १० मी एअर पिस्तूल प्रकारात सुवर्ण पदक जिंकून पॅरिस ऑलिम्पिक साठी कोणता भारतीय पात्र ठरला आहे?

(A) शिवा नरवाल

(B) अर्जुन सिंग

(C) रोशीबिनी देवी

(D) अंकित तिवारी

उत्तर: शिवा नरवाल


Leave a Comment