Current Affairs | चालू घडामोडी | 1 December 2023

Current Affairs in Marathi 1 December 2023 मध्ये क्लासिक इम्पीरियल, दिव्यांग मुलांचा अंगणवाडी कार्यक्रम, PM-JANMAN, COP28 परिषद, प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना अशा काही महत्वपूर्ण घडामोडी दिल्या आहेत. तसेच खाली महत्वाचे प्रश्न आणि Quiz दिली आहे.


Monthly Current Affairs

नोव्हेंबेर 2023 महिन्यातील महत्वाचे प्रश्न

ऑक्टोबर 2023 महिन्यातील महत्वाचे प्रश्न

सप्टेंबर 2023 महिन्यातील महत्वाचे प्रश्न


Join Groups for Latest Updates

Join WhatsApp Group

Join Telegram Channel


Current Affairs in Marathi 1 December 2023 – Headlines

1 December 2023 Current Affairs in Marathi

National

 • केंद्रीय महिला व बालविकास आणि अल्पसंख्याक व्यवहार मंत्री, श्रीमती. स्मृती इराणी यांनी अलीकडेच 28 नोव्हेंबर 2023 रोजी विज्ञान भवन येथे एका राष्ट्रीय आउटरीच कार्यक्रमात दिव्यांग मुलांचा अंगणवाडी कार्यक्रम जाहीर केला आहे.
 • समलिंगी विवाह नोंदणी करणारे पहिले दक्षिण आशियाई राष्ट्र नेपाळ ठरले आहे.
 • नितीन गडकरी यांनी कोची येथे क्रूझ पर्यटनाला चालना देण्याच्या उद्देशाने क्लासिक इम्पीरियल लक्झरी क्रूझ जहाजाचे उद्घाटन केले आहे.
 • असुरक्षित आदिवासी गटांना (Particularly Vulnerable Tribal Groups) मदत करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने अलीकडेच प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियान (PM-JANMAN) अभियानाला मंजूरी दिली आहे.
 • सरकारने PMGKAY प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेचा कालावधी आणखी 5 वर्षांसाठी वाढवला आहे.

Economics

 • COP28 परिषद 30 नोव्हेंबर 2023 ते 12 डिसेंबर 2023 दुबई येथे आयोजित करण्यात आली आहे.
 • 16व्या वित्त आयोगाच्या स्थापनेला केंद्रीय मंत्रिमडळाने मंजुरी दिली आहे.

Technology

 • महिला बचत गटांना ड्रोन पुरविण्याच्या योजनेला मंत्रिमंडळाने मंजूरी दिली आहे. केंद्र सरकारने देशातील 15 हजार महिला बचगटांना लखपती दिदी योजने अंतर्गत ड्रोन देण्याचा निर्णय घेतला आहे.
 • अदानी पॉवर लिमिटेड (APL) ने गुजरातमधील मुंद्रा पॉवर प्लांटमध्ये आपला अग्रगण्य ग्रीन अमोनिया ज्वलन पायलट प्रकल्प जाहीर केला आहे.

Sports

 • 13 वी हॉकी इंडिया सीनियर पुरुष राष्ट्रीय चॅम्पियनशिप 2023 हॉकी पंजाब संघाने जिंकली आहे.

Awards

 • UNHCR Nansen Refugee Award 2023 अब्दुल्लाही मिरे यांना मिळाला आहे.
 • मिझोराम चे राज्यपाल डॉ. हरी बाबू कंभामपती यांनी भारतीय हवाई दलाच्या 2015 बॅचमधील प्रतिष्ठित अधिकारी, स्क्वाड्रन लीडर मनीषा पाधी यांची भारतीय सशस्त्र दलातील भारताची पहिली महिला मदतनीस-डी-कॅम्प (ADC) म्हणून नियुक्ती केली आहे.

Other

 • नोबेल शांतता पुरस्कार विजेते हेन्री किसिंजर यांचे नुकतेच निधन झाले.  

Daily Current Affairs 1 December 2023 in Marathi Quiz – महत्वाचे प्रश्न

स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त आजचे महत्वाचे प्रश्न