Current Affairs | चालू घडामोडी आणि महत्वाचे प्रश्न | 01 January 2024

Current Affairs In Marathi 1 January 2024 मध्ये आरोहण योजना, कार्बी युवा महोत्सव, जम्मू काश्मीर या केंद्रशासित प्रदेश पंचायती राज कायदा, Finite Element Analysis of Structures, पॉवरग्रिड विश्राम सदन, रश्मी शुक्ला अशा चालू घडामोडींवर आधारित हे प्रश्न दिले आहेत.

MPSC Current Affairs In Marathi 1 January 2024

सर्व स्पर्धा परीक्षा, पोलिस भरती, तलाठी भरती, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सर्व पदांसाठी दररोजच्या चालू घडामोडीवर आधारित उपयुक्त प्रश्न राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय, अर्थशास्त्र, पुरस्कार, नियुक्त्या, क्रिडा, मनोरंजन आणि दिनविशेष खाली सविस्तर पणे दिले आहेत.Join Groups for Latest Updates

Join WhatsApp Group

Join Telegram Channel


Current Affairs in Marathi 1 January 2024 – Headlines

1 January 2024 Current Affairs in Marathi

National

 • भारत आणि रशियाने आर्थिक सहकार्य, ऊर्जा व्यापार, कनेक्टिव्हिटी, लष्करी-तांत्रिक सहकार्य आणि लोकांमधील देवाणघेवाण यांमध्ये प्रगती करण्यासाठी पुढील चार वर्षांच्या कालावधीसाठी (2024-28) सल्लामसलतीच्या प्रोटोकॉलवर स्वाक्षरी केली आहे.
  • रशिया बद्दल माहिती:
   • राजधानी – मॉस्को
   • चलन – रुबेल
   • अध्यक्ष – व्लादिमीर पुतिन
 • केंद्रीय ऊर्जा, नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्री आर के सिंह यांनी बेंगळुरू येथे पॉवरग्रिड विश्राम सदनचे उद्घाटन केले आहे.
  • या सदनातील 55 खोल्या सर्व आवश्यक सुविधांनी सुसज्ज आहेत आणि रुग्णांच्या सेवकांना जास्तीत जास्त सोयीसुविधा देण्यास सक्षम आहेत.
 • 17 जानेवारी 2024 रोजी कार्बी युवा महोत्सवाच्या उत्सवात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू प्रमुख पाहुणे असतील.
  • तारलांगसो, दिपू येथे हा महोत्सव होणार असुन, 12 ते 19 जानेवारी दरम्यान होणाऱ्या या उत्सवात पारंपारिक कला, लोकनृत्य, संगीत आणि स्थानिक आदिवासी खाद्यपदार्थांचा समावेश असेल.
  • आसाम बद्दल माहिती:
   • राजधानी – दिसपूर
   • मुख्यमंत्री – हिमंता बिस्वा सरमा
   • राज्यपाल – गुलाबचंद कटारिया
 • इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, गुवाहाटी यांनी गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या उच्च शिक्षणात STEM विषय घेण्यास प्रवृत्त करण्यासाठी आसाम सरकारच्या आरोहण योजनेचा प्रचार करण्यासाठी करार केला आहे.
 • अलीकडेच जम्मू काश्मीर या केंद्रशासित प्रदेशाच्या पंचायती राज कायद्यात ओबीसी आरक्षणासाठी सुधारणा करण्यात आली आहे.

Economics

 • भारतीय रिझर्व्ह बँकेने ICICI प्रुडेंशियल अॅसेट मॅनेजमेंट कंपनी लिमिटेड (ICICI AMC) ला बँकेतील 9.95 टक्के भागभांडवल संपादन करण्यास मान्यता दिली आहे.
 • HDFC बँकेच्या बोर्डाने अतनु चक्रवर्ती यांची अर्धवेळ नॉन-एक्झिक्युटिव्ह चेअरमन आणि स्वतंत्र संचालक म्हणून पुन्हा नियुक्ती केली आहे.

Technology

 • भारतीय अंतराळ संस्था ISRO च्या विक्रम साराभाई स्पेस सेंटर (VSSC) ने एक विश्लेषण सॉफ्टवेअर विकसित केले आहे ज्याचा वापर रॉकेट, विमान, उपग्रह, इमारती इत्यादींसह विविध प्रकारच्या संरचनांचे मर्यादित घटक विश्लेषण (FEA) करण्यासाठी केला जातो.
  • FEA सॉफ्टवेअर FEAST (Finite Element Analysis of Structures) या नावाने ओळखले जाते.
 • Uber या टॅक्सी कंपनीने बेंगळुरू शहरात इलेक्ट्रिक वाहन सेवा Uber Green लॉन्च करण्याची घोषणा केली आहे.

Sports

 • बॅडमिंटन स्टार पीव्ही सिंधूने फोर्ब्सच्या 2023 च्या सर्वाधिक कमाई करणाऱ्या महिला खेळाडूंच्या यादीत स्थान मिळवले आहे. तिने $7.1 दशलक्ष कमाईसह 16 वे स्थान मिळविले आहे.
  • पोलिश टेनिस स्टार इगा स्विटेक ने $23.9 दशलक्ष कमाई केली आहे. तिने फ्रेंच ओपन जिंकले आणि जागतिक क्रमवारीतील नंबर 1 खेळाडू म्हणून वर्षाचा शेवट केला.

Awards

 • नुकतेच वरिष्ठ IPS अधिकारी ‘रश्मी शुक्ला’ यांची महाराष्ट्र पोलिस महासंचालक (DGP) पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
 • ह्युंदाई मोटर इंडियाने अलीकडेच दीपिका पदुकोणला ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून नियुक्त केले आहे.

Other

 • राजस्थानमध्ये कोटा येथे स्नेक पार्क सुरू होणार आहे.

चालू घडामोडीवरील महत्वाचे प्रश्न – 1 January 2024

खाली चालू घडामोडी वरील काही महत्वाचे प्रश्न वास्तुनिष्ट स्वरूपात दिले आहेत. त्याचा सराव करा तसेच इतर दिवसांच्या घडामोडी आणि त्यावरील प्रश्न या संकेतस्थळाच्या Quiz आणि current affairs section मध्ये उपलब्ध करून दिल्या आहेत. Current Affairs In Marathi 1 January 2024

Current Affairs Quiz In Marathi 1 January 2024

Q1. नुकतेच ’12 व्या दिव्य कला मेळा 2023′ चे उद्घाटन कुठे झाले?

(A) ओडिशा
(B) गुजरात
(C) तामिळनाडू
(D) नवी दिल्ली

Ans: गुजरात


Q2. राजस्थानमध्ये ‘स्नेक पार्क’ कुठे सुरू होणार आहे?

(A) कोटा
(B) जयपुर
(C) उदयपूर
(D) उधमपुर

Ans: कोटा


Q3. नुकतेच वरिष्ठ IPS अधिकारी ‘रश्मी शुक्ला’ यांची कोणत्या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे?

(A) इंस्पेक्टर जनरल
(B) महाराष्ट्र पोलिस उपसंचालक
(C) महाराष्ट्र पोलिस महासंचालक (DGP)
(D) वाहतूक पोलिस संचालक

Ans: महाराष्ट्र पोलिस महासंचालक (DGP)


Q4. ह्युंदाई मोटर इंडियाने अलीकडेच कोणत्या अभिनेत्रीची ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून नियुक्ती केली आहे?

(A) कियारा आडवाणी
(B) प्रियंका चोप्रा
(C) कतरिना कैफ
(D) दीपिका पदुकोण

Ans: दीपिका पदुकोण


Q5. केंद्रीय ऊर्जा मंत्री आर के सिंह यांच्या हस्ते ‘पॉवर ग्रीड विश्राम सदन’चे उद्घाटन नुकतेच कोठे झाले?

(A) कोची
(B) बेंगळुरू
(C) पाटणा
(D) लखनौ

Ans: बेंगळुरू


Q6. बातम्यांमध्ये चर्चेत असलेले हंबनटोटा बंदर कोणत्या देशात आहे?

(A) इस्रायल
(B) श्रीलंका
(C) अफगाणिस्तान
(D) युक्रेन

Ans: श्रीलंका


Q7. भारतीय कार्यकर्त्या सफीना हुसेन, ज्यांना नुकतेच प्रतिष्ठित $500,000 WISE पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे, त्यांना कोणत्या कार्यासाठी पुरस्कृत करण्यात आले आहे?

(A) पर्यावरण
(B) मुलींचे शिक्षण
(C) गरिबी
(D) महिला सक्षमीकरण

Ans: मुलींचे शिक्षण


Q8. सध्या चर्चेत असलेले वुल्फ अमेंडमेंट कोणत्या देशाशी संबंधित आहे?

(A) यूएसए
(B) रशिया
(C) जपान
(D) भारत

Ans: यूएसए


Q9. Uber या cab कंपनीने कोणत्या शहरात इलेक्ट्रिक वाहन सेवा Uber Green लॉन्च करण्याची घोषणा केली आहे?

(A) नवी दिल्ली
(B) चेन्नई
(C) बेंगळुरू
(D) कोचीन

Ans: बेंगळुरू


Q10. अलीकडेच कोणत्या केंद्रशासित प्रदेशाच्या पंचायती राज कायद्यात ओबीसी आरक्षणासाठी सुधारणा करण्यात आली आहे ?

(A) दिल्ली
(B) दमन दीव
(C) जम्मू-काश्मीर
(D) चंडीगढ

Ans: जम्मू-काश्मीर


Q11. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, गुवाहाटी यांनी गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या उच्च शिक्षणात STEM विषय घेण्यास प्रवृत्त करण्यासाठी कोणत्या राज्यसरकारच्या आरोहण योजनेचा प्रचार करण्यासाठी करार केला आहे?

(A) झारखंड
(B) महाराष्ट्र
(C) मध्यप्रदेश
(D) आसाम

Ans: आसाम


Q12. भारतीय अंतराळ संस्था ISRO च्या विक्रम साराभाई स्पेस सेंटर (VSSC) ने कोणते विश्लेषण सॉफ्टवेअर विकसित केले आहे ज्याचा वापर रॉकेट, विमान, उपग्रह, इमारती इत्यादींसह विविध प्रकारच्या संरचनांचे मर्यादित घटक विश्लेषण (FEA) करण्यासाठी केला जाणार आहे?

(A) BEAST
(B) SPACE ex
(C) FEAST
(D) Space Study

Ans: FEAST (Finite Element Analysis of Structures)


Q13. बॅडमिंटन स्टार पीव्ही सिंधूने फोर्ब्सच्या 2023 च्या सर्वाधिक कमाई करणाऱ्या महिलांच्या यादीत कोणते स्थान मिळवले आहे?

(A) 10 वे
(B) 12 वे
(C) 16 वे
(D) 20 वे

Ans: 16 वे


Q14. लाल समुद्र सुरक्षित करण्यासाठी कोणत्या देशाने अलीकडेच ऑपरेशन ‘समृद्धी गार्डियन’ सुरू केले आहे?

(A) कॅनडा
(B) अमेरिका
(C) चीन
(D) दक्षिण आफ्रिका

Ans: अमेरिका


Q15. मुंबई मॅरेथॉनसाठी नुकतीच आंतरराष्ट्रीय इव्हेंट अॅम्बेसेडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?

(A) दीपिका पदुकोण
(B) जॉर्जिया जोन्स
(C) केटी मून
(D) दुआ लिपा

Ans: केटी मून