Current Affairs | चालू घडामोडी | 10 December 2023

Current Affairs in Marathi 10 December 2023 मध्ये Global Pollution Ranking, मेरा गाव, मेरी धरोहर, दामोदर राजनरसिंह सिलारापू, आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिन अशा काही महत्वपूर्ण घडामोडी दिल्या आहेत. तसेच खाली महत्वाचे प्रश्न आणि Quiz दिली आहे.


Monthly Current Affairs

नोव्हेंबेर 2023 महिन्यातील महत्वाचे प्रश्न

ऑक्टोबर 2023 महिन्यातील महत्वाचे प्रश्न

सप्टेंबर 2023 महिन्यातील महत्वाचे प्रश्न


Join Groups for Latest Updates

Join WhatsApp Group

Join Telegram Channel


Current Affairs in Marathi 10 December 2023 – Headlines

10 December 2023 Current Affairs in Marathi

National

 • जागतिक प्रदूषण रँकिंग (Global Pollution Ranking) मध्ये लाहोर शहर अव्वल स्थानी आहे. लाहोर मध्ये सकाळचा हवा गुणवत्ता निर्देशांक (AQI) 400 पर्यंत पोहचला आहे.
 • केंद्र सरकारने गावातील वारसा प्रदर्शित करण्यासाठी मेरा गाव, मेरी धरोहर प्रकल्पाचे अनावरण केले आहे.
  • या प्रकल्पाचे प्राथमिक उद्दिष्ट भारतीय गावांबद्दल माहितीचा खजिना आभासी आणि वास्तविक अशा दोन्ही अभ्यागतांना उपलब्ध करून देणे हे आहे.
 • भारत सरकारने, डायरेक्टरेट-जनरल ऑफ फॉरेन ट्रेड (DGFT) मार्फत, पिवळ्या वाटाण्यांच्या आयातीवरील निर्बंध उठवले आहेत.
  • बाजारात डाळींचा पुरवठा वाढवण्याच्या उद्देशाने ३१ मार्च २०२४ पर्यंत पिवळ्या वाटाण्याच्या ड्युटी-फ्री शिपमेंटची परवानगी दिली आहे.
 • RBI ने नुकत्याच जाहीर केलेल्या द्वीमासिक पतधोरणामध्ये रेपो रेट 6.5% कायम ठेवला आहे.
 • मिझोराम राज्याच्या मुख्यमंत्रीपदी लालदुहोमा यांनी शपथ घेतली आहे.
 • कांदा निर्यातीवर केंद्र सरकारने 31 मार्च 2024 पर्यंत बंदी घातली आहे.

Economics

 • भारताच्या फॉरेक्स रिझर्व्हने चार महिन्यांच्या अंतरानंतर $600 अब्जचा टप्पा ओलांडला आहे.
 • केंद्रीय मंत्रिमंडळाने विस्तारित व्याज समानीकरण योजनेसाठी रु. 2,500 कोटींची तरतूद केली आहे.
  • विशिष्ट क्षेत्रातील निर्यातदारांना आणि सर्व एमएसएमई उत्पादक निर्यातदारांना पाठिंबा देण्याच्या उद्देशाने ही योजना ३० जून २०२४ पर्यंत वाढवण्यात आली आहे
 • रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने UPI पेमेंट मर्यादा 1 लाखांवरून 5 लाख रुपयांपर्यंत वाढवण्याची घोषणा केली आहे.

Technology

 • संरक्षण मंत्रालयाने भारतीय तटरक्षक दलाच्या डिजिटल परिवर्तनासाठी Telecommunications Consultants India Limited (TCIL) सोबत ₹588 कोटींचा करार केला.
 • भारत 12 – 14 डिसेंबर दरम्यान वार्षिक Global Partnership on Artificial Intelligence (GPAI) शिखर परिषदेचे आयोजन करत आहे. 12 डिसेंबर 2023 रोजी माननीय पंतप्रधानांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन होणार आहे.

Sports

 • FIH पुरुष हॉकी ज्युनियर विश्वचषक 2023 मध्ये भारताने कॅनडाला १०-१ ने पराभूत करून, उपांत्यपूर्व फेरीसाठी पात्र ठरला आहे.

Awards

 • तेलंगणाचे मुख्यमंत्री ए रेवंत रेड्डी यांनी अभियांत्रिकी पदवीधर दामोदर राजनरसिंह सिलारापू यांची राज्याचे आरोग्यमंत्री म्हणून नियुक्ती केली आहे.
  • उस्मानिया विद्यापीठाच्या अभियांत्रिकी महाविद्यालयातून 1982 मध्ये त्यांनी अभियांत्रिकी पदवी मिळवलेली आहे.

Other

 • मानवाधिकार दिन 10 डिसेंबर रोजी साजरा केला जातो.
 • आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिन 9 डिसेंबर रोजी साजरा केला जातो.

Daily Current Affairs 10 December 2023 in Marathi Quiz – महत्वाचे प्रश्न

स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त आजचे महत्वाचे प्रश्न