Current Affairs | चालू घडामोडी | 11 November 2023

Current Affairs in Marathi 11 November 2023 : राष्ट्रीय शिक्षण दिन साजरा, बोंगोसागर-23, पॅरिस मास्टर्स 2023, PM Kusum Yojana, भारत-अमेरिका 2+2 च्या काही महत्वपूर्ण घडामोडी दिल्या आहेत. तसेच खाली महत्वाचे प्रश्न आणि Quiz दिली आहे.


Monthly Current Affairs

ऑक्टोबर महिन्यातील महत्वाचे प्रश्न

सप्टेंबर महिन्यातील महत्वाचे प्रश्न


Join Groups for Latest Updates

Join WhatsApp Group

Join Telegram Channel


Current Affairs in Marathi 11 November 2023 – Headlines

Headlines

National

 • भारताचे पहिले शिक्षण मंत्री मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी 11 नोव्हेंबर रोजी राष्ट्रीय शिक्षण दिन साजरा केला जातो.
  • भारतीय तंत्रज्ञान संस्था (IITs) आणि विद्यापीठ अनुदान आयोग (UGC) यासह भारतातील काही प्रतिष्ठित शैक्षणिक संस्था स्थापन करण्यातही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
 • भारतीय नौदल आणि बांगलादेश नौदल यांच्यातील द्विपक्षीय सरावाची चौथी आवृत्ती, बोंगोसागर-23, आणि दोन्ही नौदलांद्वारे समन्वित गस्त (CORPAT) ची 5वी आवृत्ती बंगालच्या उपसागरात 07 ते 09 नोव्हेंबर 2023 दरम्यान आयोजित करण्यात आली होती.
 • महाराष्ट्र राज्याने केंद्र सरकारच्या पीएम कुसुम PM Kusum Yojana योजना राबविण्यात प्रथम क्रमांक मिळवला आहे.
 • भारताचे संरक्षण मंत्री आणि परराष्ट्र मंत्री यांनी पाचव्या भारत-अमेरिका 2+2 मंत्रीस्तरीय संवादात यूएस सरकारमधील त्यांच्या समकक्षांची भेट घेतली.

Economics

 • केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) दिलेल्या माहितीनुसार 11.5 कोटी पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक न केल्यामुळे निष्क्रिय करण्यात आले आहेत.
 • निव्वळ प्रत्यक्ष कर संकलन चालू आर्थिक वर्षात आतापर्यंत 22 टक्क्यांनी वाढून ₹10.60 लाख कोटींवर पोहोचले आहे.

Technology

 • सर्व-इलेक्ट्रिक एअर टॅक्सी सेवेसाठी InterGlobe Enterprises या भारतीय कंपनीने यूएस-आधारित आर्चर एव्हिएशनशी भागीदारी केली आहे.

Sports

 • न्यूझीलंडचा रचिन रवींद्र आणि वेस्ट इंडिजच्या हेली मॅथ्यूज यांनी आयसीसी प्लेयर ऑफ द मंथ पुरस्कार जिंकला आहे.
 • सरकारी हस्तक्षेपामुळे ICC ने श्रीलंका क्रिकेटचे सदस्यत्व निलंबित केले आहे.
 • महाराष्ट्र केसरीच्या 66 व्या पर्वाचा विजेता सिकंदर शेख ठरला आहे.

Awards

 • ग्रॅमी पुरस्कार विजेत्या भारतीय गायिका आणि गीतकार फाल्गुनी शाह यांना तिच्या “अबंडन्स इन मिलेट्स” या गाण्यासाठी 2024 ग्रॅमी पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट जागतिक संगीत परफॉर्मन्स श्रेणीसाठी नामांकन मिळाले आहे.
  • “अबंडन्स इन मिलेट्स” या गाण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लिहिलेले आणि दिलेले भाषण आहे.

Other

 • नागालँडचे माजी राज्यपाल आणि भाजपचे ज्येष्ठ नेते पद्मनाभ बालकृष्ण आचार्य यांचे वयाच्या ९२ व्या वर्षी ११ नोव्हेंबर २०२३ रोजी मुंबईत निधन झाले.

Current Affairs in Marathi 11 November 2023 – Quiz | महत्वाचे प्रश्न

स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त आजचे महत्वाचे प्रश्न