Current Affairs | चालू घडामोडी | 12 December 2023

Current Affairs in Marathi 12 December 2023 मध्ये कलम 370, भारतीय कला, वास्तुकला आणि डिझाइन बिएनाले 2023, कृष्णवेणी संगीता नीरजनम, ऑनर रन – इंडियन आर्मी वेटरन्स हाफ मॅरेथॉन अशा काही महत्वपूर्ण घडामोडी दिल्या आहेत. तसेच खाली महत्वाचे प्रश्न आणि Quiz दिली आहे.


Monthly Current Affairs

नोव्हेंबेर 2023 महिन्यातील महत्वाचे प्रश्न

ऑक्टोबर 2023 महिन्यातील महत्वाचे प्रश्न

सप्टेंबर 2023 महिन्यातील महत्वाचे प्रश्न


Join Groups for Latest Updates

Join WhatsApp Group

Join Telegram Channel


Current Affairs in Marathi 12 December 2023 – Headlines

12 December 2023 Current Affairs in Marathi

National

 • पंतप्रधानांनी पहिल्या भारतीय कला, वास्तुकला आणि डिझाइन बिएनाले 2023 चे उद्घाटन लाल किल्ला येथे केले आहे.
 • Morning Consult संस्थेच्या अहवालानुसार जगातील सर्वात लोकप्रिय नेता नरेंद्र मोदी ठरले आहेत. त्यांना 76% रेटिंग मिळाली आहे.
 • राज्यघटनेच्या कलम 370 अंतर्गत जम्मू आणि काश्मीर (J&K) चा विशेष दर्जा रद्द करण्याच्या केंद्र सरकारच्या 2019 च्या निर्णयाचे समर्थन करत हा निर्णय संविधानानुसार वैध असल्याचे स्पष्ट केले.
 • विष्णू देव साई यांनी छत्तीसगड राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे.
 • केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यांनी विजयवाडा येथे ‘कृष्णवेणी संगीता नीरजनम’ कार्यक्रमाचे उद्घाटन केले आहे.
  • नामवंत संगीतकारांचे सादरीकरण, प्रादेशिक खाद्यपदार्थ, स्थानिक हस्तकला आणि हातमाग यांचे प्रदर्शन आणि विक्री असणारा हा तीन दिवसीय शास्त्रीय संगीत कार्यक्रम आहे.
 • ASEAN महिला अधिकाऱ्यांना सक्षम करण्यासाठी भारतीय लष्कराने टेबल-टॉप व्यायामाचे table-top exercise (TTX) आयोजन केले आहे.
  • हा सराव 4 ते 8 डिसेंबर दरम्यान नवी दिल्लीतील माणेकशॉ सेंटरमध्ये आयोजित करण्यात आला आहे.

Economics

 • 15 ते 19 जानेवारी दरम्यान होणारी जागतिक आर्थिक मंचाची World Economic Forum (WEF) बैठक दावोस, स्वित्झर्लंड येथे आयोजित करण्यात आली आहे.
 • ITC ही जगातील तिसरी सर्वात मौल्यवान तंबाखू कंपनी बनली आहे.
 • Invest India या भारत सरकारच्या संस्थेने 27व्या जागतिक गुंतवणूक परिषदेचे आयोजन नवी दिल्ली शहरात केले आहे.

Technology

 • भारतीय नौदलाने, विविध संरक्षण, राज्य आणि नागरी एजन्सींच्या सहकार्याने अलीकडेच मुंबई किनारपट्टीवरील प्रस्थान हा द्वि-चरण सराव पूर्ण केला आहे.
 • ग्लोबल स्टार्टउप फंडिंगच्या क्रमवारीत भारत चौथा स्थानी आहे.

Sports

 • कारगिल युद्धादरम्यान झालेल्या ऐतिहासिक लष्करी विजयाला श्रद्धांजली म्हणून, भारतीय सैन्याने 10 डिसेंबर 2023 रोजी दिल्ली येथे ‘ऑनर रन – इंडियन आर्मी वेटरन्स हाफ मॅरेथॉन’ चे आयोजन केले होते.

Awards

 • 2023 साठी अमेरिका सरकारद्वारे आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी चॅम्पियन पुरस्कार निखिल डे या भारतीयाला मिळाला आहे.

Other

 • दरवर्षी 11 डिसेंबर रोजी आंतरराष्ट्रीय पर्वत दिन साजरा केला जातो. यावर्षी, थीम आहे “पर्वतीय परिसंस्था पुनर्संचयित (Restoring Mountain Ecosystems) करणे.
 • रामनाथ कोविंद यांच्या हस्ते पंतप्रधान मोदींवरील आधारित ‘नये भारत का सामवेद’ पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले आहे.

Daily Current Affairs 12 December 2023 in Marathi Quiz – महत्वाचे प्रश्न

स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त आजचे महत्वाचे प्रश्न