Current Affairs | चालू घडामोडी | 15 December 2023

Current Affairs in Marathi 15 December 2023 मध्ये भगवंत मान सरकार, तुहाडे द्वार, तमिळ आयकॉन ‘थिरुवल्लुवर’, महालक्ष्मी योजना, एडमिरल्स कप 2023अशा काही महत्वपूर्ण घडामोडी दिल्या आहेत. तसेच खाली महत्वाचे प्रश्न आणि Quiz दिली आहे.


Monthly Current Affairs

नोव्हेंबेर 2023 महिन्यातील महत्वाचे प्रश्न

ऑक्टोबर 2023 महिन्यातील महत्वाचे प्रश्न

सप्टेंबर 2023 महिन्यातील महत्वाचे प्रश्न


Join Groups for Latest Updates

Join WhatsApp Group

Join Telegram Channel


Current Affairs in Marathi 15 December 2023 – Headlines

15 December 2023 Current Affairs in Marathi

National

 • केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी अलीकडेच उत्तर प्रदेशच्या विमान वाहतूक पायाभूत सुविधांसाठी महत्त्वाकांक्षी योजनांचे अनावरण केले. मोदी सरकार येत्या दोन वर्षांत उत्तर प्रदेश राज्यात नऊ विमानतळ बांधणार आहे.
 • मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली तेलंगण सरकारने नुकतीच ‘महालक्ष्मी योजना’ सुरू केली आहे. या अंतर्गत महिला आणि ट्रान्सजेंडर व्यक्तींसाठी मोफत बस प्रवास सेवा दिली जाणार आहे.
 • तमिळ आयकॉन ‘थिरुवल्लुवर’ यांच्या पुतळ्याचे अनावरण फ्रांस देशात करण्यात आले आहे.
 • पंजाब सरकारने ‘भगवंत मान सरकार, तुहाडे द्वार’ योजना सुरू केली आहे. या योजनेचा उद्देश अत्यावश्यक सेवा घरोघरी पोहोचवणे असुन पंजाबमधील नागरिकांना 43 गंभीर सेवांची घरोघरी वितरण केले जाणार आहे.
 • इटली देशाच्या संघाने भारतीय नौदल अकादमीमध्ये आयोजित एडमिरल्स कप 2023 जिंकला आहे.
 • जास्पर चक्रीवादळ ऑस्ट्रेलियाला धडकले आहे.

Economics

 • आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (international Monetary fund) या संस्थेने श्रीलंकेसाठी $337 दशलक्ष च्या दुसऱ्या टप्प्याचे कर्ज मंजूर केले आहे.
 • फॉक्सकॉन कंपनीने कर्नाटकात आयफोन उत्पादनासाठी $1.67 billion ची गुंतवणूक केली आहे.

Technology

 • लंडनमधील सस्टेनेबल डिझाइन आणि मॅन्युफॅक्चरिंगमधील इनोव्हेशन सेंटर उभारण्यासाठी टाटा स्टील कंपनी 100 कोटींची गुंतवणूक करणार आहे.

Sports

 • मोहम्मद शमीला अर्जुन पुरस्कारासाठी नामांकन मिळाले असून सात्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांना मेजर ध्यानचंद खेल रत्न पुरस्कारासाठी नामांकन मिळाले आहे.

Awards

 • मर्सर या कंपनीच्या अहवालानुसार राहणीमानाचा दर्जा निर्देशांक (Quality of Living Index) 2023 मध्ये भारतातील हैदराबाद शहर अव्वल स्थानी आहे तर
  • पुणे शहर भारतात दुसऱ्या स्थानी आहे असुने जगात 154 व्या स्थानी आहे.
  • व्हिएन्ना (ऑस्ट्रिया) शहर जगात प्रथम स्थानी आहे.

Other

 • परमा सेन यांची PFRDA बोर्डाची अर्धवेळ सदस्य म्हणून नियुक्ती
 • एअर इंडियाने फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा ​​यांनी डिझाइन केलेल्या केबिन, कॉकपिट क्रूसाठी नवीन गणवेशाचे अनावरण केले आहे.

Daily Current Affairs 15 December 2023 in Marathi Quiz – महत्वाचे प्रश्न

स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त आजचे महत्वाचे प्रश्न