Current Affairs | चालू घडामोडी | 16 December 2023

Current Affairs in Marathi 16 December 2023 मध्ये नायहोम पुरस्कार, युनायटेड वर्ल्ड रेसलिंग, Rising Star of the Year, इंदिरा गांधी शांतता पुरस्कार 2023, आंतरराष्ट्रीय टेनिस हॉल ऑफ फेम अशा काही महत्वपूर्ण घडामोडी दिल्या आहेत. तसेच खाली महत्वाचे प्रश्न आणि Quiz दिली आहे.


Monthly Current Affairs

नोव्हेंबेर 2023 महिन्यातील महत्वाचे प्रश्न

ऑक्टोबर 2023 महिन्यातील महत्वाचे प्रश्न

सप्टेंबर 2023 महिन्यातील महत्वाचे प्रश्न


Join Groups for Latest Updates

Join WhatsApp Group

Join Telegram Channel


Current Affairs in Marathi 16 December 2023 – Headlines

16 December 2023 Current Affairs in Marathi

National

 • पुणे शहराणे सर्वात मोठा वाचनाचा कार्यक्रम आयोजित करून चीनला मागे टाकत ‘गिनिज वर्ल्ड रेकॉर्ड’ केला आहे. यात एकूण 3,066 पालक त्यांच्या मुलांसोबत वाचण्यासाठी जमले होते.
 • शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी परीक्षा पे चर्चाच्या सातव्या आवृत्तीसाठी अर्ज सुरू केल्याची अधिकृत घोषणा केली आहे.
 • भारतीय नौदलाने 22 वर्ष जुने INS तरमुगली जहाज पुन्हा नौदलात समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला आहे.
 • नागरी विमान वाहतूक महासंचालनालयने (Directorate General of Civil Aviation -DGCA) अयोध्या विमानतळासाठी परवाना दिला आहे.
 • इंदिरा गांधी शांतता पुरस्कार 2023 प्रसिद्ध शास्त्रीय पियानोवादक आणि कंडक्टर डॅनियल बेरेनबोइम आणि पॅलेस्टिनी शांतता कार्यकर्ते अली अबू अव्वाड यांना जाहीर झाला आहे.
 • कोका-कोला कंपनीने गुजरात सरकार सोबत ₹3,000 करोंड रुपयांच्या ज्यूस आणि एरेटेड बेव्हरेजेस सुविधा राजकोट येथे उभारण्यासाठी करार केला आहे.

Economics

 • स्वच्छ भारत मिशन-अर्बन 2.0 अंतर्गत 100 शहरांमध्ये स्वच्छता आणि कचरा व्यवस्थापनाला चालना देण्यासाठी साठी Asian Development Bank बँकेने 1600 कोटींचे कर्ज भारताला दिले आहे.
 • बेन अँड कंपनी आणि फ्लिपकार्टच्या सहकार्याने तयार केलेल्या अहवालानुसार भारतातील ई-कॉमर्स क्षेत्र 2028 पर्यंत $160 billion उलाढाल करणार आहे.
 • FY23 मध्ये महिला EPFO ​​सदस्यांची संख्या 28.69 लाख झाली आहे.

Technology

 • हुरुन इंडियाच्या ‘टॉप 100 अंडर 30 लिस्ट 2023’ च्या यादीत कैवल्य वोहरा आणि आदित पालिचा यांनी प्रथम स्थान पटकावले आहे. हे दोघेही झेप्टो Zepto कंपनीचे संथापक आहेत.

Sports

 • आंतरराष्ट्रीय टेनिस हॉल ऑफ फेम च्या यादीत विजय अमृतराज आणि लिएंडर पेस या भारतीय टेनिस खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे.
 • BCCI ने MS धोनीची आयकॉनिक नंबर 7 जर्सी निवृत्त करण्याचा निर्णय घेतला आहे.
 • युनायटेड वर्ल्ड रेसलिंगने (UWW) अंतीम पंघल या भारतीय कुस्तीपटूला महिला गटातील Rising Star of the Year घोषित केले आहे.

Awards

 • जगातील टॉप ५० आशियाई सेलिब्रिटी च्या यादीत शाहरुख खान अव्वल स्थानावर आहे.
 • रसायनशास्त्र शिक्षण उत्कृष्टतेसाठी दिला जाणारा नायहोम पुरस्कार सविता लाडगे यांना मिळाला आहे.

Other

 • अणुऊर्जा विभाग (DAE) आणि बेंगळुरू-आधारित IDRS लॅबमधील शास्त्रज्ञांनी पेल्विक कॅन्सरच्या उपचारासाठी ऍक्टोसाइट गोळ्या विकसित करण्यासाठी भागीदारी केली आहे.

Daily Current Affairs 16 December 2023 in Marathi Quiz – महत्वाचे प्रश्न

स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त आजचे महत्वाचे प्रश्न