Current Affairs | चालू घडामोडी | 21 December 2023

Current Affairs in Marathi 21 December 2023 मध्ये वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, (RazorPay), कॅशफ्री (Cashfree) , Accenture जनरेटिव्ह एआय स्टुडिओ, इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग, 29व्या कोलकाता आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव अशा काही महत्वपूर्ण घडामोडी दिल्या आहेत. तसेच खाली महत्वाचे प्रश्न आणि Quiz दिली आहे.


Monthly Current Affairs

नोव्हेंबेर 2023 महिन्यातील महत्वाचे प्रश्न

ऑक्टोबर 2023 महिन्यातील महत्वाचे प्रश्न

सप्टेंबर 2023 महिन्यातील महत्वाचे प्रश्न


Join Groups for Latest Updates

Join WhatsApp Group

Join Telegram Channel


Current Affairs in Marathi 21 December 2023 – Headlines

21 December 2023 Current Affairs in Marathi

National

 • वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) ने JN.1 कोविड सबव्हेरिअंटचे विकसित होत असलेले स्वरूप आणि जागतिक स्तरावर श्वसन रोगांच्या वाढीबद्दल चेतावणी जारी केली आहे.
 • कोलोरॅडो सर्वोच्च न्यायालयाने,अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना अमेरिका संविधानाच्या बंडाच्या कलमानुसार अध्यक्षपदासाठी निवडणुकीसाठी अपात्र घोषित केले आहे.
 • विस्थापितांचा आवाज मांडणाऱ्या कृष्णात खोत यांच्या ‘रिंगाण’ला साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला आहे.
 • केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, भारतात कोविड प्रकरणांची संख्या 2,311 वरून 2,669 पर्यंत वाढली आहे. 594 नवीन कोविड प्रकरणे नोंदवली गेली आहेत.

Economics

 • SBI चे बाजारमूल्य Rs 6 ट्रिलियन (6 लाख कोटी) पर्यंत वाढले आहे.
 • भारतीय बँकांमध्ये दावा न केलेल्या ठेवी ₹42,270 कोटींपर्यंत वाढल्या असून यात 2023 मध्ये 28% वाढ झाली आहे.
 • पेमेंट एग्रीगेटर म्हणून काम करण्यासाठी रेझरपे (RazorPay), कॅशफ्री (Cashfree) या कंपनीला रिजर्व बँक ऑफ इंडिया कडून परवानगी मिळाली आहे.

Technology

 • इंडिगो वर्षभरात 100 दशलक्ष प्रवाशांची वाहतूक करणारी पहिली भारतीय एअरलाइन बनली आहे. प्रवासी वाहतुकीद्वारे जगातील टॉप-10 एअरलाइन्समध्ये आपले स्थान मजबूत केले आहे.
 • सेमीकंडक्टर कंपनी MediaTek आणि Nvidia यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) ला ऑटोमोटिव्ह उद्योगात आघाडीवर आणण्याच्या उद्देशाने अलीकडेच भागीदारी केली आहे.
 • व्यावसायिक सेवांमध्ये जागतिक आघाडीवर असलेल्या Accenture ने भारतातील बेंगळुरू येथे जनरेटिव्ह एआय स्टुडिओची स्थापना करून कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) क्षेत्रात लक्षणीय प्रगती केली आहे.

Sports

 • इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीगमध्ये मुंबई संघाची मालकी अमिताभ बच्चन यांनी विकत घेतली आहे.

Awards

 • 29व्या कोलकाता आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (KIFF) इस्त्रायली चित्रपट ‘चिल्ड्रन ऑफ नोबडी’ ने सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठी प्रतिष्ठित गोल्डन रॉयल बंगाल टायगर पुरस्कार मिळवला. हा चित्रपट Erez-Tadmor यांनी लिहीला आणि दिग्दर्शित केला आहे.
 • वरिष्ठ IPS अधिकारी महेश्वर दयाल यांनी कारागृह आणि सुधारात्मक सेवा महासंचालकपदाचा पदभार स्वीकारला आहे.

Other

 • आंतरराष्ट्रीय मानवी एकता दिवस 2023, 20 डिसेंबर रोजी साजरा केला जातो.
 • केंद्रीय वन, पर्यावरण आणि हवामान बदल मंत्री भूपिंदर यादव यांनी दिलेल्या आकडेवारीनुसार 2022 मध्ये वाघांच्या हल्ल्यांमुळे भारतात 112 मृत्यू झाले आहेत. यात महाराष्ट्रात सर्वाधिक 85 तर उत्तरप्रदेशात 11 मृत्यू झाले आहेत.

Daily Current Affairs 21 December 2023 in Marathi Quiz – महत्वाचे प्रश्न

स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त आजचे महत्वाचे प्रश्न