Current Affairs | चालू घडामोडी आणि महत्वाचे प्रश्न | 03 January 2024

Current Affairs In Marathi 3 January 2024 मध्ये हमीद करझाई, मैत्री मिशन-4, खरसावन हत्याकांड, संरक्षण संशोधन आणि विकास संस्था, जागतिक कुटुंब दिन, अंडर-19 स्कॉटिश ज्युनियर ओपन 2023 अशा चालू घडामोडींवर आधारित हे प्रश्न दिले आहेत.


MPSC Current Affairs In Marathi 3 January 2024

सर्व स्पर्धा परीक्षा, पोलिस भरती, तलाठी भरती, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सर्व पदांसाठी दररोजच्या चालू घडामोडीवर आधारित उपयुक्त प्रश्न राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय, अर्थशास्त्र, पुरस्कार, नियुक्त्या, क्रिडा, मनोरंजन आणि दिनविशेष खाली सविस्तर पणे दिले आहेत.


Monthly Current Affairs

जानेवारी 2024 महिन्यातील महत्वाचे प्रश्न

डिसेंबर 2023 महिन्यातील महत्वाचे प्रश्न

नोव्हेंबेर 2023 महिन्यातील महत्वाचे प्रश्न

ऑक्टोबर 2023 महिन्यातील महत्वाचे प्रश्न

सप्टेंबर 2023 महिन्यातील महत्वाचे प्रश्न


Join Groups for Latest Updates

Join WhatsApp Group

Join Telegram Channel


Current Affairs in Marathi 3 January 2024 – Headlines

3 January 2024 Current Affairs in Marathi

National

 • डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगोचे (DRC) अध्यक्ष फेलिक्स त्शिसेकेडी यांनी 70 टक्क्यांहून अधिक मतांनी पुन्हा निवडणूक जिंकली असून कोंगो देशाचे राष्ट्रपती म्हणून पुन्हा नियुक्ती करण्यात आली आहे.
  • काँगो देशाबद्दल माहिती :
   • राजधानी- किन्शासा
   • चलन- काँगोलीज फ्रँक
   • अध्यक्ष- फेलिक्स शिसेकेडी
   • पंतप्रधान- सम लुकोंडे
   • अधिकृत भाषा – फ्रेंच
 • गुजरातने नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी राज्यातील 108 ठिकाणी एकाच वेळी सामूहिक सूर्यनमस्कार करण्याचा गिनीज विक्रम केला आहे.
  • प्रतिष्ठित मोढेरा सूर्य मंदिरात आयोजित राज्यस्तरीय कार्यक्रमात 2500 हून अधिक लोकांनी सूर्यनमस्कार केले.
  • गुजरात राज्याबद्दल माहिती:
   • राजधानी – गांधीनगर
   • मुख्यमंत्री- भूपेंद्र रजनीकांत पटेल
   • राज्यपाल- आचार्य देवव्रत
 • जयपूर येथे 5 जानेवारीपासून सुरू होणाऱ्या तीन दिवसीय पोलीस महासंचालक आणि महानिरीक्षकांच्या वार्षिक परिषदेला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत.
 • उत्तर प्रदेशाच्या वाराणसी शहरात संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी मुलींसाठीच्या पहिल्या सैनिक शाळेचे उद्घाटन केले आहे.
 • संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने अफगाणिस्तानातील शांततेसाठी विशेष दूत म्हणून हमीद करझाई यांना नियुक्त केले आहे.

Economics

 • वित्त मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार डिसेंबर 2023 मध्ये एकूण वस्तू आणि सेवा कर (GST) संकलन 1,64,882 कोटी रुपये होते, जे डिसेंबर 2022 मधील 149,507 कोटी रुपयांच्या तुलनेत 10.3 टक्के जास्त आहे.
  • जुलै 2023 – 1,65,105 कोटी
  • ऑगस्ट 2023 – 1,59,069 कोटी
  • सप्टेंबर 2023 – 1,62,712 कोटी
  • ऑक्टोबर 2023 – 1,72,003 कोटी
  • नोव्हेंबर 2023 – 1,67,929 कोटी
  • डिसेंबर 2023 – 1,64,882 कोटी

Technology

 • आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी गुवाहाटी येथून 200 इलेक्ट्रिक बसेसना हिरवा झेंडा दाखवला.
 • रिलायन्स पॉवरने अरुणाचल प्रदेशातील 1,200 मेगावॅटचा कलाई II जलविद्युत प्रकल्प रु. 128.39 कोटींना THDC इंडियाला विकण्याचा करार केला आहे.

Sports

 • दिल्लीच्या अनाहत सिंगने एडिनबर्ग येथे आयोजित 2023 स्कॉटिश ज्युनियर ओपन स्क्वॉशमध्ये मुलींच्या 19 वर्षांखालील विजेतेपद पटकावले आहे.
 • समरकंद, उझबेकिस्तान येथे आयोजित जागतिक जलद बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धा 2023 मध्ये भारताच्या कोनेरू हम्पी हिने रौप्य पदक जिंकले आहे.

Awards

 • ज्येष्ठ बँकर अशोक वासवानी यांनी कोटक महिंद्रा बँकेचे व्यवस्थापकीय संचालक (MD) आणि CEO म्हणून पदभार स्वीकारला आहे.
 • सरकारी मालकीच्या पॉवर ग्रिड कॉर्पोरेशनने रवींद्र कुमार त्यागी यांची नवीन अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक (CMD) म्हणून नियुक्ती केली आहे.

Other

 • जागतिक शांतता दिवस दरवर्षी 1 जानेवारी रोजी साजरा केला जातो.
 • कॉपीराइट कायदा दिवस दरवर्षी 1 जानेवारी रोजी साजरा केला जातो.
 • संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO) ने 66 वा स्थापना दिवस 1 जानेवारी 2024 रोजी साजरा केला आहे.

चालू घडामोडीवरील महत्वाचे प्रश्न – 3 January 2024

खाली चालू घडामोडी वरील काही महत्वाचे प्रश्न वास्तुनिष्ट स्वरूपात दिले आहेत. त्याचा सराव करा तसेच इतर दिवसांच्या घडामोडी आणि त्यावरील प्रश्न या संकेतस्थळाच्या Quiz आणि current affairs section मध्ये उपलब्ध करून दिल्या आहेत. Current Affairs In Marathi 3 January 2024

Current Affairs Quiz In Marathi 3 January 2024

Q1. कोणत्या देशाने अलीकडेच इस्रायलवर नरसंहाराचा आरोप करत आंतरराष्ट्रीय न्यायालयात खटला दाखल केला आहे?

(A) इजिप्त
(B) कतार
(C) इराण
(D) दक्षिण आफ्रिका

Ans: दक्षिण आफ्रिका


Q2. अलीकडेच, भारतीय नौदलाच्या कोणत्या समुद्रशास्त्रीय संशोधन जहाजाने सागर मैत्री मिशन-4 ओमानला निघाले आहे?

(A) INS संध्याक
(B) INS सागरध्वनी
(C) INS ध्रुव
(D) INS मकर

Ans: INS सागरध्वनी


Q3. नुकतेच चर्चेत असलेले खरसावन हत्याकांड सध्याच्या कोणत्या राज्यात घडले?

(A) ओडिशा
(B) बिहार
(C) झारखंड
(D) मध्य प्रदेश

Ans: झारखंड


Q4. खालीलपैकी कोणता देश BRICS संघटनेचा सदस्य देश नाही?

(A) ब्राजील
(B) रशिया
(C) आयरलॅंड
(D) चीन

Ans: आयरलॅंड


Q5. जानेवारी 2024 मध्ये BRICS संघटनेची सदस्य देशांची संख्या किती होणार आहे?

(A) 7
(B) 8
(C) 9
(D) 10

Ans: 10


Q6. कोणत्या राज्याने सामूहिक सूर्यनमस्कार करून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे?

(A) महाराष्ट्र
(B) उत्तर प्रदेश
(C) राजस्थान
(D) गुजरात

Ans: गुजरात


Q7. संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO) ने 66 वा स्थापना दिवस कधी साजरा केला?

(A) 1 जानेवारी 2024
(B) 2 जानेवारी 2024
(C) 31 डिसेंबर 2023
(D) 30 डिसेंबर 2023

Ans: 1 जानेवारी 2024


Q8. जागतिक कुटुंब दिन कधी साजरा केला जातो ?

(A) 1 जानेवारी 2024
(B) 2 जानेवारी 2024
(C) 31 डिसेंबर 2023
(D) 30 डिसेंबर 2023

Ans: 1 जानेवारी 2024


Q9. समरकंद, उझबेकिस्तान येथे आयोजित जागतिक जलद बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धा 2023 मध्ये भारताच्या कोनेरू हम्पी हिने कोणते पदक जिंकले आहे?

(A) सुवर्ण
(B) रौप्य
(C) कांस्य
(D) यापैकी नाही

Ans: रौप्य


Q10. एडिनबर्ग येथे आयोजित मुलींचे अंडर-19 स्कॉटिश ज्युनियर ओपन 2023 चे विजेतेपद कोणी पटकावले आहे?

(A) दीपिका पल्लीकल
(B) पी व्ही सिंधु
(C) अनाहत सिंग
(D) अश्विनी पोणप्पा

Ans: अनाहत सिंग


Q11. अग्निशमन सेवा, नागरी संरक्षण आणि होमगार्ड्सचे महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?

(A) अभिषेक सिंग
(B) विनय सागर
(C) विवेक श्रीवास्तव
(D) अशोक खेमका

Ans: विवेक श्रीवास्तव


Q12. स्किनकेअर ब्रँड ‘निव्हिया इंडिया’ द्वारे नवीन व्यवस्थापकीय संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?

(A) निधी सक्सेना
(B) आयुषी कपूर
(C) गीता राजन
(D) गीतिका मेहता

Ans: गीतिका मेहता


Q13. उत्तर प्रदेशाच्या कोणत्या शहरात संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी मुलींसाठीच्या पहिल्या सैनिक शाळेचे उद्घाटन केले?

(A) लखनौ
(B) मुरादाबाद
(C) वाराणसी
(D) मथुरा

Ans: वाराणसी


Q14. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने अफगाणिस्तानातील शांततेसाठी विशेष दूत कोणाला नियुक्त केले आहे?

(A) जो बिडेन
(B) हमीद करझाई
(C) एस जयशंकर
(D) नरेंद्र मोदी

Ans: हमीद करझाई


Q15. डिसेंबरमध्ये जीएसटी संकलन 10% वाढून किती झाले आहे?

(A) 1.3 लाख कोटी
(B) 1.5 लाख कोटी
(C) 1.64 लाख कोटी
(D) 1.75 लाख कोटी

Ans: 1.64 लाख कोटी


विडियो पाहा : Marathi Current Affairs