Current Affairs | चालू घडामोडी | 30 December 2023

Current Affairs in Marathi 30 December 2023 मध्ये भारत ब्रँड, हरित हायड्रोजन धोरण-2023, करबी XPoSat, वुल्फगँग शॅकेबल, प्रजा पालन अशा काही महत्वपूर्ण घडामोडी दिल्या आहेत. तसेच खाली महत्वाचे प्रश्न आणि Quiz दिली आहे.


Monthly Current Affairs

नोव्हेंबेर 2023 महिन्यातील महत्वाचे प्रश्न

ऑक्टोबर 2023 महिन्यातील महत्वाचे प्रश्न

सप्टेंबर 2023 महिन्यातील महत्वाचे प्रश्न


Join Groups for Latest Updates

Join WhatsApp Group

Join Telegram Channel


Current Affairs in Marathi 30 December 2023 – Headlines

30 December 2023 Current Affairs in Marathi

National

 • स्वच्छ ऊर्जा आणि हवामान बदलाचा सामना करण्यासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अधिकाऱ्यांना हरित हायड्रोजन धोरण-2023 धोरण लागू करण्याचे निर्देश दिले आहेत.
 • तांदळाच्या वाढत्या महागाईला तोंड देण्यासाठी, भारत सरकारने भारत ब्रँड नावाने स्वस्त दरात तांदूळ विकण्याचा निर्णय घेतला आहे.
 • नागरिकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी तेलंगणा सरकारने प्रजा पालन कार्यक्रम सुरू केला आहे.
 • आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या डेटावरून आयुष्मान भारत योजनेच्या यशामध्ये महिलांचे महत्त्वपूर्ण योगदान दिसून येते, एकूण आयुष्मान कार्डांपैकी सुमारे 49% महिलांनी कार्डस बनवले आहेत.
 • माजी क्रिकेटपटू अंबाती रायडू यांनी वायएस जगन मोहन रेड्डी यांच्या युवाजन श्रमिका रायथू काँग्रेस पार्टी (YSRCP) पक्षात प्रवेश केला आहे.

Economics

 • भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ने ICICI बँक, HDFC बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) या बँकाना देशांतर्गत प्रणालीगत महत्त्वाच्या बँका (D-SIBs -Domestic Systemically Important Banks) म्हणून जाहीर केले आहे.

Technology

 • इस्रो 1 जानेवारी 2024 रोजी भारताचा पहिला एक्स-रे पोलरीमीटर उपग्रह प्रक्षेपित करणार आहे.
  • इस्रोने आखलेल्या भारताच्या या मोहिमेला XPoSat मिशन नाव देण्यात आले आहे.
 • सीएनएन बिझनेसच्या ‘सीईओ ऑफ द इयर’ म्हणून सत्या नडेला यांची निवड झाली आहे.

Sports

 • 2024 च्या खेलो इंडिया युथ गेम्समध्ये प्रथमच स्क्वॅश खेळाचा समावेश करण्यात आला आहे.

Awards

 • अलीकडेच IPS अधिकारी ‘नीना सिंह’ यांची CISF च्या पहिल्या महिला महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

Other

 • नुकतेच जर्मनचे प्रसिद्ध राजकारणी वुल्फगँग शॅकेबल यांचे 81 व्या वर्षी निधन झाले.

Daily Current Affairs 30 December 2023 in Marathi Quiz – महत्वाचे प्रश्न

स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त आजचे महत्वाचे प्रश्न