Current Affairs | चालू घडामोडी आणि महत्वाचे प्रश्न | 05 January 2024

Current Affairs In Marathi 5 January 2024 मध्ये ISCC-Plus, राहत वाणी केंद्र, डेब्रिगढ वन्यजीव अभयारण्यचा स्वदेश दर्शन 2.0, Patriot air defense missiles, बालिका दीन, चिरंजीवी योजना, जागतिक ब्रेल दिन अशा चालू घडामोडींवर आधारित हे प्रश्न दिले आहेत.


MPSC Current Affairs In Marathi 5 January 2024

सर्व स्पर्धा परीक्षा, पोलिस भरती, तलाठी भरती, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सर्व पदांसाठी दररोजच्या चालू घडामोडीवर आधारित उपयुक्त प्रश्न राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय, अर्थशास्त्र, पुरस्कार, नियुक्त्या, क्रिडा, मनोरंजन आणि दिनविशेष खाली सविस्तर पणे दिले आहेत.


Monthly Current Affairs

जानेवारी 2024 महिन्यातील महत्वाचे प्रश्न

डिसेंबर 2023 महिन्यातील महत्वाचे प्रश्न

नोव्हेंबेर 2023 महिन्यातील महत्वाचे प्रश्न

ऑक्टोबर 2023 महिन्यातील महत्वाचे प्रश्न

सप्टेंबर 2023 महिन्यातील महत्वाचे प्रश्न


Join Groups for Latest Updates

Join WhatsApp Group

Join Telegram Channel


Current Affairs in Marathi 5 January 2024 – Headlines

5 January 2024 Current Affairs in Marathi

National

 • उत्तर प्रदेश राज्याचे मुख्य सचिव दुर्गा शंकर मिश्रा यांनी आपत्तीच्या पूर्व सूचना देण्यासाठी ‘राहत वाणी केंद्र’ (RVC) चे उद्घाटन केले आहे.
  • आपत्तीची लवकर सूचना देणे, अंदाज देणे, वेळेवर मदत वितरण सुनिश्चित करणे आणि नुकसानग्रस्तांना थेट लाभ हस्तांतरण करणे हे त्याचे उद्दिष्ट आहे.
  • लखनऊच्या लालबाग भागात हे स्थापन करण्यात आले असून तेथे सहा कर्मचाऱ्यांची टीम कार्यरत आहे.
 • राजस्थानने त्यांची आरोग्य विमा योजना चिरंजीवी योजनेचे एकत्रीकरण केंद्र सरकारच्या आयुष्मान भारत योजनेशी करण्याचा निर्णय घेतला आहे.
 • आत्मनिर्भर भारत मोहिमे अंतर्गत केंद्र सरकारने महाराष्ट्र राज्यातील सोलापूर जिल्हा ज्वारी उत्पादन व प्रक्रिया उद्योगासाठी निवडला आहे.
 • NATO ने रशियाकडून धोका लक्षात घेऊन सुरक्षा मजबूत करण्यासाठी 1,000 Patriot air defense missiles खरेदी करण्यासाठी युरोपमधील सदस्य देशांकडून $5.5 अब्ज डॉलरच्या करारावर स्वाक्षरी करण्याची घोषणा केली.
  • मॉस्कोने युक्रेनवर क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ले सुरू केल्यामुळे हा करार झाला आहे. अमेरिका आणि जर्मनी सारख्या राष्ट्रांनी पुरवलेल्या Patriot defense missiles Kyiv 11 महिन्यांच्या युद्धात रशियाचे हल्ले पाडण्यासाठी केला आहे.
 • पर्यटन मंत्रालयाने डेब्रिगढ वन्यजीव अभयारण्यचा स्वदेश दर्शन 2.0 योजनेत समावेश केला आहे.
  • स्वदेश दर्शन कार्यक्रम 2015 मध्ये भारत सरकारच्या पर्यटन मंत्रालयाने सुरू केला होता, ही 100% केंद्राने अनुदानित योजना आहे.
  • डेब्रिगढ वन्यजीव अभयारण्य ओडिशाच्या बरगड जिल्ह्यातील हिराकुड धरण (महानदी) जवळ आहे.

Economics

 • फ्रान्स आणि जर्मनी भारताच्या अटल मिशन फॉर रिजुवेनेशन अँड अर्बन ट्रान्सफॉर्मेशन (AMRUT) 2.0 योजनेसाठी 100 दशलक्ष युरोची मदत करणार आहेत.

Technology

 • रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडची (RIL) जामनगर रिफायनरी ISCC-Plus प्रमाणित रासायनिक पुनर्वापरित पॉलिमर तयार करणारी भारतातील पहिली रिफायनरी बनली आहे.
  • गुजरात राज्यात असलेली RIL ची जामनगर रिफायनरी आता ISCC-Plus प्रमाणित झाली आहे. ISCC Plus हे आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यताप्राप्त प्रमाणपत्र आहे.

Sports

 • दीप्ती शर्मा या भारतीय महिला क्रिकेट खेळाडू ने अंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेट (ODI) मध्ये 100 विकेट पूर्ण केल्या आहेत.

Awards

 • व्हाइस अॅडमिरल दिनेश के त्रिपाठी यांनी अधिकृतपणे नौदल उपप्रमुख पदाची जबाबदारी स्वीकारली.
  • यापूर्वी ते पश्चिम नौदल कमांडचे फ्लॅग ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ म्हणून काम करत होते. व्हाइस अॅडमिरल त्रिपाठी 1 जुलै 1985 रोजी भारतीय नौदलात रुजू झाले.
  • सध्या भारतीय नौदल प्रमुख अॅडमिरल आर. हे हरी कुमार आहेत.
 • सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती, न्यायमूर्ती बी.आर. गवई यांची राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण (NALSA) ने सर्वोच्च न्यायालयाच्या विधी सेवा समितीचे अध्यक्ष म्हणून नामनिर्देशन केले आहे.
  • न्यायमूर्ती गवई यांनी वरिष्ठ न्यायमूर्ती न्यायमूर्ती संजीव खन्ना यांची जागा घेतली आहे.

Other

 • बालिका दिवस दरवर्षी 3 जानेवारी रोजी साजरा केला जातो.
 • पंतप्रधान विश्वकर्मा योजना लागू करणारा पहिला केंद्रशासित प्रदेश जम्मू आणि काश्मीर ठरला आहे.
 • दरवर्षी 4 जानेवारी हा दिवस जागतिक ब्रेल दिन म्हणून साजरा केला जातो, जे ब्रेलचे महत्त्व वाढवते, जे अंध आणि अर्धवट दृष्टी असलेल्या लोकांसाठी संवादाचे माध्यम आहे.

चालू घडामोडीवरील महत्वाचे प्रश्न – 5 January 2024

खाली चालू घडामोडी वरील काही महत्वाचे प्रश्न वास्तुनिष्ट स्वरूपात दिले आहेत. त्याचा सराव करा तसेच इतर दिवसांच्या घडामोडी आणि त्यावरील प्रश्न या संकेतस्थळाच्या Quiz आणि current affairs section मध्ये उपलब्ध करून दिल्या आहेत. Current Affairs In Marathi 5 January 2024

Current Affairs Quiz In Marathi 5 January 2024

Q1. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कोणत्या ठिकाणी पहिल्या फ्लोटिंग रेस्टॉरंटचे उद्घाटन केले आहे?

(A) वाराणसी
(B) प्रयागराज
(C) लखनऊ
(D) आग्रा

Ans: प्रयागराज


Q2. राजस्थानने त्यांची आरोग्य विमा योजना चिरंजीवी योजनेचे एकत्रीकरण केंद्र सरकारच्या कोणत्या योजनेशी करण्याचा निर्णय घेतला आहे?

(A) प्रधानमंत्री जन धन योजना
(B) सुकन्या समृद्धी योजना
(C) आयुष्मान भारत
(D) प्रधानमंत्री आवास योजना

Ans: आयुष्मान भारत


Q3. फ्रान्स आणि जर्मनी भारताच्या कोणत्या योजनेसाठी 100 दशलक्ष युरोची मदत करणार आहे ?

(A) PMAY
(B) AMRUT
(C) PMMY
(D) SSY

Ans: अटल मिशन फॉर रिजुवेनेशन अँड अर्बन ट्रान्सफॉर्मेशन (AMRUT) 2.0


Q4. पंतप्रधान विश्वकर्मा योजना लागू करणारा पहिला केंद्रशासित प्रदेश कोणता?

(A) दिल्ली
(B) जम्मू आणि काश्मीर
(C) लडाख
(D) चंडीगढ

Ans: जम्मू आणि काश्मीर


Q5. भारतात सिरप स्वरूपात उपलब्ध असलेल्या पहिल्या केमो औषधाचे नाव काय आहे?

(A) Dolo
(B) Prevall
(C) Dabur
(D) D Cold

Ans: Prevall


Q6. आत्मनिर्भर भारत मोहिमे अंतर्गत महाराष्ट्र राज्यातील कोणता जिल्हा ज्वारी उत्पादन व प्रक्रिया उद्योगासाठी निवडला आहे?

(A) सातारा
(B) कोल्हापूर
(C) सांगली
(D) सोलापूर

Ans: सोलापूर


Q7. नुकत्याच कोणत्या भारतीय महीला क्रिकेट खेळाडू ने अंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेट (ODI) मध्ये 100 विकेट पूर्ण केल्या आहेत?

(A) स्मुर्ती मानधना
(B) दीप्ती शर्मा
(C) रेणूका सिंग
(D) स्नेह राणा

Ans: दीप्ती शर्मा


Q8. दरवर्षी ‘जागतिक ब्रेल दिन’ कधी साजरा केला जातो?

(A) 1 जानेवारी 2024
(B) 2 जानेवारी 2024
(C) 3 जानेवारी 2024
(D) 4 जानेवारी 2024

Ans: 4 जानेवारी 2024


Q9. कमलताई परदेशी यांचे नुकतेच निधन झाले. त्या कोणत्या नावाने प्रसिद्ध होत्या?

(A) मसाला क्वीन
(B) किचन क्वीन
(C) बिझनेस क्वीन
(D) तंत्रज्ञान क्वीन

Ans: मसाला क्वीन


Q10. 3 जानेवारी हा दिवस कोणता दिन म्हणुन साजरा करण्यात येतो?

(A) पृथ्वी दिन
(B) युवक दिन
(C) बालिका दिन
(D) एकता दिन

Ans: बालिका दीन


Q11. आपत्तीच्या पूर्व सूचना देण्यासाठी ‘राहत वाणी केंद्र’ कोणत्या राज्यात सुरू करण्यात आले?

(A) बिहार
(B) उत्तराखंड
(C) उत्तर प्रदेश
(D) मध्य प्रदेश

Ans: उत्तर प्रदेश


Q12. ISCC-Plus प्रमाणपत्र प्राप्त करणारी पहिली कंपनी कोण बनली आहे?

(A) टाटा समूह
(B) महिंद्रा समूह
(C) अदानी समूह
(D) रिलायन्स इंडस्ट्रीज

Ans: रिलायन्स इंडस्ट्रीज


Q13. स्वदेश दर्शन 2.0 योजनेत नुकतेच कोणते वन्यजीव अभयारण्य समाविष्ट करण्यात आले?

(A) डेब्रिगढ वन्यजीव अभयारण्य
(B) सुनाबेडा वन्यजीव अभयारण्य
(C) हदगढ वन्यजीव अभयारण्य
(D) कोटागड वन्यजीव अभयारण्य

Ans: डेब्रिगढ वन्यजीव अभयारण्य


Q14. भारतीय नौदल कर्मचारी उपप्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?

(A) दिनेश के त्रिपाठी
(B) संजय जसजित सिंग
(C) किरण देशमुख
(D) कृष्णा स्वामीनाथन

Ans:दिनेश के त्रिपाठी


Q15. NATO ने कोणत्या क्षेपणास्त्र संरक्षण प्रणालीचे 1,000 युनिट्स खरेदी करण्याचा करार केला आहे?

(A) Patriot
(B) Pruthvi
(C) S-400
(D) THAAD

Ans: Patriot


विडियो पाहा : Marathi Current Affairs