Current Affairs | चालू घडामोडी | 9 December 2023

Current Affairs in Marathi 9 December 2023 मध्ये डॉ. बी.आर. आंबेडकर मेणाचा पुतळा, Best Personality- Empowerment Of Differently-Abled, सूर्य नूतन, ग्रीन युनिव्हर्सिटी अवॉर्ड अशा काही महत्वपूर्ण घडामोडी दिल्या आहेत. तसेच खाली महत्वाचे प्रश्न आणि Quiz दिली आहे.


Monthly Current Affairs

नोव्हेंबेर 2023 महिन्यातील महत्वाचे प्रश्न

ऑक्टोबर 2023 महिन्यातील महत्वाचे प्रश्न

सप्टेंबर 2023 महिन्यातील महत्वाचे प्रश्न


Join Groups for Latest Updates

Join WhatsApp Group

Join Telegram Channel


Current Affairs in Marathi 9 December 2023 – Headlines

9 December 2023 Current Affairs in Marathi

National

 • डॉ. बी.आर. आंबेडकरांच्या मेणाच्या पुतळ्याचे जयपूर वॅक्स म्युझियम, नाहरगड किल्ला येथे अनावरण करण्यात आले आहे.
  • पुतळ्याचे उंची 5 फूट 11 इंच आणि वजन अंदाजे 38 किलो आहे.
 • पंतप्रधान नरेंद्र मोदी 9 डिसेंबर 2023 रोजी नियोजित असलेल्या इन्फिनिटी फोरमच्या दुसर्‍या आवृत्तीला संबोधित करणार आहेत. हा कार्यक्रम आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र प्राधिकरण (IFSCA) आणि GIFT सिटी यांच्या वतीने आयोजित करण्यात आला आहे.
 • राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते ‘Best Personality- Empowerment Of Differently-Abled’ साठी राष्ट्रीय पुरस्कार प्रशांत अग्रवाल यांना देण्यात आला आहे.
 • उसापासून निर्मिती होणाऱ्या इथेनॉलवर भारत सरकारने बंदी घातली आहे.
 • तेलंगणा राज्याच्या मुख्यमंत्री पदाची शपथ रेवंथ रेड्डी यांनी घेतली आहे.

Economics

 • महाराष्ट्र सरकारने कॅसिनो आणि ऑनलाईन गेमिंग वर 28% GST आकारण्याचे विधेयक विधानसभेत मांडले आहे.
 • रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) उत्तर प्रदेशातील सीतापूर येथे असलेल्या अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेचा (UCB) परवाना रद्द केला आहे.

Technology

 • इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (इंडियन ऑइल) आणि ईकेआय एनर्जी सर्व्हिसेस यांनी “सूर्य नूतन” या इंडियन ऑइलने विकसित केलेल्या इनडोअर सोलर कुकिंग सिस्टीमला प्रोत्साहन देण्यासाठी भागीदारी केली आहे.
 • अलीकडेच COP-28 मध्ये प्रतिष्ठित ‘ग्रीन युनिव्हर्सिटी अवॉर्ड’ IIT Mandi विद्यापीठाने जिंकला आहे.

Sports

 • श्रद्धा चोपडे हिने अंतरराष्ट्रीय ज्युदो स्पर्धेत 52 किलो वजनी गटात सुवर्णपदक जिंकले आहे.
 • अलीकडेच सुरेश रैनाची जम्मू आणि काश्मीरसाठी युवा मतदार जागरूकता दूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

Awards

 • व्हाईस एडमिरल दिनेश त्रिपाठी 4 जानेवारी रोजी नौदल उपप्रमुख पदाची सूत्रे स्वीकारणार आहेत.
 • मॅक्स लाइफ इन्शुरन्सने राजीव आनंद यांची अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे.
 • आनंद कृपालू यांनी स्विगीचे अध्यक्ष आणि स्वतंत्र संचालक म्हणून पदभार स्वीकारला आहे.

Other

 • नागा हेरिटेज व्हिलेज, किसामा येथे 5 वा नागालँड मधमाशी दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे.
 • दक्षिण आशियाई प्रादेशिक सहकार्य संघटनेच्या (SAARC) इतिहासातील एक महत्त्वाचा टप्पा म्हणून दरवर्षी ८ डिसेंबर रोजी सार्क चार्टर डे पाळला जातो.

Daily Current Affairs 9 December 2023 in Marathi Quiz – महत्वाचे प्रश्न

स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त आजचे महत्वाचे प्रश्न

Leave a Comment