MPSC Current Affairs 18 September 2023 | स्पर्धा परीक्षा चालू घडामोडी

MPSC Current Affairs18 September 2023 : देश, विदेश , क्रीडा , तंत्रज्ञान , अर्थशास्त्र आणि योजना या क्षेत्रातील 18 September च्या काही महत्वपूर्ण घडामोडी दिल्या आहेत. तसेच खाली महत्वाचे प्रश्न आणि Quiz दिली आहे. आपणास जर या चालू घडामोडींची PDF हवी असेल तर. खाली त्यासाठी download लिंक खाली दिली आहे.

MPSC Current Affairs 18 September 2023 : PDF Download करण्यासाठी

=> येथे क्लिक करा

सप्टेंबर महिन्यातील इतर दिवसांच्या चालू घडामोडी वाचण्यासाठी => येथे क्लिक करा


National | राष्ट्रीय

 • आसामचे राज्यपाल गुलाब चंद कटारिया यांनी राजभवन येथे आयोजित एका भव्य समारंभात ‘सरपंच संवाद’ App चे अनावरण केले.
  • App संपूर्ण भारतातील अंदाजे 2.5 लाख सरपंचांना जोडण्यासाठी डिझाइन केलेले आहे.

 • भारताने अलीकडेच 14 ते 16 सप्टेंबर दरम्यान आयोजित संयुक्त राष्ट्रसंघ आंतरराष्ट्रीय व्यापार कायदा (UNCITRAL) दक्षिण आशिया परिषदेच्या उद्घाटनाचे यजमानपद भूषवले आहे.
  • या क्षेत्रातील देशाची क्षमता ओळखून आंतरराष्ट्रीय लवादाचे केंद्र म्हणून भारताला स्थान देणे हे परिषदेचे एक महत्त्वाचे केंद्र होते.

 • नोबेल पारितोषिक विजेते रवींद्रनाथ टागोर यांनी स्थापन केलेले सांस्कृतिक आणि शैक्षणिक केंद्र असलेल्या शांतिनिकेतनने युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत एक प्रतिष्ठित स्थान मिळवले आहे.
  • शांतिनिकेतन आता भारताचे ४१ वे जागतिक वारसा स्थळ आहे.
  • जागतिक वारसा यादीत भारत आता सहाव्या क्रमांकावर आहे.

 • भारत आणि रशियाने ध्रुवीय आणि आर्क्टिक पाण्यात भारतीय खलाशांना प्रशिक्षण देण्यासाठी परवानगी दिली आहे.

 • गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी ‘गृह आधार योजनेचे’ अनावरण केले आहे.
  • या योजनेचा उद्देश गृहिणींना सक्षम करण्यासाठी असून यात दर महिन्याला 1500 रुपये गृहीणींच्या बँक खात्यावर जमा केले जाणार आहेत.

Economics Banking | अर्थव्यवस्था

 • इंडियन बँकेने ‘IB SAATHI’ (Sustainable Access and Aligning Technology for Holistic Inclusion) नावाचा नवीन उपक्रम सुरू केला आहे.
  • बिझनेस करस्पॉन्डंट (BC) चॅनलद्वारे विविध भागधारकांना आवश्यक बँकिंग सेवा प्रदान करणे हे IB SAATHI चे प्राथमिक उद्दिष्ट आहे.

 • मार्च 2023 पर्यंत ₹16.39 कोटी मूल्याचा ई-रुपया चलनात असल्याचे RBI ने जाहीर केले आहे.

Sports | क्रीडा

 • कार्लोस सेन्झने Carlos Sainz सिंगापूर ग्रांप्री (Grand Prix Formula 1) रेसिंग स्पर्धा जिंकली.

 • Asia Cup 2023  मध्ये कुलदीप यादवने प्लेअर ऑफ द टूर्नामेंट (मॅन ऑफ द सिरीज) हा किताब पटकावला.
  • मोहम्मद सिराजने सामनावीराचा किताब पटकावला.

 • भारतीय ऊर्जा क्षेत्रातील दिग्गज इंडियन ऑइलने भारतातील पहिल्या-वहिल्या ग्रँड प्रिक्स मोटोजीपी MotoGP Bharat आवृत्तीचे शीर्षक प्रायोजकत्व स्वीकारले आहे.
  • जे ग्रेटर नोएडा येथील बुद्ध इंटरनॅशनल सर्किट येथे 22 ते 24 सप्टेंबर दरम्यान होणार आहे.

Technology | तंत्रज्ञान

 • WhatsApp ने Android वर एका वेळी 31 ग्रुप मेंबर्सला ग्रुप कॉल्स करता येईल असे फीचर सादर केले आहे.

 • भारताच्या सूर्य मोहीम अंतर्गत पाठवलेले यान आदित्य-L1 ने डेटा गोळा करण्यास सुरुवात केली असल्याचे ISRO ने सांगितले.
  • हा डेटा शास्त्रज्ञांना पृथ्वीभोवतीच्या कणांच्या वर्तनाचे विश्लेषण करण्यासाठी मदत करणार आहे.

Awards & Appointments

 • उपाध्यक्ष जगदीप धनखर यांनी एका महत्त्वपूर्ण समारंभात 70 पुरुष आणि 14 महिलांचा समावेश असलेल्या 84 मान्यवर कलाकारांना संगीत नाटक अकादमी अमृत पुरस्कार (Sangeet Natak Akademi Amrit Awards) प्रदान केले.

 • राहुल मिश्रा, भारतीय डिझायनर यांना फ्रेंच सरकारने Chevalier de l’Ordre des Arts et des Lettres (नाइट ऑफ द ऑर्डर ऑफ आर्ट्स अँड लेटर्स) या पुरस्काराने सन्मानित केले.

दिनविशेष

 • World Bamboo Day 2023
 • International Equal Pay Day 2023 आंतरराष्ट्रीय समान वेतन दिन

Important Questions | महत्वाचे प्रश्न

 1. महाराष्ट्र शासनाच्या मत्रिमंडळाने कोठे क्रीडा उद्यापीठ उभारण्यास मंजुरी दिली आहे?
 2. महाराष्ट्र शासनाने राज्यात कोठे सोयाबीन संशोधन प्रशिक्षण व प्रक्रिया उपकेंद्र उभारण्यास मंजुरी दिली आहे?
 3. कोणत्या राज्याच्या सरकारने नुकतीच नमो ११ कलमी कार्यक्रम राबविण्याची घोषणा केली आहे?
 4. अंतरराष्ट्रीय संमेलन आणि उद्योग प्रदर्शन केंद्र यशोभूमी च्या पहिल्या टप्प्याचे उदघाट्न कोणाच्या हस्ते झाले?
 5. भारताचा कोणता स्टार टेनिस पटू डेव्हिस चसक टेनिस स्पर्धेतून निवृत्त झाला आहे?
 6. केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या सचिवपदी कोणाची नियुक्ती झाली आहे?
 7. कोणत्या देशाच्या नोव्हा स्कॉटीया प्रांतात ली हे चक्रीवादळ आले आहे?
 8. कोणत्या भारतीय डिझायनरला फ्रेंच सरकारने पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे ?
 9. भारताने किती वेळा आशिया चषक क्रिकेट स्पर्धा जिंकली आहे?
 10. आशिया चसक क्रिकेट स्पर्धा २०२३ मध्ये भारताने अंतिम सामन्यात कोणत्या देशाच्या संघाचा पराभव केला आहे?
 11. ग्लोबल लीडर अप्रूव्हल लिस्ट मध्ये कोणी अव्वल स्थान कायम राखले आहे?
 12. महाराष्ट्र सरकारने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७३ व्या वाढदिवसानिमित्त कोणता कार्यक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे?
 13. जागतिक वारसा यादीत भारत आता कोणत्या क्रमांकावर आहे ?
 14. युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत भारतातील कोणत्या जागेला स्थान मिळाले आहे ?
 15. शांतिनिकेतन कोणत्या राज्यात आहे ?
 16. शांतिनिकेतनची स्थापन कोणी केली होती ?

उत्तरे:

प्रश्न क्र.उत्तरे प्रश्न क्र.उत्तरे
1छत्रपती संभाजीनगर98
2परळी वै.10श्रीलंका
3महाराष्ट्र 11नरेंद्र मोदी
4नरेंद्र मोदी12नमो ११ कलमी कार्यक्रम
5 रोहण बोपण्णा13सहाव्या
6अभय करंदीकर14शांतिनिकेतनने
7कॅनडा15पश्चिम बंगाल
8राहुल मिश्रा16रवींद्रनाथ टागोर

MPSC Current Affairs 18 September 2023 Download PDF


Quiz आणि इतर घडामोडी

23 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz
23 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz
22 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz
22 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz
21 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz
21 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz
20 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz
20 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz
19 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz
19 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz
18 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz
18 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz
17 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz
17 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz
15 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz
15 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz

Leave a Comment

23 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz 22 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz 21 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz 20 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz 19 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz 18 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz 17 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz 15 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz