MPSC Current Affairs 2 September 2023 | चालू घडामोडी

MPSC Current Affairs 2 September 2023 : नमस्कार मित्रांनो, आम्ही आपल्या साठी 2 September च्या काही महत्वपूर्ण घडामोडी दिल्या आहेत. तसेच खाली महत्वाचे प्रश्न आणि Quiz दिली आहे. आपणास जर या चालू घडामोडींची PDF हवी असेल तर. खाली त्यासाठी download लिंक खाली दिली आहे.

Current Affairs PDF Download करण्यासाठी => येथे क्लिक करा

ऑगस्ट महिन्यातील इतर दिवसांच्या चालू घडामोडी वाचण्यासाठी => येथे क्लिक करा

National | राष्ट्रीय

 • उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या हस्ते ओडिशातील उत्केला (Utkela) विमानतळाचे उद्घाटन करण्यात आले आहे.
  • केंद्र सरकारच्या उडे देश का आम नागरिक योजनेचा एक भाग हे विमानतळ उभे करण्यात आले आहे. या योजनेचा उद्देश संपूर्ण भारतातील प्रादेशिक हवाई संपर्क वाढवणे आहे.

 • अमेरिकेच्या जॉर्जिया राज्याचे गव्हर्नर ब्रायन केम्प ऑक्टोबर महिना राज्यात ‘हिंदू वारसा महिना’ म्हणून साजरा केला जाईल अशी अधिकृतपणे घोषणा केली आहे.

 • तेलंगणाच्या मुख्य इनोवेशन अधिकारी (CIO) शांता थौतम (Shanta Thoutam) यांना 27 ते 29 ऑगस्ट दरम्यान मॉस्को येथे आयोजित पहिल्या BRICS इनोव्हेशन फोरममध्ये जागतिक नवोपक्रम पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

 • राष्ट्रीय केमिकल्स आणि फर्टिलायझर्सला नवरत्न दर्जा मिळाला आहे.
  • राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड (आरसीएफ) हा एक भारतीय सरकारी मालकीचा उद्योग आहे ज्याचे मुख्यालय मुंबई येथे आहे, जे प्रामुख्याने रसायने आणि खतांच्या उत्पादन करते.

Economics Banking | अर्थव्यवस्था

 • भारताच्या स्पर्धा आयोगाने Competition Commission of India (CCI) अलीकडेच Tata SIA Airlines (Vistara) आणि Air India च्या विलीनीकरणाला परवानगी दिली आहे.

 • ग्लोबल रेटिंग एजन्सी मूडीज इन्व्हेस्टर सर्व्हिस Moody’s Investor Service भारताच्या सकल देशांतर्गत उत्पादन (जीडीपी) वाढीचा अंदाज 5.5 टक्क्यांवरुन 6.7 टक्क्यांपर्यंत वाढवला आहे.

 • भारताचे ऑगस्ट Goods and Services Tax (GST) संकलन ₹1.59 लाख कोटी पर्यंत वाढले आहे.

 • PhonePe या कंपनी ने Share.Market नावाचे शेअर बाजारसाठी App लॉंच केले आहे. आता ग्राहकांना शेअर खरेदी विक्री ची सुविधा मिळणार आहे.

Sports | क्रीडा

 • भुवनेश्वर आणि गुवाहाटी येथे भारताच्या पहिल्या दोन FIFA विश्वचषक 2026 पात्रता फेरीचे आयोजन केले जाणार आहे.

 • भारताच्या U16 पुरुष संघाने बांगलादेशवर 1-0 असा विजय मिळवून भूतानमधील SAFF U16 चॅम्पियनशिप मोहिमेची सुरुवात केली.

Technology | तंत्रज्ञान

 • ISRO ने आदित्य L1 या अंतराळयानाचे यशस्वी उड्डाण करून Aditya L1 मोहिमेची सुरूवात केली आहे.
  • हे मिशन भारताचे पहिले समर्पित सौर मिशन आहे आणि ते सूर्याच्या वातावरणाचा अभ्यास करणार आहे.
  • या मोहिमेचा कार्यकाळ 5 वर्षांचा आहे.
  • युरोपियन स्पेस एजन्सी (ESA) आदित्य-L1 या मोहिमेला सखोल अंतराळ दळणवळण सेवा पुरवण्यासाठी मदत करणार आहे.

 • Amazon ने इंडिया पोस्ट सोबत MSME निर्यातदारांसाठी क्रॉस-बॉर्डर लॉजिस्टिक्स सेवा सुलभ करण्यासाठी करार केला

Appointments | नियुक्त्या

 • मनीष देसाई यांची प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोचा Press Information Bureau (PIB) च्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

 • आर माधवन यांची Film and Television Institute of India (FTII), Pune च्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

दिनविशेष

 • World Coconut Day (September 2)

Important Questions | महत्वाचे प्रश्न

 1. भारतीय वंशाचे अर्थतज्ञ थर्मन षन्मुगरत्नम यांची कोणत्या देशाच्या राष्ट्रध्यक्ष पदी निवड झाली आहे?
 2. महाराष्ट्र राज्यातील किती शिक्षकांना सावित्रीबाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे?
 3. देशाचे ऑगस्ट महिन्यात एकूण किती लाख कोटी GST संकलन झाले आहे?
 4. महाराष्ट्र राज्यात ऑगस्ट महिन्यात एकूण GST संकलन किती हजार कोटी झाले आहे?
 5. भारताचा बुद्धिबळ पटू डी.गुकेश जागतिक बुद्धीबळ क्रमवारीत कितव्या क्रमांकावर पोहचला आहे?
 6. केंद्र सरकारतर्फे देशात कोणता महिना हा पोषण महिना म्हणून साजरा करतात?
 7. संसदेचे विशेष अधिवेशन कोणत्या कालावधीत होणार आहे?
 8. कोणत्या राज्याच्या सरकारच्या पुढाकाराणे लेह येथे भारतीय लस्कराचे त्रिशूळ युद्ध संग्रहालय उभरण्यात येत आहे?
 9. भारतीय लस्कराच्या त्रिशूळ युद्ध संग्रहालयाचे भूमिपूजन लेह मध्ये कोणाच्या हस्ते करण्यात येणार आहे?
 10. भारताच्या नोंदलाच्या महेंद्रगिरी या युद्धनौकेचे जलावतरण कोणाच्या हस्ते झाले ?
 11. महेंद्रगिरी युद्धनौका ही भारतीय नौदलाच्या कोणत्या प्रोजेक्ट अंतर्गत ७ वी युद्धनौका आहे?
 12. भारतात बुद्धिबळ क्रमवारीत विश्वनाथ आनंद यांना मागे टाकणारा डी. गुकेश हा किती वर्षातील पहिला भारतीय ठरला खेळाडू ठरला आहे?
 13. फिल्म अँड टेलिव्हीझन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया च्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती झाली आहे?
 14. अमेरिकेच्या कोणत्या राज्यात ऑक्टोबर महिना ‘हिंदू वारसा महिना’ म्हणून साजरा केला जाणार आहे?
 15. देशाच्या GST संकलनात ऑगस्ट महिन्यात वार्षिक तुलनेत किती टक्क्यानी वाढ झाली आहे?
 16. कोणता बुद्धीबळ पटू विश्वनाथ आनंद यांना मागे टाकून भारताचा प्रथम क्रमांकाचा बुद्धीबळ पटू ठरला आहे?
 17. नॉर्थ ईस्ट इंडिया: अ पॉलिटिकलं हिस्ट्री या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
 18. सूर्याचा अभ्यास करण्यासाठी इस्रो कडून पाठविण्यात येणाऱ्या आदित्य एल-१ यानाचा एकूण प्रवास किती दिवसाचा असणार आहे?
 19. आदित्य-L1 या मोहिमेला सखोल अंतराळ दळणवळण सेवा पुरवण्यासाठी कोणती अंतराळ संस्था मदत करणार आहे?
 20. सिंगापूरच्या राष्ट्रध्यक्षपदी निवड झालेले थर्मन षन्मुगरत्नम हे भारतीय वंशाचे कितवे राष्ट्रध्यक्ष आहेत?

उत्तरे:

प्रश्न क्र.उत्तरे प्रश्न क्र.उत्तरे
1सिंगापूर11१७ ए
2१०८12३७
3१.५९13आर. माधवन
4२३,२८२14जॉर्जिया
5 आठव्या15११%
6 सप्टेंबर16डी. गुकेश
7१८ ते २२ सप्टेंबर17सम्राट चौधुरी
8 महाराष्ट्र18१२५
9 देवेंद्र फडवणीस19युरोपियन स्पेस एजन्सी (ESA)
10जगदीप धनखड203 रे

MPSC Current Affairs 2 September 2023 : Download PDF


आजची Quiz आणि इतर घडामोडी

23 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz
23 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz
22 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz
22 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz
21 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz
21 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz
20 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz
20 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz
19 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz
19 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz

Youtube वर पहा

2 thoughts on “MPSC Current Affairs 2 September 2023 | चालू घडामोडी”

 1. सर महिन्याच्या चालू घडामोडी द्या. त्यामुळे रिव्हीजन सोपं होईल. धन्यवाद. 🙏🏻

  Reply
  • नक्कीच देऊ. ऑगस्ट महिन्याच्या संपूर्ण चालू घडामोडी तयार करत आहोत. झाल्या की उपलोड करतो.
   अपडेट साठी WhatsApp ग्रुप ला सामील व्हा. (https://chat.whatsapp.com/DD7VAo7o41YCgkVKYqQ3AR)
   किंवा 8767204164 नंबर वर ‘Hi mpsc’ पाठवा.

   Regards,
   Team MPSC Daily

   Reply

Leave a Comment

23 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz 22 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz 21 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz 20 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz 19 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz