MPSC Daily Current Affairs 15 September 2023 | स्पर्धा परीक्षा चालू घडामोडी

MPSC Daily Current Affairs 15 September 2023 : देश, विदेश , क्रीडा , तंत्रज्ञान , अर्थशास्त्र आणि योजना या क्षेत्रातील 15 September च्या काही महत्वपूर्ण घडामोडी दिल्या आहेत. तसेच खाली महत्वाचे प्रश्न आणि Quiz दिली आहे. आपणास जर या चालू घडामोडींची PDF हवी असेल तर. खाली त्यासाठी download लिंक खाली दिली आहे.

MPSC Daily Current Affairs 15 September 2023 : PDF Download करण्यासाठी => येथे क्लिक करा

सप्टेंबर महिन्यातील इतर दिवसांच्या चालू घडामोडी वाचण्यासाठी => येथे क्लिक करा

National | राष्ट्रीय

 • युरोपियन विमान वाहतूक कंपनी एअरबस आणि भारतीय समूह टाटा समूह यांच्यातील सहकार्याचा भाग म्हणून भारताला पहिले एअरबस C295 विमान मिळाले आहे.
  • C295 विमान IAF च्या जुन्या Avro विमानांची जागा घेणार आहे.

 • भारत सरकारने ई-कोर्ट प्रकल्पाच्या तिसऱ्या टप्प्याला हिरवा कंदील दिला असून या साठी 7,210 कोटी रुपयांच्या निधी देण्याचे जाहीर केले आहे.
  • या प्रकल्पाचा उद्देश न्यायालयांची कार्यक्षमता आणि सुलभता वाढविण्यासाठी तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त वापर करणे आहे. यात डिजिटल, ऑनलाइन आणि पेपरलेस कोर्ट सिस्टमवर भर दिला जाणार आहे.

 • जन्म प्रमाणपत्रे Birth Certificate या एकाच कागदपत्राद्वारे आता नागरिकांना अनेक सुविधांचा लाभ घेता येणार असल्याचे केंद्रीय गृह मंत्रालयाने जाहीर केले आहे.
  • शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश, विवाह नोंदणी, आधार नोंदणी, चालक परवाना जारी करणे, सरकारी नोकरीत नियुक्ती यासह अनेक सेवांचा लाभ घेण्यासाठी हे एकच कागदपत्र आवश्यक असणार आहे।
  • या नवीन नियमाची अमलबजावणी 1 ऑक्टोबरपासून होणार आहे.

 • भारत सरकारने Pradhan Mantri Ujjwala Yojana योजनेच्या तिसऱ्या टप्प्याचे अनावरण केले आहे. या उपक्रमाचे उद्दिष्ट 7.5 दशलक्ष गरीब कुटुंबांना तीन वर्षांसाठी स्टोव्ह आणि रिफिलसह मोफत गॅस कनेक्शन प्रदान करणे आहे.
  • लाभार्थ्यांना डिपॉझिट-मुक्त गॅस कनेक्शन मिळेल, स्टोव्ह आणि त्यांचा पहिला 14.2 किलोचा सिलिंडर, सर्व काही विनाशुल्क.

 • कर्नाटक राज्याने Karnataka State Gig Workers Insurance Scheme जाहीर केली असून या योजनेत मजुरांना 4 लाखांचा आरोग्य आणि जीवन विमा दिला जाणार आहे.

 • BAE Systems आणि Larsen & Toubro (L&T) यांनी मिळून आर्टिक्युलेटेड ऑल-टेरेन व्हेईकल Articulated All-Terrain Vehicle (AATV) हे प्रतिकूल परिस्थितीत उपयोगी वाहन भारतात आणण्यासाठी करार केला आहे.
  • हे वाहन भारतीय सशस्त्र दलांसाठी आणले जाणार असून ते BvS10-Sindhu म्हणून ओळखले जाणार आहे.

 • पंतप्रधान नरेंद्र मोदी द्वारका येथे आंतरराष्ट्रीय अधिवेशन आणि एक्स्पो सेंटर ‘यशोभूमी’ च्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन करणार आहेत.

Economics Banking | अर्थव्यवस्था

 • Fitch या रेटिंग कंपनी ने FY24 साठी भारताचा वाढीचा अंदाज 6.3% वर्तवला आहे.

 • Yes Bank आणि BriskPe यांनी निर्यातदार आणि आयातदारांना सीमलेस क्रॉस-बॉर्डर पेमेंट सक्षम करण्यासाठी भागीदारी केली आहे.

 • एअर इंडिया, भारतातील प्रमुख विमान कंपनीने , प्रवाशांना वैयक्तिकृत आणि त्रास-मुक्त अनुभव प्रदान करण्याच्या उद्देशाने ‘प्रोजेक्ट अभिनंदन’ हा नवीन उपक्रम सुरू केला आहे.

Sports | क्रीडा

 • Asia Cup 2023 बांगलादेशने सुपर 4 मध्ये टीम इंडियावर 6 धावांनी विजय मिळवला आहे.

 • आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेट क्रमवारीत भारताने पाकिस्तान ला मागे टाकत दुसरे स्थान पटकावले आहे. पाकिस्तान तिसऱ्या स्थानावर असून ऑस्ट्रेलिया प्रथम क्रमांकावर आहे.

Technology | तंत्रज्ञान

 • हैदराबाद येथे स्थित भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण प्रशिक्षण संस्था Geological Survey of India Training Institute (GSITI) ने अलीकडेच बंगळुरू येथे मुख्यालय असलेल्या भारतीय अंतराळ संशोधन संस्थेशी (ISRO) शी करार केला आहे.

 • सूर्याचा अभ्यास करण्यासाठी पाठवलेले आदित्य L1 यानाने चौथा टप्पा पूर्ण केला असून 13 सप्टेंबर मंगळवारी पृथ्वीच्या कक्षेबाहेर प्रवेश करणार आहे.

 • दीपिका पदुकोणने विशेष कॉफी बनवणाऱ्या कंपनी Blue Tokai मध्ये गुंतवणूक केली आहे.

Awards & Appointments

 • एसबीआयचे माजी प्रमुख रजनीश कुमार यांची मास्टरकार्ड इंडियाच्या अध्यक्षपदी नियुक्ती

 • अभिनेता हृतिक रोशन यांची Mobil या लुब्रिकंट कंपनी च्या ब्रॅंड एम्बेसेडर म्हणून निवड करण्यात आली आहे.

दिनविशेष

 • 15 September
  • International Day of Democracy – आंतरराष्ट्रीय लोकशाही दिन
  • Engineer’s Day (India) – अभियंता दिवस

Important Questions | महत्वाचे प्रश्न

 1. देशात प्रस्तावित समान नागरी कायद्यातुन राज्याला पूर्णपणे वगळावे असा ठराव कोणत्या राज्याच्या विधानसभेत मंजूर केला आहे?
 2. भारतात १५ सप्टेंबर हा दिवस कोणता दिन म्हणून साजरा केला जातो?
 3. देशात कोणत्या राज्यात निपाह विषाणूची लागण झाली आहे?
 4. आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये भारताने सर्वाधिक कोणत्या देशात गुंतवणूक केली आहे?
 5. RBI च्या अहवालानुसार आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये भारतात सर्वाधिक विदेशी गुंतवणूक कोणत्या देशातून झाली आहे?
 6. पुणे येथे आयोजित केलेल्या तिसऱ्या अखिल भारतीय राजभाषा संमेलनाचे उदघाट्न कोणाच्या हस्ते झाले?
 7. भारताचे २०२६ पर्यंत किती गिगावॅट सौर ऊर्जा साध्य करण्याचे लक्ष्य आहे?
 8. कोणत्या भारतीय महिला क्रिकेट पटूचा टाईम नियतकालिकेच्या जगातील १०० उद्योन्मुख नेत्यामध्ये समावेश झाला आहे?
 9. केंद्रीय राजभाषा विभागाच्या वतीने तिसरे अखिल भारतीय राजभाषा संमेलन कोठे आयोजित करण्यात आले आहे?
 10. Pradhan Mantri Ujjwala Yojana योजनेच्या तिसऱ्या टप्प्यात किती गरीब कुटुंबांना लाभ प्रदान करण्याचे ध्येय आहे ?
 11. कोणत्या एकाच कागद पत्राद्वारे आता आधार नोंदणी आणि चालक परवाना नोंदणी करता येणार आहे ?
 12. कर्नाटक राज्याने जाहीर केलेल्या विमा योजनेत मजुरांना किती लाखांचा विमा मिळणार आहे ?
 13. आंतरराष्ट्रीय अधिवेशन आणि एक्स्पो सेंटर यशोभूमी’ कोठे बनवण्यात आले आहे ?
 14. देशात कोणत्या राज्यामध्ये महिलांना मंदिरात पुजारी म्हणून नियुक्त होण्यास मान्यता दिली आहे?

उत्तरे:

प्रश्न क्र.उत्तरे प्रश्न क्र.उत्तरे
1नागालँड8 हरमनप्रीत कौर
2राष्ट्रीय अभियंता दिन9पुणे
3केरळ 107.5 दशलक्ष
4सिंगापूर11Birth Certificate
5 अमेरिका124 लाख
6अजय मिश्रा13द्वारका 
7११०14तामिळनाडू

MPSC Daily Current Affairs 15 September 2023


Quiz आणि इतर घडामोडी

23 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz
23 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz
22 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz
22 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz
21 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz
21 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz
20 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz
20 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz
19 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz
19 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz
18 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz
18 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz
17 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz
17 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz
15 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz
15 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz
13 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz
13 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz
12 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz
12 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz
11 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz !
11 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz !
10 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz
10 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz

Leave a Comment

23 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz 22 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz 21 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz 20 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz 19 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz 18 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz 17 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz 15 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz 13 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz 12 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz 11 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz ! 10 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz