MPSC Daily Current Affairs 23 September 2023 | स्पर्धा परीक्षा चालू घडामोडी

MPSC Daily Current Affairs 23 September 2023 : आंतरराष्ट्रीय वकील परिषद २०२३,आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, वंदे भारत एक्सप्रेस, PM-KISAN योजना, विश्वनाथ घाट तसेच खाली चालू घडामोडीवर आधारित महत्वाचे प्रश्न आणि Quiz दिली आहे. आपणास जर या चालू घडामोडींची PDF हवी असेल तर. खाली त्यासाठी download लिंक खाली दिली आहे.

MPSC Daily Current Affairs 23 September 2023 : PDF Download करण्यासाठी

=> येथे क्लिक करा

सप्टेंबर महिन्यातील इतर दिवसांच्या चालू घडामोडी वाचण्यासाठी => येथे क्लिक करा


National | राष्ट्रीय

 • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीच्या विज्ञान भवनात ‘आंतरराष्ट्रीय वकील परिषद २०२३’ चे उद्घाटन केले.
  • 23 आणि 24 सप्टेंबर रोजी नियोजित होणारा हा कार्यक्रम भारतातील आपल्या प्रकारचा पहिला कार्यक्रम आहे आणि राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय महत्त्वाच्या कायदेशीर मुद्द्यांवर चर्चा सुलभ करण्याचा या परिषदेचा हेतू आहे.

 • पंतप्रधान मोदींनी वाराणसीमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमची पायाभरणी केली असून स्टेडियममध्ये एका वेळी सुमारे 30,000 लोक सामावून घेण्याची क्षमता आहे.

 • 24 सप्टेंबर रोजी पंतप्रधान मोदी 9 वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन लाँच करणार आहेत. उद्घाटन होणार्‍या नऊ मार्ग पुढीलप्रमाणे आहेत.
अ. क्र. मार्ग सुरुवात मार्ग शेवट
1RanchiHowrah
2PatnaHowrah
3VijayawadaChennai
4TirunelveliChennai
5RourkelaPuri
6UdaipurJaipur
7KasaragodThiruvananthapuram
8JamnagarAhmedabad
9HyderabadBengaluru
 • चीन आणि सीरिया या देशांनी धोरणात्मक भागीदारीची घोषणा केली आहे.

 • भारत, इस्रायल, संयुक्त अरब अमिराती (UAE) आणि युनायटेड स्टेट्स या देशांनी मिळून I2U2 या नावाने संयुक्त अवकाश उपक्रमाचे अनावरण केले आहे.

Economics Banking | अर्थव्यवस्था

 • भारतीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांच्या (एमएसएमई) विकसित होत असलेल्या गरजा पूर्ण करण्यासाठी Axis Bank ने अलीकडेच ‘NEO For Business’ या सुविधेचे अनावरण केले आहे.

Technology | तंत्रज्ञान

 • भारत सरकारच्या केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने AI चॅटबॉट लाँच करून प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM-KISAN) योजनेची कार्यक्षमता आणि पोहोच वाढवण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे.
  • सध्या इंग्रजी आणि हिंदीमध्ये उपलब्ध असलेला, चॅटबॉट लवकरच बंगाली, ओडिया, तेलुगू, तमिळ आणि मराठीमध्ये उपलब्ध होईल.

 • टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) या आयटी कंपनीने, नॉर्वेच्या राष्ट्रीय पेमेंट आणि इलेक्ट्रॉनिक ओळख प्रणाली, BankID BankAxept सोबत भागीदारी केली आहे.

Sports | क्रीडा

 • अंतरराष्ट्रीय क्रमवारीत क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमध्ये भारत पहिल्या क्रमांकाचा संघ बनला आहे.

 • अरुणाचल प्रदेशातील खेळाडूंना चीनने प्रवेश नाकारल्यामुळे क्रीडामंत्र्यांनी आशियाई क्रीडा स्पर्धेचा दौरा रद्द केला आहे.

Awards & Appointments

 • पर्यटन मंत्रालयाने आसाममधील विश्वनाथ घाटाला 2023 या वर्षासाठी भारतातील सर्वोत्तम पर्यटन गाव म्हणून घोषित केले आहे.
  • बिस्वनाथ चारियाली नगराच्या दक्षिणेला असलेला बिस्वनाथ घाट हा ‘गुप्त काशी’ म्हणून प्रसिद्ध आहे.

दिनविशेष

 • International Day of Sign Languages – आंतरराष्ट्रीय सांकेतिक भाषांचा दिवस

Important Questions | महत्वाचे प्रश्न

 1. 2023 या वर्षासाठी भारतातील सर्वोत्तम पर्यटन गाव म्हणून कोणत्या गावाला घोषित केले आहे ?
 2. बिस्वनाथ घाट हा कोणत्या नावाने प्रसिद्ध आहे ?
 3. अंतरराष्ट्रीय क्रमवारीत क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमध्ये कोणता संघ प्रथम क्रमांकाचा संघ बनला आहे ?
 4. पंतप्रधान मोदींनी कोणत्या शहरात आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमची पायाभरणी केली आहे ?
 5. पंतप्रधान मोदींनी वाराणसीमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमची पायाभरणी केलेल्या स्टेडियमची क्षमता किती आहे ?
 6. आंतरराष्ट्रीय वकील परिषद २०२३ कोठे आयोजित करण्यात आली होती ?
 7. आमदार प्रमिला मलिक यांची कोणत्या राज्याच्या विधानसभा अध्यक्ष पदी निवड झाली आहे?
 8. कोणाला मराठवाडा भुषण पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे?
 9. न्यूयार्क मधील संयुक्त राष्ट्राच्या महासभेच्या अधिवेशनात भारतातर्फे कोण उपस्थित राहणार आहे?
 10. हांगझोऊ आशियन क्रीडा स्पर्धेत भारतातील कोणत्या राज्यातील खेळाडूंना चीन ने प्रवेश नाकारला आहे?
 11. भारत आणि कोणत्या देशाच्या नौदलांनी सिबेक्स नावाच्या सागरी सरावाला सुरवात केली आहे?
 12. २०२३ या वर्षाचा नॉर्मन बोरलॉग पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे?
 13. महाराष्ट्र शासनाच्या भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेअंतर्गत आता किती फळ पिकांचा समावेश करण्यात आला आहे?
 14. आर्थिक स्वातंत्र्य निर्देशांकात मध्ये भारत १६५ देशाच्या यादीत कितव्या क्रमांकावर आहे?

उत्तरे:

प्रश्न क्र.उत्तरे प्रश्न क्र.उत्तरे
1विश्वनाथ घाटाला8 देविदास गोरे
2गुप्त काशी9 एस.जयशंकर
3भारत 10 अरुणाचल प्रदेश
4वाराणसी11 सिंगापूर
5 30 हजार 12 डॉ. स्वाती नायक
6 नवी दिल्ली 13 १५
7ओडिसा14 87

MPSC Daily Current Affairs 23 September 2023 Download PDF


Quiz आणि इतर घडामोडी

23 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz
23 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz
22 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz
22 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz
21 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz
21 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz
20 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz
20 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz
19 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz
19 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz
18 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz
18 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz
17 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz
17 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz
15 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz
15 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz

Leave a Comment

23 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz 22 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz 21 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz 20 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz 19 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz 18 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz 17 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz 15 सप्टेंबर महत्वाचे प्रश्न | MPSC Quiz