MPSC Daily Current Affairs 25 September 2023 | स्पर्धा परीक्षा चालू घडामोडी

MPSC Daily Current Affairs 25 September 2023 : दीपगृह महोत्सव, स्वामीनारायण अक्षरधाम मंदिर, वीरांगना दुर्गावती व्याघ्र प्रकल्प, आशियाई क्रीडा 2023, Bharat Drone Shakti 2023, MotoGP भारत 2023 तसेच खाली चालू घडामोडीवर आधारित महत्वाचे प्रश्न आणि Quiz दिली आहे. आपणास जर या चालू घडामोडींची PDF हवी असेल तर. खाली त्यासाठी download लिंक खाली दिली आहे.

MPSC Daily Current Affairs 25 September 2023:PDF Downloadक्लिक करा
सप्टेंबर महिन्यातील इतर दिवसांच्या चालू घडामोडी वाचण्यासाठीक्लिक करा
आजचे महत्वाचे प्रश्न वाचण्यासाठी येथे क्लिक करा. क्लिक करा

National | राष्ट्रीय

 • भारतातील पहिला दीपगृह महोत्सव गोव्यात पार पडला. हा महोत्सव संपूर्ण भारतातील 75 दीपगृहांना समृद्ध पर्यटन केंद्रांमध्ये रूपांतरित करण्याच्या भव्य दृष्टीकोनाचा एक भाग आहे.

 • भारताचे जलशक्ती मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी नुकतीच घोषणा केली की, एकूण 4.4 लाख भारतीय गावांपैकी 75% गावांनी ‘ओपन डेफिकेशन फ्री प्लस’ (उघड्यावर शौच करण्यास प्रतिबंध) (ODF प्लस) दर्जा प्राप्त केला आहे.

 • भारताबाहेरील जगातील दुसरे सर्वात मोठे हिंदू मंदिर अमेरिकेत उद्घाटन होणार आहे.
  • रॉबिन्सविले टाऊनशिप, न्यू जर्सी (Robbinsville Township, New Jersey) येथील स्वामीनारायण अक्षरधाम मंदिराचे उद्घाटन 8 ऑक्टोबर 2023 रोजी होणार आहे.

 • अरुणाचल प्रदेश ऑक्टोबरपर्यंत तीन नवीन हवाई मार्ग जोडणार आहे. हे नवीन मार्ग UDAN-5 योजनेचा भाग म्हणून अरुणाचल प्रदेशची राजधानी इटानगर, रुपसी, जोरहाट आणि दिल्लीला जोडतील.

 • भारताला 54 वा व्याघ्र प्रकल्प “वीरांगना दुर्गावती व्याघ्र प्रकल्प” मिळाला आहे.
  • हा मध्य प्रदेशातील सागर, दमोह आणि नरसिंगपूर जिल्ह्यात पसरलेले आहे.

 • अलीकडेच, गोवा सरकारने पर्यटकांसाठी समुद्रकिना-याचा अनुभव वाढविण्यासाठी “गोवा स्टेट शॅक पॉलिसी 2023-2026” नावाचे एक महत्त्वपूर्ण धोरण मंजूर केले आहे.
  • या धोरणाचा उद्देश स्थानिक समुदायासाठी शाश्वत पर्यटन आणि आर्थिक संधींना प्रोत्साहन देणे आहे.

 • YUDH ABHYAS युद्ध अभ्यासाची 19 वी आवृत्ती अलास्का, यूएसए येथे सुरू होणार आहे.
  • हा वार्षिक सराव भारतीय लष्कर आणि अमेरिकन लष्कर यांच्यातील एक सहयोगी प्रयत्न आहे, ज्याचा उद्देश लष्करी सहकार्य आणि तयारी मजबूत करणे आहे.

 • राजनाथ सिंह यांनी उत्तर प्रदेश मधील हिंडन एअरबेसवर मेगा ड्रोन शोचे Bharat Drone Shakti 2023 चे उद्घाटन केले.
  • भारतीय हवाई दल आणि ड्रोन फेडरेशन ऑफ इंडिया (DFI) यांनी संयुक्तपणे आयोजित केले आहे.

Economics Banking | अर्थव्यवस्था

 • आरबीआयचे डेप्युटी गव्हर्नर एम. राजेश्वर राव यांचा कार्यकाळ वाढला असून त्यांना 10 ऑक्टोबर 2023 पासून एक वर्षाची मुदतवाढ देण्यात आली आहे.

 • जम्मू-काश्मीरमधील लिथियम साठ्याचा सरकार काही आठवड्यांत लिलाव करणार आहे.
  • इलेक्ट्रिक वाहनांच्या बॅटरी बनवण्यासाठी कच्चा माल लिथियम वापरला जातो.
  • फेब्रुवारीमध्ये जम्मू आणि काश्मीरमध्ये अंदाजे 5.9 दशलक्ष टन साठा असलेले लिथियमचे पहिले साठे सापडले होते.

Technology | तंत्रज्ञान

 • Apple कंपनीने पुढील 4-5 वर्षांमध्ये भारतात पाचपटीने 40 अब्ज डॉलर्सपर्यंत उत्पादन वाढवण्याची योजना आखली आहे.

 • नासा या अंतराळ संस्थेने 2016 साली सोडलेला Osiris-Rex नावाचा कॅपसुलच्या आकाराचा प्रोब हा बेन्नू लघुग्रह वरील अंदाजे (250 ग्रॅम) माती घेऊन परतला आहे.
  • या मातीच्या नमुन्याचा अभ्यास करून आपल्या सौर मंडळाच्या निर्मितीबद्दल आणि पृथ्वी राहण्यायोग्य कशी झाली याबद्दल अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यास मदत होणार आहे.

Sports | क्रीडा

 • भारतात आयोजित केलेल्या पहिल्या MotoGP भारत 2023 स्पर्धेत इटालियन मार्को बेझेची Marco Bezzecchi विजयी झाला आहे.

 • एकदिवसीय क्रिकेटमध्ये 3000 षटकार मारणारा भारतीय संघ पहिला संघ ठरला आहे.
  • वेस्ट इंडिज 2953 षटकारांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे, तर पाकिस्तान 2566 षटकारांसह तिसऱ्या स्थानावर आहे.

 • आशियाई क्रीडा स्पर्धा:
  • भारतीय महिला क्रिकेट संघाने आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले आहे.
  • महिला 10 मीटर एअर रायफल संघाने रौप्य पदक जिंकले आहे.
  • पुरुषांच्या लाइटवेट दुहेरी स्कल्समध्ये अर्जुन लाल जाट आणि अरविंद सिंग यांनी रौप्य पदक मिळवले.

Awards & Appointments

 • ICICI Lombard चे MD आणि CEO म्हणून संजीव मंत्री यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

दिनविशेष

 • Antyodaya Diwas – भारतीय नेते पंडित दीनदयाल उपाध्याय यांची जयंती.
 • International Day for the Total Elimination of Nuclear Weapons – अण्वस्त्रांच्या संपूर्ण निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिवस.
 • World Pharmacists Day

Important Questions | महत्वाचे प्रश्न


MPSC Daily Current Affairs 25 September 2023 Download PDF


Leave a Comment