MPSC Daily Current Affairs 26-27 September 2023 | स्पर्धा परीक्षा चालू घडामोडी

MPSC Daily Current Affairs 26-27 September 2023 : इंडो-पॅसिफिक आर्मी चीफ्स कॉन्फरन्स, मॉस्को फॉरमॅट, Cipla, ‘खमरी मो सिक्कीम, दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्कार,आशियाई क्रीडा 2023, “2018: एव्हरीवन इज अ हिरो तसेच खाली चालू घडामोडीवर आधारित महत्वाचे प्रश्न आणि Quiz दिली आहे. आपणास जर या चालू घडामोडींची PDF हवी असेल तर. खाली त्यासाठी download लिंक खाली दिली आहे.

MPSC Daily Current Affairs 26-27 September 2023:PDF Downloadक्लिक करा
सप्टेंबर महिन्यातील इतर दिवसांच्या चालू घडामोडी वाचण्यासाठीक्लिक करा
आजचे महत्वाचे प्रश्न वाचण्यासाठी येथे क्लिक करा. क्लिक करा

National | राष्ट्रीय

 • रशियातील कझान येथे आगामी मॉस्को फॉरमॅट बैठकीपूर्वी तालिबानने भारताला आर्थिक मदत आणि मान्यता देण्याचे आवाहन केले आहे.

 • 13 वी इंडो-पॅसिफिक आर्मी चीफ्स कॉन्फरन्स (IPACC) 26 ते 27 सप्टेंबर 2023 दरम्यान नवी दिल्लीतील माणेकशॉ सेंटर येथे झाली.

 • इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (IOC) ने देशातील पहिल्या ग्रीन हायड्रोजनवर चालणाऱ्या बसचे अनावरण केले आहे.

 • मारुती सुझुकी इंडिया, या ऑटोमोबाईल उत्पादक कंपनीने ‘खमरी मो सिक्कीम’ आउटरीच कार्यक्रमाद्वारे ईशान्य भारतातील तरुणांमध्ये करिअरच्या संधींबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी भारतीय नौदलासोबत भागीदारी केली आहे.

 • भारत सरकारने अलीकडेच संयुक्त अरब अमिराती (UAE) मध्ये 75,000 टन गैर-बासमती पांढर्‍या तांदळाच्या निर्यातीला परवानगी देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

Economics Banking | अर्थव्यवस्था

 • अफगाणी चलन चालू तिमाहीत सर्वोत्तम कामगिरी करणारे चलन म्हणून उदयास आले आहे.
  • 26 सप्टेंबरपर्यंत, अफगाणी अमेरिकन डॉलरच्या तुलनेत अंदाजे 78.25 वर व्यापार करत होते.

 • रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) मुंबईस्थित सहकारी बँक, कपोल को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडचा परवाना रद्द केला आहे.

 • रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने पूनावाला फिनकॉर्पच्या यांना इंडसइंड बँकेसोबत को-ब्रँडेड क्रेडिट कार्ड जारी करण्यासाठी मान्यता दिली आहे.

 • भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ने तीन प्रमुख सरकारी बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI), इंडियन बँक आणि पंजाब अँड सिंध बँक यांना विविध नियामक नियमांचे पालन न केल्याबद्दल दंड ठोठावला आहे.

Technology | तंत्रज्ञान

 • Infosys, या IT क्षेत्रातील एक कंपनीने टेक दिग्गज मायक्रोसॉफ्टसोबत धोरणात्मक सहकार्याची घोषणा केली आहे.

 • सिप्ला Cipla या औषध कंपनीने हिमाचल प्रदेशमध्ये ड्रोनद्वारे गंभीर औषधांची डिलिव्हरी सुरू केली आहे.

 • ई-कॉमर्स दिग्गज Amazon.com ने Anthropic या Artificial Intelligence क्षेत्रात काम करणाऱ्या कंपनीसोबत $4 अब्ज गुंतवणूक जाहीर केली आहे.

Sports | क्रीडा

 • आंतरराष्ट्रीय टेनिस हॉल ऑफ फेमसाठी नामांकन मिळालेला लिएंडर पेस हा पहिला आशियाई खेळाडू ठरला आहे.

 • आशियाई क्रीडा स्पर्धा:
  • आशियाई खेळ 2023, भारताने महिलांच्या 25 मीटर पिस्तूल सांघिक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले.
  • भारतीय नेमबाज सिफ्ट कौर साम्राने नेत्रदीपक कामगिरीसह इतिहास रचला, महिलांच्या ५० मीटर रायफल 3 पोझिशन स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले.
  • भारताने 41 वर्षांनंतर घोडेस्वारीत सुवर्णपदक जिंकले.

Awards & Appointments

 • केरळच्या पुरावर आधारित मल्याळम चित्रपट “2018: एव्हरीवन इज अ हिरो” हा चित्रपट 2024 मध्ये ऑस्करमध्ये अधिकृत प्रवेश म्हणून भारताचे प्रतिनिधित्व करेल असे भारतीय फिल्म फेडरेशनने जाहीर केले आहे.

 • अभिनेत्री वहिदा रहमान यांना 2021 चा दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात येणार असल्याची घोषणा केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने केली आहे.

 • जपानी कपड्यांची दिग्गज युनिकलोने Uniqlo बॉलीवूड अभिनेत्री कतरिना कैफला भारतातील ब्रँड अम्बॅसडर म्हणून नियुक्त केले आहे.

दिनविशेष

 • 27 September:
  • World Tourism Day 2023 – जागतिक पर्यटन दिन 2023
 • 26 September:
  • World Environmental Health Day – जागतिक पर्यावरणीय आरोग्य दिवस

Important Questions | महत्वाचे प्रश्न


MPSC Daily Current Affairs 26-27 September 2023 Download PDF

Leave a Comment