संत जनाबाई माहिती

संत जनाबाई या महाराष्ट्रातील एक महान संत नामदेव यांच्या काळातील संत कवी होत्या. संत जनाबाई यांचा जन्म अंदाजे १२५८ मध्ये परभणी जिल्ह्यातील गोदावरी नदीच्या किनारी असलेल्या गंगाखेड या गावी झाला. संत जनाबाईच्या वडिलांचे नाव दमा व आईचे नाव करुंड बाई असे होते. या लेखात आपण संत जनाबाई यांची माहिती (Sant Janabai Information in Marathi) खाली दिली आहे.

ते उभयता नियमित पंढरीची वारी करीत असत. तिच्या वडिलांनी जनाबाईंना दामाशेट शिंपी यांच्या पदरात टाकले, तेव्हापासून त्या संत शिरोमणी नामदेव यांच्या कुटुंबातील एक घटक बनल्या. त्या स्वत:ला ‘नामयाची दासी’ म्हणवून घेत असत.

Table of Contents


Join Groups for Latest Updates

Join WhatsApp Group

Join Telegram Channel


संत जनाबाईंचा परिचय (Sant Janabai Information in Marathi)

जनाबाईंचा जन्म परभणी येथील गंगाखेड येथील दमा नावाच्या विठ्ठलभक्ताच्या घरी झाला. जनाबाईंच्या एका अभंगातील “माझ्या वडिलांचे दैवत| तो हा पंढरीनाथ ||” या ओळींवरून त्यांचे वडील दमा हेदेखील वारकरी असावेत, अशी शक्यता दिसते. त्यांच्या आईचे नाव करुंड. त्याही भगवद्भक्त होत्या.

संत जनाबाई या संत कवयित्री म्हणून जनमानसात लोकप्रिय आहेत. महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यातून स्त्रिया जात्यावर दळण दळताना, कांडताना त्यांच्या ओव्या गातात.


Sant Janabai Information in Marathi

खाली आम्ही संत जनाबाईंची संक्षेप्त स्वरूपात माहिती दिली आहे.

information about Sant janabai in marathi

पूर्ण नाव

संत जनाबाईं

टोपण नाव

नामयाची जनी

वडिलांचे नाव

दमा

आईचे नाव

करुंड

गुरु

नामदेव महाराज

जन्म

अंदाजे इ.स. १२५८ गंगाखेड

मृत्यू

अंदाजे इ.स. १३५०

संप्रदाय

संत

समाधी स्थळ

गंगाखेड


संत जनाबाईंचे कुटुंब (sant janabai marathi mahiti)

जनाबाई पाच-सहा वर्षांच्या असतानाच त्यांच्या वडिलांनी जनाबाईंला संत नामदेवांचे वडील दामाशेट शिंपी यांच्याकडे पाठवले. नामदेवांचे आई-वडील, थोरली बहीण, पत्नी, चार मुलगे, चार सुना, एक मुलगी, संत जनाबाई व संत नामदेव असे 15 माणसांचे हे कुटुंब होते.

जनाबाईंच्या लाघवी आणि देवभक्त स्वभावामुळे त्या लवकरच नामदेवांच्या कुटुंबातील एक सदस्य झाल्या. ‘नामयाची दासी’ असं स्वतःला म्हणून घेत असतांना त्यांना आनंद व्हायचा.

जनाबाईचे वडील तेली होते आणि तेल काढण्याचे काम करायचे. जनाबाई लहान असताना तिला सोबत घेऊन पंढरपूर मंदिरात दर्शनासाठी गेल्या. जनाबाईच्या मनात पांडुरंगाबद्दल भक्ती प्रेम निर्माण झाले. मनात भगवंताची भक्ती जागृत झाली.


संत जनाबाईंचे जीवन (Information about Sant Janabai in marathi)

विठ्ठल भक्ती करताना आणि नामदेवांच्या घरी दासी म्हणून काम करताना जनाबाईंना अनेक संकटांचा, दुःखांचा सामना करावा लागला. प्रसंगी चोरीचा आळही त्यांच्यावर आला. परंतु या सर्वातून जणू विठ्ठल आपल्याला वाचवतोय असाच भाव त्यांच्या गीतातून कायम व्यक्त होत राहिला. स्त्रियांची कुचंबणा, त्याकाळातली त्यांची स्थिती हे सर्व हे त्यांच्या अभंगातून व्यक्त झाले. त्यामुळे जनाबाईंचे अभंग स्त्रियांना आपले वाटले.

त्यांना संत संग हा नामदेवांमुळे लाभला. संत विसोबा खेचर, संत नामदेव, संत जनाबाई अशी ही गुरू परंपरा आपल्याला पहायला मिळते.

संत ज्ञानेश्वरांच्या काळातील सर्व संतांना जनाबाईंनी प्रत्यक्ष पाहिलेले आहे. संत ज्ञानदेवाविषयी त्यांची भक्ति अनन्यसाधारण अशीच होती.घरातील प्रत्येक कामे जसे शेण काढणे, गवर्‍या वेचणे हे करत असतांना जनाबाईंचे नामस्मरण अव्याहत सुरू असायचे.


संत जनाबाईंबद्दल थोडक्यात माहिती sant janabai mahiti in marathi

Sant Janabai Information in Marathi

खाली संत जनाबाईंबद्दल थोडक्यात पण महत्वाच्या १० ओळी दिल्या आहेत.

Sant janabai information in 10 lines in marathi

 1. संत जनाबाईंच्या आयुष्यातली सुरवातीचा 5-6 वर्षाचा काळ हा त्यांच्या जन्मगावी गेला.
 2. मुळातच त्या हुशार असल्याने त्यांना बालपणी पासून देवाची भक्ती करणं अत्यंत आवडायचं.
 3. त्यांच्यातला समजूतदारपणा लक्षात आल्यावर त्यांच्या वडिलांनी त्यांना बालपणीच दामाजी शिंपी यांच्याकडे कामानिमित्त पाठवले,दामाजी शिंपी हे संत नामदेवांचे वडील होते.
 4. संत नामदेवांचे कुटुंब मोठे असून ते सर्व जनाबाईंना आपल्या कुटुंबातील सदस्या प्रमाणे जीव लावत तसेच त्यांचे सर्व लाड सुद्धा पुरवत.
 5. संत नामदेव यांच्या समवेत राहून त्यांना अनेक संताचा सहवास लाभला. त्यांच्या अनेक अभंग रचनेत त्या स्वतःला “नामयाची जनी” म्हणून संबोधतात.
 6. त्यांच्या वडिलांचे नाव ‘दमा’ तर आईचे नाव ‘करूंड’ असे होते
 7. त्यांच्या अभंग गाथेतील जवळपास 350 अभंग आजही उपलब्ध आहेत
 8. त्यांनी लीहलेले काही अभंग संत नामदेवांच्या गाथेत आपल्याला पाहायला मिळतात. त्यांचे अभंग हे “कृष्णजन्म” , “बाळक्रीडा”, “थाळीपाक”, “प्रल्हाद चरित्र”, “काकडा आरती”, “भक्तीपर अभंग”, “संतपर अभंग”, “हितवचने”, “अख्यानपर” या विषयावर आधारित आहेत.
 9. त्यांच्या प्रत्येक अभंगात त्यांनी संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत सेना न्हावी, संत चोखामेळा, संत गोरोबा कुंभार, संत सोपान देव ई. संताची महती वर्णिली आहे.
 10. त्या शेवटपर्यंत पंढरपुरात राहील्या आजही त्यांच्या जून्या वस्तू , पंढरपुरात “गोपाळपूरा” इथे आपल्याला पाहायला मिळतात.

संत जनाबाई प्रसिद्ध अभंग (Sant janabai Abhang)

विठू माझा लेकुरवाळा
संगे गोपाळांचा मेळा
विठू माझा लेकुरवाळा

निवृत्ती हा खांद्यावरी सोपानाचा हात धरी
पुढे चाले ज्ञानेश्वर मागे मुक्ताई सुंदर
विठू माझा लेकुरवाळा

गोरा कुंभार मांडीवरी चोखा जीवा बरोबरी
बंका कडेवरी नामा करांगुळी धरी
विठू माझा लेकुरवाळा

जनी म्हणे गोपाळा करी भक्तांचा सोहळा
जनी म्हणे गोपाळा करी भक्तांचा सोहळा
विठू माझा लेकुरवाळा संगे गोपाळांचा मेळा
विठू माझा लेकुरवाळा

– sant janabai ovi –

जनाबाईंवर आधारित चित्रपट, पुस्तके sant janabai ovya

जगाचा संसार सुरळीत चालविण्यासाठी त्यांनी अभंगांद्वारे मानवाला व एकूणच तत्कालीन समाजाला मार्गदर्शन केले. त्यांचे मार्गदर्शन समाजाच्या दृष्टीने मौलिक ठरले.

 • ओंकाराची रेख जना (चरित्रवजा कादंबरी; लेखिका – मंजुश्री गोखले)
 • संत जनाबाई (लेखन – संत जनाबाई शिक्षण संस्था; गंगाखेड, प्रकाशन – डायमंड पब्लिकेशन्स) – प्रकाशन १९७६, ISBN 978-93-86401-43-4, या पुस्तकामध्ये जनाबाई यांच्या अभंगांचे संकलन केलेले आहे. एकूण ५४७ रचनांचा समावेश यामध्ये केला आहे.
 • संत जनाबाई (सुहासिनी इर्लेकर|डाॅ. सुहासिनी यशवंत इर्लेकर]]; पुस्तक आणि त्याची पीडीएफ आवृत्ती; महाराष्ट्र सरकार प्रकाशन),
 • संत जनाबाई चरित्र (बालसाहित्य; लेखक – प्रा. बाळकृष्ण लळीत)
 • संत जनाबाई जीवन चरित्र (व्हीडिओ; दिग्विजय बाबर)
 • संत जनाबाई (मराठी/हिंदी चित्रपट; लेखन, दिगदर्शन – राजू फुलकर)
 • संत जनाबाई (मराठी/हिंदी चित्रपट (१९४९); दिग्दर्शक – गोविंद बी. घाणेकर; प्रमुख भूमिका – हंसा वाडकर)
 • संत जनाबाई अभंग गाथा (संपादक – नितीन सावंत)
 • संत जनाबाई – अभंग संग्रह १ ([१])
 • संत जनाबाई – अभंग संग्रह २ ([२])
 • संतचरित्रकार महिपतीबुवा ताहराबादकर यांनी लिहिलेल्या भक्त-विजय या ग्रंथामध्ये, (प्रकाशन १९५०) संत नामदेव यांच्या चरित्रात संत जनाबाई यांची माहिती आली आहे.
 • जनाबाई, आजगावकर जगन्नाथ रघुनाथ, महाराष्ट्र कविचरित्र, भाग पहिला, दामोदर सावळाराम आणि मंडळी, मुंबई, दुसरी आवृत्ती, १९२९
 • समर्थाची दासी संत जनाबाई, हेमंत विष्णू इनामदार, भक्तिपंथ : नवचिंतन, फडके बुकसेलर्स, कोल्हापूर, १९७७
 • संत जनाबाई : चरित्र व काव्य, नंदुरकर मो.द., १९७६
 • संत जनाबाई आणि मुक्तेश्वर, नांदापूरकर ना.गो. (म.म.पोतदार स्मारक ग्रंथ), १९५०एस.एन.
 • जनाबाईचा थालीपाक, ले.शिवराम महादेव परांजपे, भारत इतिहास संशोधक मंडळ, षण्मासिक वृत्त, पुणे १९१३
 • स्त्रीमुक्तीचा आत्मस्वर, भवाळकर तारा, लोकवाङ्मय गृह, मुंबई, दुसरी आवृत्ती , २०१२
 • जनाबाईंचे निवडक अभंग, भालेराव इंद्रजित, प्रतिभास प्रकाशन, परभणी, १९९७

संत जनाबाईंचे काही अभंग

संत जनाबाई यांच्या अभंगांचे वर्गीकरण खालील प्रमाणे केलेले आढळते.

 • भक्तीपर अभंग – एकूण अभंग १५५, यामध्ये नाममहात्म्य, विठ्ठलमहिमा, भक्तिस्वरूप, आर्त भक्तीपर अभंग यांचा समावेश होतो.
 • परमार्थ जीवन – एकूण अभंग ५६, मनाचा निश्चय, आत्मस्वरूप स्थिती, मागणे अशा अभंगांचा समावेश होतो.
 • संतमहिमा – एकूण अभंग ४८, यामध्ये संतस्तुती, ज्ञानेश्वर स्तुती, सेना न्हावी आणि संत नामदेव यांच्या स्तुतीपर अभंगांचा समावेश होतो.
 • आख्यानपर रचना – एकूण अभंग ४५, यामध्ये हरिश्चंद्राख्यान, थाळीपाक, दशावतार, बालक्रीडा याचा समावेश होतो.
 • स्फुट काव्यरचना – एकूण अभंग ११, यामध्ये पाळणा, पदे, कूटरचना, आरती, जाते यांचा समावेश होतो.
 • हितवचने – एकूण अभंग ३२ – उपदेशवाणी आणि प्रारब्धगती यांचा समावेश होतो.

संत जनाबाईंचे देवस्थान sant janabai janmasthan

Sant Janabai Information in Marathi

 • संत जनाबाई यांनी त्यांचं संपूर्ण जिवन भगवान पांडुरंगाची भक्ती करण्यात वाहिलं. त्या शेवटपर्यंत पंढरपुरात राहील्या आजही त्यांच्या जून्या वस्तू , पंढरपुरात “गोपाळपूरा” इथे आपल्याला पाहायला मिळतात.
 • आजीवन पांडुरंगाची भक्ती करणं, कसलाही स्वार्थ, लोभ नसताना ज्यांनी संताच महत्व आपल्या अभंगातून जनतेत रुजवलं त्या महान संत जनाबाई यांनी आपल्या आयुष्याची कारकीर्द आषाढ कृष्ण त्रयोदशी इ. स. 1350 ला संपवत भगवान पांडुरंगाच्या महाद्वारी त्या अनंतात विलीन झाल्या.
 • संत जनाबाई यांच्या जन्म व मृत्यूची इतिहासात ठोस अशी नोंद जरी नसली तरी त्यांचा अंदाजे कार्यकाळ इ. स. 1258 ते 1350 असावा. sant janabai information in marathi सत जनाबाई यांनी आपल्या जिवनात भक्तीचा खरा आनंद घेतला. त्यांनी मनोभावे पांडुरंग परमात्म्याची सेवा केली. त्यांना “संत नामदेव महाराज” यांच्या सारख्या महान संताच्या सानिध्यात राहायला मिळालं.

Sant Janabai photo


Sant janabai Information in Marathi


संत जनाबाईंचे गुरु कोण आहेत?

संत नामदेव हेच त्यांचे पारमार्थिक गुरू होते. श्री संत ज्ञानदेव-विसोबा खेचर-संत नामदेव-संत जनाबाई अशी त्यांची गुरुपरंपरा आहे.

संत जनाबाई आईचे नाव काय आहे?

संत जनाबाईच्या वडिलांचे नाव दमा व आईचे नाव करुंड बाई असे होते.

संत जनाबाई यांचा जन्म कुठे झाला?

परभणी जिल्ह्यातील गोदावरी नदीच्या किनारी असलेल्या गंगाखेड या गावी झाला

संत जनाबाई यांचे मूळ गाव कोणते

परभणी जिल्ह्यातील गोदावरीच्या तीरावरील गंगाखेड हे जनाबाईंचे गाव होय

संत जनाबाई यांचा जन्म कधी झाला?

इ. स.1258 मध्ये झाला.

संत जनाबाई यांचा मृत्यू कधी झाला?

इ.स. 1350 मध्ये झाला.

संत जनाबाई यांच्या जुन्या वस्तु कोठे ठेवण्यात आल्या आहेत?

पंढरपुरात “गोपाळपूरा” इथे आपल्याला पाहायला मिळतात.

संत जनाबाई यांची समाधी कोठे आहे?

गंगाखेड, परभणी, (महाराष्ट्र)Join Groups for Latest Updates

Join WhatsApp Group

Join Telegram Channel