संत तुकाराम महाराज माहिती

संत तुकाराम महाराज ज्यांना तुका, तुकोबाराया, तुकोबा म्हणूनही ओळखले जाते, हे १७ व्या शतकात महाराष्ट्रातील देहू गावातील “वारकरी संप्रदायाचे” हिंदू, मराठी संत होते. ते पंढरपूरच्या भगवान पांडुरंगाचे भक्त होते. ते त्यांच्या अभंग नावाच्या भक्तीपर काव्यासाठी प्रसिद्ध आहेत, जे महाराष्ट्रात लोकप्रिय आहेत, त्यांच्या अनेक कविता सामाजिक सुधारणांशी संबंधित आहेत. या लेखात आपण संत संत ज्ञानेश्वर यांची माहिती (Sant Tukaram Information in Marathi) खाली दिली आहे.

Table of Contents


Join Groups for Latest Updates

Join WhatsApp Group

Join Telegram Channel


संत तुकारामांचा परिचय (Sant Tukaram Information in Marathi)

तुकारामांचा जन्म भारतातील आधुनिक महाराष्ट्र राज्यात झाला. त्यांचे पूर्ण नाव तुकाराम बोल्होबा अंबिले होते. त्यांचा जन्म 1598 किंवा 1608 मध्ये महाराष्ट्रातील पुण्याजवळील देहू नावाच्या गावात झाला.

तुकारामांचा जन्म कनकाई आणि बोल्होबा अंबिले यांच्या पोटी झाला. तुकारामांच्या कुटुंबाकडे किरकोळ विक्री आणि सावकारी व्यवसाय होता तसेच ते शेती आणि व्यापारात गुंतलेले होते. त्यांचे पालक विठोबाचे भक्त होते. तुकाराम किशोरवयात असताना त्यांचे आई-वडील दोघेही मरण पावले.

तुकारामांच्या पहिल्या पत्नीचे नाव रखमा बाई होते आणि त्यांना संतू नावाचा मुलगा होता. तथापि, 1630-1632 च्या दुष्काळात त्याचा मुलगा आणि पत्नी दोघेही भुकेने मरण पावले. तुकारामांनी पुन्हा लग्न केले आणि त्यांची दुसरी पत्नी अवलाई जिजाबाई होती.


Sant Tukaram Information in Marathi

खाली आम्ही संत ज्ञानेश्वरांची संक्षेप्त स्वरूपात माहिती दिली आहे.

information about Sant tukaram in marathi

पूर्ण नाव

तुकाराम बोल्होबा अंबिले

टोपण नाव

तुका, तुकोबाराया, तुकोबा

वडिलांचे नाव

बोल्होबा अंबिले

आईचे नाव

कनकाई बोल्होबा आंबिले

अपत्ये

महादेव, विठोबा, नारायण, भागूबाई

गुरु

निवृत्तीनाथ

प्रमुख ग्रंथ

तुकारामाची गाथा

जन्म

२१ जानेवारी १६०८

मृत्यू

१९ मार्च, १६५०

संप्रदाय

वारकरी संप्रदाय

समाधी स्थळ


संत ज्ञानेश्वरांचे कुटुंब (Sant Tukaram Maharaj)

तुकोबांना त्यांच्या प्रापंचिक जीवनात विपत्तींचे तडाखे सहन करावे लागले. अनेक प्रापंचिक दुःखे भोगावी लागली. ते १७-१८ वर्षांचे असताना त्यांचे आई-वडील मरण पावले, मोठा भाऊ विरक्तीमुळे तीर्थाटनाला निघून गेला. भयंकर दुष्काळाचा त्यांना सामना करावा लागला.

संतू नावाचा त्यांचा मोठा मुलगा दुष्काळातच गेला, गुरे ढोरेही गेली, महाजनकी बुडाली. मन उदास झाले, संसारात विरक्ती आली. या परिस्थितीत त्यांनी श्रीविठ्ठलावरची आपली परमभक्ती कायम ठेवत देहू गावाजवळील भंडारा डोंगरावर उपासना चालू केली.

चिरंतनाचा, शाश्वताचा शोध घेत असताना त्यांना साक्षात्कार झाला. तेथेच परब्रह्मस्वरूप ‘श्रीविठ्ठल’ त्यांना भेटला असे मानले जाते.


संत ज्ञानेश्वरांचे जीवन (Information about Sant Tukaram in marathi)

संत तुकारामांना चार मुले होती. कन्या भागीरथी व काशी तर मुलगे नारायण आणि महादेव. यापैकी दोन आजाराने मरण पावले. पहिली बायको गेल्यानंतर त्यांनी पुण्यातील आप्पाजी गुळवे यांची कन्या नवलाई ऊर्फ जिजाऊ हिच्याबरोबर त्यांनी दुसरा विवाह केला. ती स्वभावाने खाष्ट होती परंतु सती सावित्रीसारखी पतिव्रता होती. संत तुकारामांचा संसार तिने नीट सांभाळला, त्यांची विरक्ती सांभाळली.

संत तुकाराम महाराज भंडारा डोंगरावर आत्मचिंतनासाठी तेरा दिवस बसले. ईश्वराची करुणा भाकत चिंतन केले, त्यावेळी त्यांची सर्व देखभाल जिजाऊने केली. संत तुकारामांनी (sant tukaram information) स्वतःचा संसार सुखाचा करण्यापेक्षा जगाच्या कल्याणासाठी कीर्तनातून अभंगवाणी रचली, लौकिकार्थाने मायाजालात गुंतले नाहीत.


संत ज्ञानेश्वरांबद्दल थोडक्यात माहिती

Sant Tukaram Information in Marathi

खाली संत तुकारामबद्दल थोडक्यात पण महत्वाच्या १० ओळी दिल्या आहेत.

Sant tukaram information in marathi 10 lines

 1. संत तुकाराम वसा १७व्या शतकातील महाराष्ट्रातील हिंदू संत होते.
 2. ते भगवान विठ्ठल (कृष्ण) चे भक्त होते आणि त्यांच्या भक्ती काव्यासाठी ओळखले जाते, ज्याला अभंग म्हणतात.
 3. त्यांनी 3000 हून अधिक अभंग लिहिले, ज्यात प्रेम, भक्ती आणि सामाजिक भाष्य आहे.
 4. त्यांनी भक्ती आणि समतेचे महत्त्व सांगितले.
 5. समाजातील ढोंगीपणा आणि अंधश्रद्धेवरही त्यांनी टीका केली.
 6. महाराष्ट्रातील भक्ती चळवळीतील एक महत्त्वाची व्यक्ती मानली जाते.
 7. संत तुकाराम महाराजांचे संपूर्ण नाव तुकाराम बोल्होबा अंबिले.
 8. संत तुकारामांनी भगवत गीतेचा अर्थ पटवून देणारा गीतगाथा हा ग्रंथ लिहिला.
 9. तुकाराम महाराजांनी जवळपास 4500 अभंग लिहिले.
 10. वारकरी संप्रदायामध्ये ते जगद्गुरु या नावाने प्रसिद्ध आहेत.

संत तुकाराम प्रसिद्ध अभंग (Sant Tukaram Abhang)

सुंदर ते ध्यान उभे विटेवरी ।
कर कटावरी ठेवूनियां ॥१॥

तुळसी हार गळां कासे पीतांबर ।
आवडे निरंतर हेंचि ध्यान ॥२॥

मकरकुंडले तळपती श्रवणी ।
कंठी कौस्तुभमणि विराजित ॥३॥

तुका म्हणे माझे हेचि सर्व सुख ।
पाहीन श्रीमुख आवडीनें ॥४॥

-अभंग १४ –

तुकारामांचे अभंग, जीवन आणि त्यासंबंधी लिहिली गेलेली पुस्तके

जगाचा संसार सुरळीत चालविण्यासाठी त्यांनी अभंगांद्वारे मानवाला व एकूणच तत्कालीन समाजाला मार्गदर्शन केले. त्यांचे मार्गदर्शन समाजाच्या दृष्टीने मौलिक ठरले.

 • अभंगवाणी प्रसिद्ध तुकयाची (ग.बा. सरदार)
 • अभंगवाणी श्री तुकयाची (प्रा. डाॅ. गणेश मालधुरे)
 • आनंदओवरी (कादंबरी – लेखक दि.बा. मोकाशी)
 • आनंड डोह (२०१४). नाटक – लेखक : योगेश्वर
 • आनंदाचे डोही आनंद तरंग (कादंबरी, लेखिका मृणालिनी जोशी)
 • ’A complete collection of the poems of Tukáráma, the Poet of Maharashtra (दोन खंड-इ.स.१८६९) मराठीतून इंग्रजीत भाषांतर करणारे : विष्णू परशुरामशास्त्री पंडित, शंकर पांडुरंग पंडित आणि जनार्दन सखाराम गाडगीळ
 • तुका आकाशाएवढा : लेखक गो.नी. दांडेकर
 • तुका झाला पांडुरंग (कादंबरी, भा.द. खेर)
 • तुका म्हणे : लेखक डॉ. सदानंद मोरे
 • तुका म्हणे भाग १, २ : लेखक डॉ. दिलीप धोंगडे
 • तुका म्हणे सोपी केली पायवाट (डॉ. अविनाश वाचासुंदर – दैनंदिन उपयोगाच्या तुकारामांच्या निवडक १५० अभंगांचे निरूपण)
 • तुका झाले कळस (डाॅ. व.दि. कुलकर्णी)
 • तुका झालासे कळस : लेखक डॉ. प्रभाकर श्रावण चौधरी
 • तुका झालासे कळस : लेखक स.कृ. जोशी
 • तुका झालासे कळस : लेखक डॉ. रामचंद्र देखणे
 • तुका झालासे कळस: लेखक अर्जुन जयराम परब
 • तुका झालासे विठ्ठल : (ढवळे प्रकाशन)
 • संत तुकाराम (बाबाजीराव राणे)
 • तुकाराम – अंतर्बाह्य संघर्षाची अनुभवरूपे (म.सु. पाटील)
 • तुकाराम दर्शन (डॉ. सदानंद मोरे)
 • समग्र तुकाराम दर्शन (किशोर सानप)
 • तुकाराम (हिंदी बालनाट्य, लेखिका – धनश्री हेबळीकर, दिग्दर्शन अभिजित चौधरी, निर्माता युवराज शहा)
 • तुकाराम गाथा (भालचंद्र नेमाडे)
 • तुका राम दास (तुलसी आंबिले, लोकसत्ता दैनिकात २०१६ साली प्रसिद्ध झालेल्या दोन सदरांतील मजकुराचे संकलन)
 • तुकाराम नावाचा संत माणूस (विश्वास सुतार)
 • श्री तुकाराम महाराज चरित्र – (प्रा. र.रा. गोसावी, वीणा गोसावी)
 • तुकाराम महाराजांची जीवनसूत्रे : लेखक डॉ. यादव अढाऊ
 • तुकाराम व्यक्तित्व आणि कवित्व : लेखक किशोर सानप आणि मनोज तायडे
 • तुकारामांचा शेतकरी : लेखक डॉ. आ.ह. साळुंखे
 • तुकारामांची अभंगवाणी : लेखक पंडित कृष्णकांत नाईक
 • तुकारामाचे निवडक १०० अभंग : लेखक डॉ. दिलीप चित्रे
 • तुकारामाचे निवडक १००० अभंग (व्हीनस प्रकाशन)
 • तुकारामाच्या अभंगांची चर्चा (खंड १, २) (वासुदेव पटवर्धन)
 • तुका, विठू आणि मी : लेखिका यशश्री भवाळकर
 • तुकोबा : लेखक शंकर पांडुरंग गुणाजी
 • तुकोबाचे वैकुंठगमन दिलीप चित्रे
 • धन्य तुकाराम समर्थ (एकपात्री नाट्यप्रयोग), लेखक व सादरकर्ते नामदेव तळपे
 • निवडक तुकाराम (वामन देशपांडे)
 • ’The poems of Tukārāma’ : translated and re-arranged, with notes and an introduction. लेखक : जे. नेल्सन फ्रेझर आणि के. बी. मराठे.
 • पुन्हा तुकाराम : दिलीप चित्रे
 • प्रसादाची वाणी अर्थात तुका म्हणे (डॉ.सदानंद मोरे)
 • मुलांसाठी तुकाराम (वामन देशपांडे)
 • रोखठोक संत तुकाराम (डाॅ. यशवंतराव पाटीलसर)
 • One Hundred Poems of Tukaram (चंद्रकांत म्हात्रे)
 • वारीच्या वाटेवर महाकादंबरी (दशरथ यादव)
 • विद्रोही तुकाराम : लेखक आ.ह. साळुंखे
 • विद्रोही तुकाराम – समीक्षेची समीक्षा : लेखक आ.ह. साळुंखे
 • संत तुकाराम आणि रेव्ह. टिळक : एक भावानुबंध (लेखक : सुभाष पाटील):
 • श्री संत तुकाराम चरित्र ((Sant Tukaram Information in Marathi -अनंत पैठणकर)
 • संत तुकाराम (चरित्र) (कृ.अ. केळूसकर, १८९५)
 • संत तुकाराम (बालवाङ्‌मय, रवींद्र भट)
 • संत तुकाराम – व्यक्ती व वाङ्मय (प्रा. डाॅ. शोभा गायकवाड)
 • संत तुकारामांचे अप्रकाशित अभंग (वा.सी. बेंद्रे)
 • तुकारामबावांंच्या गाथेचे ‍‍निरूपण (संपादक : मारुती भाऊसाहेब जाधवगुरुजी; प्रकाशक : संत तुकाराम अध्यासन, ‍कोल्हापूर शिवाजी ‍विद्यापीठ)
 • संतसूर्य तुकाराम (कादंबरी, लेखक : आनंद यादव)
 • साक्षात्कारी संत तुकाराम (शं.दा. पेंडसे)
 • ‘Says Tuka (चार खंड) : लेखक दिलीप चित्रे
 • द सेंट पोएट्स ऑफ महाराष्ट्र : देअर इम्पॅक्ट ऑन सोसायटी (इंग्रजी) (१९६९) (गं.बा. सरदार)

तुकाराम महाराजांवर आधारित चित्रपट आणि लोकप्रिय संस्कृती

 • तुकाराम (1921) – शिंदे यांचा चित्रपट
 • संत तुकाराम (1921) – कलानिधी पिक्चर्स
 • संत तुकाराम (1936)
 • Thukkaram (1938) तमिळ चित्रपट – बी.एन. राव
 • Santha Thukaram (1963) कन्नड भाषेत
 • संत तुकाराम (1965) हिन्दी भाषेत
 • भक्त तुकाराम (1973) तेलुगु भाषेत
 • तुकाराम (2012) मराठी भाषेत

तुकारामांशी संबंधित ठिकाणे

 • तुकाराम उद्यान (निगडी-पुणे)
 • तुकारामनगर (खराडी-पुणे)
 • तुकारामनगर (तळेगाव दाभाडे-पुणे)
 • तुकारामनगर (पिंपरी-पुणे)
 • तुकारामवाडी (जळगांव)
 • तुकारामवाडी (डोंबिवली पूर्व)
 • तुकारामवाडी (पेण-कोंकण)
 • संत तुकाराम कॅन्सर हॉस्पिटल (संत तुकाराम चौक अकोला)

तुकाराम महाराजांचे काही अभंग

संत तुकाराम महाराज हे भगवान विठोबावरील त्यांची अखंड भक्ती आणि अभंग जग प्रसिद्ध आहेत. जगदगुरू तुकाराम महाराज यांच्या नावातच “राम” आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासारख्या एक युगप्रर्वतक महापुरुषाने तुकाराम महाराज यांचे आशीर्वाद घेऊन आपल्या कार्याला सुरुवात केली होती. यामुळे तुकाराम महाराजांना “जगदगुरू” असे संबोधले जाते.

समचरणदृष्टि विटेवरी साजिरी । तेथें माझी हरी वृत्ति राहो ॥१॥
आणीक न लगे मायिक पदार्थ । तेथें माझें आर्त्त नको देवा ॥ध्रु.॥
ब्रम्हादिक पदें दुःखाची शिराणी । तेथें दुश्चित झणी जडों देसी ॥२॥
तुका म्हणे त्याचें कळलें आम्हां वर्म । जे जे कर्मधर्म नाशवंत ॥३॥

[1]

सुंदर तें ध्यान उभे विटेवरी । कर कटावरी ठेवूनियां ॥१॥तुळसीचे हार गळां कासे पीतांबर । आवडे निरंतर तें चि रूप ॥ध्रु.॥मकरकुंडलें तळपती श्रवणीं । कंठीं कौस्तुभमणि विराजित ॥२॥तुका म्हणे माझें हें चि सर्व सुख । पाहीन श्रीमुख आवडीनें ॥३॥

[2]

सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती । रखुमाईच्या पती सोयरिया ॥१॥गोड तुझें रूप गोड तुझें नाम । देईं मज प्रेम सर्व काळ ॥ध्रु.॥विठो माउलिये हा चि वर देईं । संचरोनि राहीं हृदयामाजी ॥२॥तुका म्हणे कांहीं न मागे आणीक । तुझे पायीं सुख सर्व आहे ॥३॥दर तें ध्यान उभे विटेवरी । कर कटावरी ठेवूनियां ॥१॥तुळसीचे हार गळां कासे पीतांबर । आवडे निरंतर तें चि रूप ॥ध्रु.॥मकरकुंडलें तळपती श्रवणीं । कंठीं कौस्तुभमणि विराजित ॥२॥तुका म्हणे माझें हें चि सर्व सुख । पाहीन श्रीमुख आवडीनें ॥३॥

[3]

राजस सुकुमार मदनाचा पुतळा । रविशशिकळा लोपलिया ॥१॥कस्तुरीमळवट चंदनाची उटी । रुळे माळ कंठीं वैजयंती ॥ध्रु.॥मुगुट कुंडले श्रीमुख शोभलें । सुखाचें ओतलें सकळ ही ॥२॥कासे सोनसळा पांघरे पाटोळा । घननीळ सांवळा बाइयानो ॥३॥सकळ ही तुम्ही व्हा गे एकीसवा । तुका म्हणे जीवा धीर नाहीं ॥४॥

[4]

कर कटावरी तुळसीच्या माळा । ऐसें रूप डोळां दावीं हरी ॥१॥ठेविले चरण दोन्ही विटेवरी । ऐसें रूप हरी दावीं डोळां ॥ध्रु.॥कटीं पीतांबर कास मिरवली । दाखवीं वहिली ऐसी मूर्ती ॥२॥गरुडपारावरी उभा राहिलासी । आठवें मानसीं तें चि रूप ॥३॥झुरोनी पांजरा होऊं पाहें आतां । येईं पंढरीनाथा भेटावया ॥४॥तुका म्हणे माझी पुरवावी आस । विनंती उदास करूं नये ॥५॥

[5]

गरुडाचें वारिकें कासे पीतांबर । सांवळें मनोहर कैं देखेन ॥१॥बरवया बरवंटा घनमेघ सांवळा । वैजयंतीमाळा गळां शोभे ॥ध्रु.॥मुगुट माथां कोटि सूर्यांचा झळाळ । कौस्तुभ निर्मळ शोभे कंठीं ॥२॥ओतींव श्रीमुख सुखाचें सकळ । वामांगीं वेल्हाळ रखुमादेवी ॥३॥उद्धव अक्रूर उभे दोहींकडे । वर्णिती पवाडे सनकादिक ॥४॥तुका म्हणे नव्हे आणिकांसारिखा । तो चि माझा सखा पांडुरंग ॥५॥

[6]

वाळो जन मज म्हणोत शिंदळी । परि हा वनमाळी न विसंबें ॥१॥सांडूनि लौकिक जालियें उदास । नाहीं भय आस जीवित्वाची ॥२॥नाइकें वचन बोलतां या लोकां । म्हणे जालों तुका हरिरता ॥३॥

[7]

आधिल्या भ्रतारें काम नव्हे पुरा । म्हणोनि व्यभिचारा टेकलियें ॥१॥रात्रंदिस मज पाहिजे जवळी । क्षण त्यानिराळी न गमे घडी ॥२॥नाम गोष्टी माझी सोय सांडा आतां । रातलें अनंता तुका म्हणे ॥३॥

[8]

हाचि नेम आतां न फिरें माघारी । बैसलें शेजारीं गोविंदाचे ॥१॥घररिघी जालें पट्टराणी बळें । वरिलें सांवळें परब्रम्ह ॥२॥बळियाचा अंगसंग जाला आतां । नाहीं भय चिंता तुका म्हणे ॥३॥

[9]

नाहीं काम माझें काज तुम्हांसवें । होतें गुप्त ठावें केलें आतां ॥१॥व्यभिचार माझा पडिला ठाउका । न सर ती लोकांमाजी जालें ॥२॥न धरावा लोभ कांहीं मजविशीं । जालें देवपिशी तुका म्हणे ॥३॥

[10]

विसरले कुळ आपुला आचार । पती भावे दीर घर सोय ॥१॥सांडिला लौकिक लाज भय चिंता । रातलें अनंता चित्त माझें ॥२॥मज आतां कोणी आळवाल झणी । तुका म्हणे कानीं बहिरी जालें ॥३॥

[11]

न देखें न बोलें नाइकें आणीक । बैसला हा एक हरि चित्तीं ॥१॥सासुरें माहेर मज नाहीं कोणी । एक केलें दोन्ही मिळोनियां ॥२॥आळ आला होता आम्ही भांडखोरी । तुका म्हणे खरी केली मात ॥३॥

[12]


तुकारामांचे समाधी स्थळ – देहू, पुणे

Sant Tukaram Information in Marathi

देहूला संत तुकाराम महाराज जेथून वैकुंठाला गेले, त्या स्थानावर नांदुरकीचे एक झाड आहे. तुकाराम बिजेला बरोबर दुपारी १२:०२ वाजता तुकाराम वैकुंठाला गेले, त्या वेळी हा नांदुरकीचा वृक्ष प्रत्यक्ष हलतो, असे सांगितले जाते. संत तुकाराम महाराज हे देहू या गावी जन्मले.

फाल्गुन वद्य द्वितीयेला तुकारामांचे सदेह वैकुंठ-गमन झाले, असे मानले जाते. हा दिवस ‘तुकाराम बीज’ म्हणून ओळखला जातो. तुकाराम महाराज (information about sant tukaram) हे संसारी असून सुद्धा त्यांनी आयुष्य परमार्थाकडे वळवले. सर्व समाज श्रीमंत असावा अशी त्यांची धारणा होती.

संत तुकाराम महाराजांना “जगदगुरू” असे संबोधले जाते. जगदगुरू तुकाराम महाराज हे सदैव “हरिनामात” गढलेले असायचे. होळी नंतर लगेच दुसऱ्या दिवशी “तुकाराम बीज” हा दिवस येतो. याच दिवशी जगदगुरू तुकाराम महाराज हे नांदुरकी वृक्षाच्या छायेखाली ध्यानस्त बसून सदेह वैकुंठधामाला गेले. वैकुंठधाम म्हणजे साक्षात “श्री हरि भगवान विष्णू” यांचे धाम.

गरिबांविषयी संत तुकाराम महाराजांना (Sant Tukaram Maharaj) कळवळा होता. त्यांचे अंतकरण महासागरासारखे होते माणुसकीची त्यांना जाणीव होती. ते व्यापारी होते. त्यांनी स्वतःच्या वाट्याला जे आले ते त्यांनी लोकांना दिले. कर्जदारांची कर्ज माफ करणारा हा जगातील पहिला संत होय.

जगामध्ये समता नांदावी अशी त्यांची मनोभूमिका होती. संसारातील विरक्तीचा ते महामेरू होते. महात्मा गौतम बुद्धाने जसे राजऐश्वर्याचा त्याग केला. तसा संत तुकाराम यांनी संसारातील सुखदुःखाचा त्याग केला.


Sant Tukaram Information in Marathi

संत तुकाराम यांचे पूर्ण नाव काय आहे?

संत तुकाराम महाराजांचे पूर्ण नाव तुकाराम बोल्होबा अंबिले आहे.

संत तुकाराम महाराजांचा मृत्यू कधी झाला?

१९ मार्च, १६५० (Sant Tukaram maharaj passed away on 19 March, 1650).

संत तुकाराम का प्रसिद्ध आहेत?

तुकाराम महाराजांनी भक्ती आणि समतेचे महत्त्व सांगितले. समाजातील ढोंगीपणा आणि अंधश्रद्धेवरही त्यांनी टीका केली. संत तुकाराम महाराज हे भगवान विठोबावरील त्यांची अखंड भक्ती आणि अभंग जग प्रसिद्ध आहेत.

संत तुकाराम महाराज बीज म्हणजे काय?

तुकाराम बीज, म्हणजे संत तुकाराम महाराजांच्या सदेह वैकुंठ गमनाचा दिवस.

संत तुकाराम महाराजांचा संप्रदाय कोणता होता?

संत तुकाराम महाराजांचा वारकरी संप्रदाय होता.

संत तुकाराम महाराजांचा जन्म कधी झाला?

21 जानेवारी 1608 (Sant Tukaram maharaj was born on 21 January 1608).

संत तुकाराम महाराजांचा प्रमुख ग्रंथ कोणता आहे?

तुकरामाची गाथा

संत तुकाराम महाराज कोणत्या नावाने प्रसिद्ध आहेत?

वारकरी संप्रदायामध्ये ते जगद्गुरु या नावाने प्रसिद्ध आहेत.

संत तुकाराम महाराजांची समाधी कोठे आहे?

देहू, आळंदी (महाराष्ट्र)Join Groups for Latest Updates

Join WhatsApp Group

Join Telegram Channel